एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्य कोरोना टास्क फोर्सची आज रात्री पुन्हा बैठक, लसीकरणासह बुस्टर डोसवर होणार चर्चा

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्य कोरोना टास्क फोर्सची आज रात्री पुन्हा बैठक, लसीकरणासह बुस्टर डोसवर होणार चर्चा

Background

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

अधिवेशनाचे दोन दिवस उरले; आज विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन वातावरण तापण्याची शक्यता 

Maharashtra Vidhimandal Assembly Session : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे (Maharashtra Vidhimandal Session) शेवटचे दोन दिवस उरले आहे. आज आणि उद्या दोन दिवसात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सरकारला राज्यपालांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवार देणार की निवडणूक बिनविरोध होणार याचाही सस्पेन्स कायम आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राज्यपाल  सरकारला अडचणीत आणण्यासाठी काही वेगळा निर्णय घेणार का याकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं लक्ष लागलं आहे. तर, भाजप विधानसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार देणार का? असा देखील प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आहे.

 महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं काल राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. शिष्टमंडळाकडून राज्यपालांना निवेदन देण्यात आलं. यावेळी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे पूर्णवेळ अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ही निवडणूक या दोन दिवसांमध्ये पार पडावी, यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.  राज्यपालांनी सरकारच्या प्रस्तावावर चर्चा करून आज (सोमवारी) निर्णय कळवणार असल्याचं सांगितल्याचा दावा या नेत्यांनी केला होता. राज्यपाल सकारात्मक असल्याचंही नेत्यांनी स्पष्ट केलं होतं.  

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम राज्यपालांना दिलाय. त्यांनी लवकर मंजूरी द्यावी, यासाठी त्यांची भेट घेतलीय. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम उद्याच जाहीर करावा, अशीही त्यांना विनंती करण्यात आली आहे. ते हा कार्यक्रम मंजूर करतील अशी आम्हाला खात्री आहे, असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलं होतं. 

संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

Sindhudurg News : कणकवलीत काही दिवसांपूर्वी एका शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे (Nitesh Narayan Rane) यांना अटक होण्याची शक्यता आहे. खुद्द नितेश राणेंचे वडिल आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीच ही शक्यता व्यक्त केली आहे. या प्रकरणात नितेश राणेंना नाहक गोवलं जातंय, असा आरोपही त्यांनी केला आहे.  तसेच या प्रकरणी नितेश राणेंविरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणातील सूत्रधाराला अटक करा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केली आहे. 

सिंधुदुर्गात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष पेटला आहे. कणकवलीत संतोष परब या शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. खुद्द नारायण राणे यांनीच ही शक्यता वर्तवली, तर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी या प्रकरणी नितेश राणेंना अटक करण्याची मागणी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेचे सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात थेट सामना होत आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात सत्ताधारी आघाडी नितेश राणेंना गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला आहे. तर राणेंच्या आरोपांनंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी या हल्ला प्रकरणातल्या सूत्रधारावर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात मोर्चा काढायचं ठरवल्यानं शिवसेना आणि राणे समर्थक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. 

23:05 PM (IST)  •  27 Dec 2021

राज्य कोरोना टास्क फोर्सची आज रात्री पुन्हा बैठक

कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येवर चर्चा करण्यासाठी राज्य कोरोना टास्क फोर्सची बैठक आज रात्री पार पडणार आहे. 15 ते 18 वयोगटासाठीचे लसीकरण आणि फ्रंटलाईन वर्करसाठी बूस्टर डोस यासंदर्भात यावेळी चर्चा होणार आहे. तसंच जानेवारीत कोरोना संख्येचा आढावा घेऊन शाळांच्या बाबतीत यावेळी विचार केला जाणार आहे.

16:48 PM (IST)  •  27 Dec 2021

दक्षिण आफ्रिकेतून नांदेडमध्ये आलेले तीन जनांपैकी दोन जण ओमायक्रॉन बाधित

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात ओमायक्रॉनचे तीन संशयित रुग्ण आढळले होते. त्यांचा आज अहवाल आला असून त्यातील दोन रुग्ण हे ओमायक्रॉन बाधित आल्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झालीय. दक्षिण आफ्रिकेतून हिमायतनगर शहरात आलेले हे तीन जण ओमायक्रॉन संशयित रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले होते. त्यानंतर या तिन्ही रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. दरम्यान आज त्यांचा अहवाल आला असून त्यातील दोन जण ओमायक्रॉन बाधित निघाले आहेत.सध्या या तिन्ही रुग्णांना हिमायतनगरहून हदगांवच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

15:08 PM (IST)  •  27 Dec 2021

संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे सूत्रधार कोण हे पोलिसांनी जाहीर करावं, शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांची मागणी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं  शिवसैनिकावरील हल्ल्याचा मुद्दा राणेंविरोधात लावून धरलाय. महाविकास आघाडीनं संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा फोटोही छापून सहकार की हाहाकार अशा आशयाची पत्रकं प्रसिद्ध केलीत. परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे सूत्रधार कोण हे पोलिसांनी जाहीर करावं, अशी मागणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केलीय. 

12:29 PM (IST)  •  27 Dec 2021

तेलंगणा : छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक, घटनास्थळी सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले

तेलंगणा-छत्तीसगडच्या सीमेवर नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी मारले गेलेत. तेलगणा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. तेलंगणच्या कोत्तागुडमचे पोलीस अधीक्षक सुनील दत्त यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. चकमकीनंतर पोलिसांनी तातडीनं शोधमोहीम राबवली. त्यात घटनास्थळी सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले, आणि मोठ्या प्रमाणात हत्यारंही जप्त करण्यात आली.

12:19 PM (IST)  •  27 Dec 2021

नितेश राणेंची दुहेरी कोंडी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 21 January 2024Girish Kuber on Donald Trump:  डोनाल्ड ट्रम्प यांचे धडकी भरवणारे निर्णय, जगावर,भारतावर परिणाम काय?Manikrao Kokate On Pik Vima Scam : कुठल्याही योजनेमध्ये दोन ते चार टक्के भ्रष्टाचार होतो, कोकाटेंचं वक्तव्य, विरोधकांचा हल्लाबोल100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha | 21 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
Embed widget