Pune Crime News: वारीत गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी केला हात साफ; संशयितांना पोलिसांकडून अटक
पुण्यातील नाना पेठेत संत तुकाराम महाराजांची तर भवानी पेठेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम होता. दोन वर्षांनंतर पालखी पुण्यात आल्याने गर्दी झाली होती. गर्दीचा फायदा चोरांनी केली घेतला.
Pune Crime News: जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या दोन्ही पालख्या पुण्याहून पंढरपूरकडे रवाना झाल्या. करोनानंतरचा हा पहिलाच पालखी सोहळा असल्याने यंदा वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत अनेक चोरट्यांनी वारकरी भाविकांचे मंगळसूत्र व इतर मौल्यवान वस्तूंची चोरी केली आहे.
अशाच काही गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस वारकऱ्यांसोबत फिरत होते. त्यात पोलिसांना काही जणांना पकडण्यात यश मिळविले आहे आणि सोन्याचे दागिने देखील जप्त केले आहेत. देहू व आळंदी येथून निघालेला प्रस्थान सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला मात्र अनेकांना गर्दीचा फटका बसला. आळंदी परिसरातील देहू येथे पालखी सोहळ्यासाठी आलेल्या संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. यापैकी काही जणांना गुन्हे करताना रंगेहात पकडले आहे. दोन वर्षांनंतर वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा पार पडला. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती. याचाच फायदा चोरटे घेत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीसांंनी दिलेल्या माहितीनुसार, पालखी सोहळ्यात पाकिटे, सोनसाखळी चोर येण्याची शक्यता लक्षात घेऊन गुन्हे शाखा आणि पोलिसांची आठ पथके देहू, आळंदीत तैनात करण्यात आली होती. ते रात्रंदिवस गस्त घालत होते.यात काही महिलांंचा देखील समावेश होता. सोनसाखळी आणि पर्स हिसकावल्याच्या आरोपावरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पुण्यातील नाना पेठेत संत तुकाराम महाराजांची तर भवानी पेठेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम होता. याच परिसरात पालखीच्या दर्शनासाठी पुणेकरांनी आणि शेजारच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी भल्या मोठ्या रांगा होत्या. दोन वर्षांनी पायी होणार असल्याने पुणेकरांनी आनंदाने वारकऱ्यांचे स्वागत आणि पाहूणचारही केला. दोन वर्षांनंतर पालखी पुण्यात आल्याने गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा अनेक चोरांनी केली घेतला. यंदा 377 वा पालखी सोहळा होता. कोरोनामुळे फक्त दोनवेळा या पालखी सोहळ्यास खंड पडला होता.