Maharashtra Breaking News LIVE Updates : संभाजीरांजेंना पाठिंबा देण्यासाठी खासदार धैर्यशील माने आझाद मैदानात
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
मराठा आरक्षणासाठी आजपासून संभाजीराजेंचा एल्गार, मुंबईत आमरण उपोषण
खासदार संभाजीराजे छत्रपती हे आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आझाद मैदानावर संभाजीराजे उपोषण करणार आहेत. 15 फेब्रुवारीला त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती दिली होती. एकटे संभाजीराजे जरी उपोषणाला बसणार असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, आज 11.30 वाजता संभाजीराजे उपोषणस्थळी आझाद मैदानावर पोहोचणार आहेत. त्यानंतर त्यांच्या आंदोलनाला सुरूवात होणार आहे. नेमका आजचा कार्यक्रम कसा असेल...
सकाळी 10:50 वजता मरीन ड्राईव्ह येथून सर्व समन्वयकांसह संभाजीराजे हुतात्मा चौक येथे येमार आहेत. त्यानंतर ११ वाजता हुतात्मा चौक, मुंबई येथे हुतात्मा स्मारकास अभिवादन करणार आहेत. 11:15 वाजण्याच्या दरम्यान आझाद मैदान येथे उपोषणस्थळी आगमन होणार आहे, त्यानंतर संभाजीराजे प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. 11:30 वाजता संभाजीराजे उपोषणस्थळी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करतील, त्यानंतर उपोषणास सुरुवात होणार आहे.
महाराष्ट्र, बंगाल वगळता इतर राज्यात ईडीला काम नाही का?, मुख्यमंत्र्यांनी भाजपला ठणकावलं
Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर आणि फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र सोडला तर इतर राज्यात तपास यंत्रणांना काम नाही का? असा संतप्त सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. लोकसत्ताच्या 74 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवायावरुन भाजपला इशारा दिला. आता तुमची वेळ आहे. घाला धाडी, प्रत्येकाचा दिवस असतो. लक्षात ठेवा अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपला ठणकावलं.
Yashwant Jadhav : 24 तास उलटले तरी यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी सुरूच, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
Shivsena Corporator Yashwant Jadhav : गेले 24 तास उलटून गेले तरी अद्याप शिवसेना नेते व मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरूच आहे. शुक्रवारी सकाळपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू झाली होती. दरम्यान, याविरोधात चिडलेल्या शिवसैनिकांनी आयकार विभागाच्या छापेमारीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मध्यरात्री यशवंत जाधव यांना घरातून बाहेर काढल्याचे समझल्यावर शिवसैनिक मोठ्या संख्येने यशवंत जाधव यांच्या घराच्या बाहेर एकत्र आले होते.
Mumbai : मुंबईतील चार कोविड सेंटर बंद
कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे मुंबईतल्या 9 जम्बो कोविंड सेंटरपैकी 4 कोविड सेंटर पालिकेकडून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुलुंडच्या जम्बो कोविड सेंटर मधील शेवटच्या तीन रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर जम्बो कोव्हिडं सेंटर आता बंद करण्यात आले आहे.
युक्रेनमध्ये अडकलेले 219 विद्यार्थी भारतात परतले
युक्रेनमध्ये अडकलेले 219 विद्यार्थी भारतात परतले. रोमानियाहून एअर इंडियाचं पहिलं विमान भारतात परतलं आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याकडून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.
Solapur News Update : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकांचा निकाल जाहीर
Solapur News Update : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. मतदान झालेल्या 16 पैकी 16 जागांवर सत्ताधारी शेतकरी विकास आघाडी पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. दूध उत्पादकांच्या दूध संघ बचाव पॅनला एकही जागा जिंकता आली नाही. दूध संघ बचाव पॅनलच्या उमेदवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांची सून वैशाली साठे देखील पराभूत झाल्या आहेत.
Beed News Update : परळीत चाकूने वार करून महिलेची हत्या, मुलगी गंभीर जखमी
Beed News Update : परळी शहराजवळच आयेशा नगर येथे एका 50 वर्षीय महिलेची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात मृत महिलेची 16 वर्षीय मुलगी देखील जखमी झाली आहे. मदिना शेख असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. हा हल्ला आर्थिक व्यवहारातून झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. संशयित हल्लेखोर तरुण माजलगाव तालुक्यातील आहे.
Asaduddin Owaisi : सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अद्याप तुरुंगाबाहेर का? असदुद्दीन ओवैसी
Asaduddin Owaisi : सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अद्याप तुरुंगाबाहेर का आहेत? असा प्रश्न असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.