Maharashtra Breaking News LIVE Updates : पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागातील इमारत कोसळली
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
भारताची अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी पराभव
भारतानं ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी धुव्वा उडवून अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या फायनलमध्ये सलग चौथ्यांदा आणि आजवर आठव्यांदा धडक मारली. या विश्वचषकाच्या शनिवारी होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा मुकाबला इंग्लंडशी होईल. दरम्यान, भारताच्या ऑस्ट्रेलियावरच्या दणदणीत विजयाचा कर्णधार यश धुल हा प्रमुख शिल्पकार ठरला. त्यानं कर्णधारास साजेशी खेळी करून वैयक्तिक शतक झळकावलं. शेख रशिदनं 94 धावांची खेळी करून त्याला छान साथ दिली. धुल आणि रशीदनं तिसऱ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी रचली. त्यामुळं भारताला 50 षटकांत पाच बाद 290 धावांची मजल मारता आली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव 194 धावांत गुंडाळला. भारताकडून विकी ओस्तवालनं तीन आणि निशांत संधूनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अष्टपैलू अभिनयाच्या बळावर मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या मनावर अनेक दशकं अधिराज्य करणारा महान कलावंत अभिनेता रमेश देव यांचे निधन झाले आहे . हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी प्राणज्योत मालवली. रमेश देव यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य देव यांनी याबाबत माहिती दिली. रमेश देव यांच्या पश्चात त्यांची पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव, मुलगा अभिनेता अजिंक्य देव, दिग्दर्शक अभिनय देव, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गुरुवारी दुपारी अडीच वाजता पारसी वाडा, विलेपार्ले पूर्व येथे रमेश देव यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
रमेश देव अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आहेत. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1929 कोल्हापुर, महाराष्ट्रात झाला. 'आनंद' या चित्रपटातील भूमिकेसाठी ते ओळखले जातात. 1956 साली रमेश देव यांनी 'आंधळा मागतो एक डोळा' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. तर 'आरती' हा त्यांचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता. रमेश देव यांनी दिग्दर्शन तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. त्यांनी 'पैशाचा पाऊस' आणि 'भाग्यलक्ष्मी' या चित्रपटांत काम केले.
पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर येथील इमारत कोसळली
पुण्यातील येरवड्यातील शास्त्रीनगर भागात लेन नंबर आठमधे एक रहिवाशी इमारत कोसळली आहे. यामध्ये काही जणांचा मृत्यू झालाअसून अनेकजण जखमी आहेत.
लोकसभेत सुजय विखे आणि सुप्रिया सुळे यांची जोरदार जुगलबंदी...
सहकाराबद्दल बोलताना सुजय विखे पाटील यांनी यूपीए सरकारच्या कामावर टीका केली...
त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्यात.. यूपीए सरकारच्या काळात हे स्वतः काँग्रेसमध्ये होते... हे स्वतः यूपीए सरकारच्या योजनांची लाभार्थी होते...
खाल्ल्या मिठाला जागावं.. माझ्या आईने मला दिलेली शिकवण आहे..
बंडातात्या कराडकरांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बंडातात्या कराडकरांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कोविडचे नियम न पाळता आंदोलन करणे, मास्क बाबत वेगळी चिथावणी देणे या कलमांखाली बंडातात्या कराडकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण - म्हारळ गावातील बियर शॉपसह दूध डेअरीमध्येही चोरट्यांचा डल्ला
कल्याण तालुक्यातील म्हारळ गावातील बियर शॉप व शेजारी असलेल्या दूध डेरीमध्ये चोरटयांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत .याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्या चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. म्हारळ गावातील नाक्यावरच मयुरेश्वर बियर शॉप व त्याच्या शेजारी बालाजी डेअरी दूध विक्रीचे दुकान आहे. काल पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात चोरटयांनी आधी बियर शॉपचे शटर उचकटून शॉपमधील रोकडचा गल्ला व बियरचा बॉक्स लंपास केला.चोरी करताना हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. तसेच शेजारी असलेल्या बालाजी डेअरीचे शटर फोडून त्या डेअरीतील गल्ल्यात असलेली 26 हजारांची रोकड लंपास केली आहे.
आयुक्तांचे स्वच्छता पाहणी अभियान
आझादीच्या 75 व्या अमृत महोत्सव आणि स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत ठाणे महापालिका हद्दीतीतील आनंद नगर टोल नाका ते तीन हात नाका पर्यंत ठाणे महापालिकेने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या ठिकाणी मोठी वाहतूक वर्दळ रस्ता असून इथे अश्या प्रकारची स्वच्छता मोहीम घेणे मोठे आव्हान असल्याने इथे स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. याच स्वच्छता मोहिमेची आज ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांनी पाहणी केली. ही स्वच्छता मोहीम अशाचप्रकारे ठाण्यातील इतर वर्दळीच्या ठिकाणी देखील सुरू करून दिवा मुंब्रा अशा भागात देखील स्वच्छता करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे तसेच शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बॅनरचा मोठा त्रास होत असून असे अनधिकृत बॅनर देखील महापालिकेकडून काढण्यात येणार आहेत.