एक्स्प्लोर

Nitesh Rane: आमदार नितेश राणे यांची तब्येत बिघडली, छातीत दुखत असल्यानं कोल्हापूरला हलवण्यात येणार

Nitesh Rane: कार्डियाक सिस्टीम उपलब्ध नसल्यानं कोल्हापूरमध्ये तपासणी केली जाणार आहे.

Nitesh Rane: आमदार नितेश राणे यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आलीय. छातीत दुखत असल्यानं त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात येणार आहे. कोल्हापूरातील शासकीय रुग्णालयात त्यांची तपासणी केली जाणार आहे. कार्डियाक सिस्टीम उपलब्ध नसल्यानं कोल्हापूरमध्ये तपासणी केली जाणार आहे. नितेश राणे यांना काल रात्री न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर त्यांना कणकवलीहून ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल केल होतं. रक्तदाब वाढल्यानं त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

संतोष परब हल्ला प्रकरणी दोन दिवस पोलीस कोठडीत असणाऱ्या नितेश राणे यांना शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सलीम जामदार यांच्यासमोर ही सुनावणी झाली. आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार होती. परंतु, सरकारी वकिलानं म्हणणं मांडण्यासाठी वेळ मागितली आहे. ज्यामुळं नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी किंवा मंगळवारी होणार सुनावणी होणार आहे. नितेश राणेंची चौकशी करून माजी आमदार आणि भाजपचे नेते प्रमोद जठार जिल्हा सत्र न्यायालयात आले आहेत. 

काय आहे प्रकरण?  
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भावर्‍यात आडकले आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget