Maharashtra Breaking News 25 June 2022 : राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, राज्यातील घडामोडीची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
16 बंडखोरांना अपात्रतेची नोटीस, सोमवारपर्यंत वेळ
बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांना अपात्र ठरवावं अशा आशयाची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. त्यावर आता 16 आमदारांना 48 तासांच्या आत त्यांचं मत माडण्यासाठी सागण्यात आलं असून त्यांनी मत मांडलं नाही तर त्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे. त्यामुळे बंडखोरांना आता शिवसेनेचं कवच सोडावं लागणार आहे. उद्यापासून सर्वांना नोटिसा जातील आणि त्यांना सोमवार पर्यंत वेळ देण्यात येईल, यावर त्यांना उत्तर द्यायचं आहे असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
या बंडखोर आमदारांना परत पक्षात घ्यायचं का नाही ते आता उद्धव ठाकरे ठरवतील असंही अरविंद सावंत यांनी सांगितलं. या आमदारांचा एक वेगळा गट होऊ शकत नाही, त्यांना भाजपमध्ये विलिनीकरण करावं लागेल. मग ते कट्टर शिवसैनिक आहेत ही जी काही डॉयलॉगबाजी ते करत होते ती बंद होईल असंही अरविंद सावंत म्हणाले.
शिवसेनेच्या कार्यकारिणीची आज बैठक
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडावर आता उद्धव ठाकरे आक्रमक झाले असून त्यांनी बंडखोरांना थेट आव्हान दिलं आहे. आज दुपारी एक वाजता त्यांनी शिवसेना कार्य़कारिणीची बैठक बोलावली आहे.
शिवसैनिक रस्त्यावर येण्याची शक्यता, महाराष्ट्रात हाय अलर्ट
मुंबई पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र राज्यातीलही सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे विशेष आदेश दिले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसैनिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून गोंधळ घालू शकतात, असा अलर्ट त्यांना मिळाला आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये आणि शांतता राखावी यासाठी पोलिसांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. पोलिसांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राहुल गांधींच्या वायनाडमधील कार्यालयाची तोडफोड
शुक्रवारी केरळमधील वायनाडमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. भारतीय युवक काँग्रेसने एका ट्वीटमध्ये आरोप केला आहे की एसएफआयचे झेंडे धरलेल्या काही गुंडांनी राहुल गांधींच्या वायनाड कार्यालयाच्या भिंतीवर चढून कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. याच दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी दोषींवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
पालघरमध्ये उत्पादन शुल्क विभागाने दमण बनावटीच्या दारुसह 80 लाखांचा मुद्देमाल पकडला
एकीकडे राज्यात राजकीय धुरळा सुरु असताना दुसरीकडे मात्र मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरुन दमण बनावटीची अवैद्य दारु महाराष्ट्रात आणली जात असल्याचे उघड झालं आहे. दमणवरुन मुंबईकडे तब्बल 80 लाख रुपयांची दमन बनावटीची दारु घेऊन जाणारा कंटेनर पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतला आहे. दमण बनावटीची दारु मुंबई, ठाणे अशा महानगरांमध्ये नेऊन दाम दुप्पट किमतीने विकली जाते. एक कंटेनर पकडण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले असले तरी असे दिवसागणिक कित्येक कंटेनर हे दमण गुजरात मार्गे मुंबईत आणि ठाण्यात दाखल होतात. राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज केलेल्या कारवाईत मुद्देमालासह तब्बल 80 लाख रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे.
Raigad: शिवसेनेच्या माजी नगरसेवक प्रसाद सावंत यांच्यावर अज्ञातांनी केला हल्ला
माथेरान येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रसाद सावंत यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केल्याची बातमी समोर येत आहे. या हेलखोरांनी कर्जतनजीक प्रसाद सावंत यांच्या गाडीची तोडफोड केल्याचं सांगितलं जात आहे. सावंत यांच्यावर 10 ते 15 लोकांनी हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रसाद सावंत यांना कर्जत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाण्याच्या प्रवाहात बैलगाडी उलटून महिलेसह मुलीचा मृत्यू, नांदगाव तालुक्यातील घटना
नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र या मुसळधार पावसात महिलेसह दोन मुली बैलगाडीने घरी परतत असताना बैलगाडी उलटून तिघीही वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोघींचा मृत्यू झाला असून एका मुलीचा शोध सुरु आहे.
सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा
वारीत गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी केला हात साफ
संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या दोन्ही पालख्या पुण्याहून पंढरपूरकडे रवाना झाल्या. करोनानंतरचा हा पहिलाच पालखी सोहळा असल्याने यंदा वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत अनेक चोरट्यांनी वारकरी भाविकांचे मंगळसूत्र व इतर मौल्यवान वस्तूंची चोरी केली आहे. अशाच काही गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस वारकऱ्यांसोबत फिरत होते. त्यात पोलिसांना काही जणांना पकडण्यात यश मिळविले आहे आणि सोन्याचे दागिने देखील जप्त केले आहेत.
Jalna News: जालना पोलिसांची मोठी कारवाई; एकाचवेळी 9 तलवारी जप्त
Jalna Crime News: जालना पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. जालना शहरातील वाल्मिक नगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या ताब्यातून तब्बल 9 तलवारी जप्त केल्या आहेत. एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या लोखंडी संदुकामध्ये या तलवारी लपवून ठेवण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी शेख कलीम शेख शरीफ नावाच्या आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर त्याने आपल्या एका मित्राच्या मदतीने या तलवारी खरेदी केल्याची कबुली दिली आहे.