एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 3 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 3 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Background

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू....

तैवानच्या मुद्यावरून जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?

चीनच्या बॉंबस्फोटाच्या धमकीनंतरही नॅन्सी पेलोसी या तैवानमध्ये गेल्या असून उद्या त्या राष्ट्रपतींना भेटणार आहेत. नॅन्सी पेलोसींच्या या दौऱ्यामुळे चीन दावा करत असलेल्या एका लोकशाही देशामागे जगातली सर्वात जुनी लोकशाही उभी असल्याचा संदेश अमेरिकेने दिला आहे. 

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर महत्वाची सुनावणी

राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघाला कलाटणी देणारी महत्वाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होणार आहे.   या प्रकरणी 20 जुलैला सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत 1 ऑगस्टला पुढची सुनावणी ठरली होती.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवर अपात्रेच्या कारवाईच्या मागणीवरुन, मुख्य शिवसेनेकडून करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर यावेळी सुनावणीची शक्यता आहे. सरन्यायाधीश रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या पीठापुढे सुनावणी होणार आहे.

विरोधी पक्षनेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

विदर्भ आणि मराठवाडात आलेल्या पूराची अजित पवार यांनी 29 जुलै ते 31 दरम्यान पाहणी केली.  अजूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. मृतांच्या कुटुंबियांना सुद्धा पुरेशी मदत मिळाली नाही. ही मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत. 

ऑनलाईन अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार

ऑनलाइन अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना मिळाल्या कॉलेजमध्ये 6 ऑगस्टपर्यंत आपली प्रवेश निश्चित करायचे आहेत

राहुल गांधी कर्नाटक दौऱ्यावर

काँग्रेस नेते राहुल गांधी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी कर्नाटकाती दोन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

20:39 PM (IST)  •  03 Aug 2022

IND Vs Aus : नागपुरात  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी 20 सामना 23 सप्टेंबर रोजी

नागपूरः BCCI ने ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 मालिकेचे पूर्ण वेळापत्रक जाहीर केले आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध मर्यादित षटकांचे सामने सप्टेंबर 2022 मध्ये होणार आहेत. यंदा मोहाली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्याचे यजमानपद भूषवणार आहे. तर नागपूर आणि हैदराबाद येथे अनुक्रमे दुसरा आणि तिसरा सामना खेळला जाईल.

19:52 PM (IST)  •  03 Aug 2022

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात कारवाईचे आदेश

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात कारवाईचे आदेश, 293 उमेदवारांवरती कारवाई केली जाणार आहे. 

सन २०१९-२०२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहारामात सायबर स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ५६/२०२९ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.   तपासादरम्यान परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिकांची कसून तपासणी केली असता त्या असे निष्पन्न की, ७८८० उमेदवार परीक्षेत गैरप्रकारात सामिल असल्याचे दिसून आले. म्हणजे प्रत्यक्षात ते असतांना त्यांनी गैरप्रकार करून स्वतःस पात्र करून घेतलेले आहे.

19:34 PM (IST)  •  03 Aug 2022

Nagpur : वीज कोसळ्याने महिलेचा मृत्यू, एक घर कोसळला

नागपूरः बाजारगाव येथील विनोद बाजनघाटे यांच्या घरावर आज (बुधवारी) वीज पडली. त्यामुळे घराचा एक भाग पूर्ण कोसळला. यासोबतच घरातील वीजपुरवठा सुद्धा खंडित झाला आहे. तसेच बाजारगावा जवळ असलेल्या सातनवरी (पादरी खापा) येथील उज्वला सुरेश थुटूरकार ह्या स्वतःच्या शेतात भेंडी तोडत असताना त्यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

19:14 PM (IST)  •  03 Aug 2022

देहू संस्थानचे आजी-माजी विश्वस्त जुगार खेळताना अटकेत, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या छाप्यानंतर खळबळ

पुण्यातील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या संस्थानचे आजी-माजी विश्वस्त थेट जुगार खेळताना रंगेहात अटकेत आलेत. त्यांच्यासह देहू नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविकेच्या पतीसह सहवीस जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या या कारवाईनंतर वारकरी सांप्रदायामध्ये एकच खळबळ उडाली आहे.  

 
पुण्यातील चाकण एमआयडीसी हद्दीत जुगार अड्डा सुरु असल्याची खबर दरोडा विरोधी पथकाला मिळाली होती. देहूगाव ते येलवाडी मार्गावरील एक बंदावस्थेत कंपनी आहे. त्या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर हा पत्त्यांचा खेळ रंगला होता. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याची खातरजाम केली अन त्यानुसार मंगळवारच्या रात्री सापळा रचला. एका मागोमाग एक असे सहवीस जण कंपनीत दाखल झाले. सर्वांच्या हातात पत्ते पडू लागले, नोटांची बंडलं खुलू लागली, डाव मारणारे आनंदी तर पैसा डुबणारे नाराजीत होते. तितक्यात पोलिसांनी तिथं छापा टाकला अन सर्वानाच धक्का बसला. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यातून कोणालाच निसटता आलं नाही. पोलिसांनी सर्वांची माहिती घ्यायला सुरुवात केली. तेंव्हा पोलिसांना ही धक्का बसला. कारण या सहवीस जणांमध्ये देहूच्या संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त विशाल केशव मोरे, माजी विश्वस्त संतोष गुलाब मोरे ही जुगार खेळत होते. त्यांच्यासह देहू नगरपरिषदेचे नगरसेवक मयूर टिळेकर, एका नगरसेविकेचे पती विशाल परदेशींचा ही समावेश आहे. अटकेत असलेल्या सहवीस जणांकडून पस्तीस लाखांचा ऐवज ही जप्त करण्यात आलाय. जुगार खेळणाऱ्यांमध्ये देहू संस्थानचे आजी-माजी विश्वस्त सापडल्याने वारकरी सांप्रदायामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. 
19:12 PM (IST)  •  03 Aug 2022

उमेश कोल्हे खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना 7 ऑगस्टपर्यंत NIA कडे ट्रान्झिट रिमांड

NIA ने अमरावती उमेश कोल्हे खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले. कोर्टाने दोन्ही आरोपींना 7 ऑगस्टपर्यंत NIA कडे ट्रान्झिट रिमांड दिला आहे. NIA या आरोपींना मुंबईत आणणार आहे.

एनआयएने न्यायालयाला सांगितले की उमेश कोल्हेच्या हत्येनंतर आरोपी मुन्सिफ अहमद रशीदने आरोपींना अमरावती येथे लपण्याची व्यवस्था केली होती. जेथे अनेक आरोपी काही दिवसांपासून लपले होते.

दुसरीकडे, अब्दुल अरबाज सलीम हा मुख्य आरोपी इरफान शेखचा ड्रायव्हर असून, त्याने इरफान शेखच्या सांगण्यावरून हत्येसाठी पैशांची व्यवस्था केली होती.

एनआयए त्यांना ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणणार असून त्यांना एनआयए कोर्टात हजर करणार आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 19 January 2024Special Report Bharat Gogwale And Dada Bhuse : दिल है की मानता नहीं.., पालकमंत्रीपदाचा अभाव, नाराजीचा प्रभाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget