Maharashtra Breaking News LIVE Updates : नितेश राणेंच्या जामिनावर उद्या 11 वाजता निर्णय
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आयआयटी मुंबईमध्ये भारतातील पहिलं कार्बन कॅप्चर आणि युटिलायझेशनचं राष्ट्रीय केंद्र
आयआयटी मुंबईमध्ये (IIT Mumbai) विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST), भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने कार्बन कॅप्चर अँड युटिलायझेशन (NCoE-CCU) चे राष्ट्रीय केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. हे केंद्र भारत सरकारद्वारे अनुदानित देशातील पहिलं, असं केंद्र आहे. ज्याला डिसेंबर 2021 मध्ये औपचारिकपणे मंजुरी देण्यात आली आहे. केंद्राच्या संशोधनाच्या प्राथमिक महत्व हे जागतिक हवामानातील कार्बनडाय ऑक्सईड (CO2) ची भूमिका समजून घेणे. सोबतच, औद्योगिक आणि ऊर्जा क्षेत्रातून उत्सर्जित होणारे CO2 कमी करण्याच्या धोरणांचा समावेश असेल. CO2 कॅप्चर, वाहतूक,वर्धित पेट्रोलियम पुनर्प्राप्तीमध्ये वापर आणि बायोमासमध्ये रूपांतरण हे कार्य केंद्राच्या प्रमुख उपक्रमांपैकी असतील. कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अॅण्ड स्टोरेज (CCUS) हा हवामानातील बदल कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय असल्याचे समोर आले आहे.
गेल्या वर्षी ग्लासगो, यूके येथे झालेल्या COP-26 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2070 पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जन राष्ट्र बनण्याच्या वचनबद्धतेसह, हवामानाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी 'पंचामृत' घटक समोर आणले. CCUS अनेकदा सद्याच्या आणि भविष्यात येणाऱ्या ऊर्जा-केंद्रित उद्योगांना डीकार्बोनाइज करण्यासाठी योग्य तांत्रिक उपाय म्हणून निर्धारित केले गेले आहे. .
हे राष्ट्रीय केंद्र कार्बन कॅप्चर आणि युटिलायझेशन वापराच्या क्षेत्रात एक मल्टी-डीसीप्लिनरी, दीर्घकालीन संशोधन, विकास, सहयोग व निर्मिती केंद्र म्हणून काम करेल. NCoE द्वारे क्रॉस-डिसिप्लिनरी प्रशिक्षण पुढील पिढीच्या संशोधकांमध्ये समस्या-केंद्रित दृष्टीकोन विकसित करेल. नॅशनल सेंटर डोमेनमधील सध्याच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोबत नावीन्यपूर्ण कार्याचा कॅप्चरिंग आणि मॅपिंग सुलभ करेल.
अभिमानास्पद! 'लोणार ते लंडन' पोहोचलेल्या राजू केंद्रेची नवी भरारी! 'फोर्ब्स'च्या यादीत झळकला
फोर्ब्स या नामांकित पत्रिकेच्या वेगवेगळ्या याद्यांची प्रतीक्षा अनेकांना असते. या यादीत आता बुलढाण्यातील लोणार येथील एका युवकांनं स्थान मिळवलं आहे. राजू केंद्रे असं या युवकाचं नाव आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल फोर्ब्सनं घेतली असून यामध्ये राजू केंद्रेवर एक स्टोरी प्रकाशित करण्यात आली आहे.
राजू केंद्रे सध्या चेवनिंग स्कॉलरशिपवर SOAS- युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये डेव्हलपमेंट स्टडीज शिकतोय. 2022 च्या "Forbes 30 Under 30" यादीमध्ये त्याचा समावेश झाला आहे. 'फोर्ब्स' इंडिया फेब्रुवारीच्या अंकात सविस्तर यादी आणि स्टोरी पब्लिश झाली आहे. या आठवड्यातच. यादी ऑनलाईनही उपलब्ध होईल. नक्कीच माझ्यासारख्या वंचित घटकातून येणाऱ्या व पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या युवकासाठी ही आनंदासोबत मोठ्या जबाबदारीची गोष्ट आहे असं राजू केंद्रेनं म्हटलं आहे.
राजूनं सांगितलं की, आज क्षमता असतानाही संधीला मुकणारी अशी भरपूर लेकरं आपल्या आजूबाजूला तांड्यात, झोपडपट्टीत, वाड्यात, पाड्यात आहेत. म्हणून संघर्षाच आणि जमिनीवरच्या क्षमतेच प्रतीक असलेल्या 'एकलव्य'चं नाव घेऊन प्लॅटफॉर्म तयार करावा वाटला, हे नावही आपसूकच सुचलं. पुढच्या पिढीच्या ठेचा कमी व्हाव्यात; जागतिक कीर्तीच शिक्षण पहिल्या पिढीतील शिकणारे विद्यार्थी, बहुजन समाजातील युवक कसे घेऊन शकतील हीच त्यामागची मुख्य प्रेरणा-हेतू-उद्देश आहे असं राजू सांगतो.
भाजप आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर
भाजप आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर. नितेश राणे यांना न्यायालयाचा दिलासा
किरीट सोमय्या मारहाण प्रकरणात दिल्लीचे लक्ष, सीआयएसएफचे अधिकारी पुण्यात दाखल
किरीट सोमय्या यांच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती घेण्यासाठी दिल्लीतून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) अधिकारी पुण्यात दाखल झाले . या अधिकाऱ्यांनी आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली त्यामुळे किरीट सोमय्या त्यांच्यावर पुढे महानगरपालिकेत झालेल्या हल्ल्याप्रकरणी दिल्लीनेही लक्ष घातल्या..
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर पोस्ट तिकीट जारी
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ पोस्ट तिकीट जारी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी ही घोषणा केली. सध्या यावर काम सुरू आहे.
दरड कोसळून नुकसान झालेल्या रायगडच्या तळइये गावच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारची मंजुरी
अतिवृष्टीमुळे दरड कोसळून नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यातील तळइये गावच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. या गावासह आणखी दोन वाड्यांच्या पुनर्विकासासाठी 13 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तळईये गावासह दोन वाड्यांच्या पुनर्विकासाच्या भूसंपादनासाठी 3 कोटी 94 लाखांचा निधी मंजूर झाला असून सार्वजनिक सोयीसुविधांसाठी 9 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून ही मोठी दुर्घटना घडली होती.
नितेश राणेंच्या जामिनावर उद्या 11 वाजता निर्णय
भाजप आमदार नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मागील काही दिवसांपासून अडचणीत आहेत. नितेश राणे यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या नियमित जामिनासाठी सिंधुदुर्ग न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत उद्या 11 वाजता निर्णय सुनावणार असल्याचं जाहीर केलं.