एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 22 May 2022 : संभाजीराजेंना शिवसेनेकडून पक्षप्रवेशासाठी निमंत्रण, उद्या बांधणार शिवबंधन?

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 22 May 2022 : संभाजीराजेंना शिवसेनेकडून पक्षप्रवेशासाठी निमंत्रण, उद्या बांधणार शिवबंधन?

Background

आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

आज राज ठाकरेंची पुण्यात सभा, राज ठाकरेंच्या रडारवर कोण, बृजभूषण की मविआ सरकार?
आज सकाळी 10 वाजता पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्र येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा होणार आहे. राज ठाकरेंच्या सभेला पोलीसांनी 13 अटींसह परवानगी दिली आहे. 'तूर्तास अयोध्या दौरा स्थगित..सविस्तर बोलू' असं ट्वीट राज ठाकरेंनी केलं होतं. त्यामुळे आज या विषयावर राज ठाकरे बोलतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी

वाढत्या महागाईत केंद्र सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. अबकारी कर कमी केल्यानं पेट्रोलच्या दरात 9.50 रुपये तर डिझेलच्या दरात 7 रुपये घट झाली आहे.  केंद्राकडून पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी 8 रुपये प्रति लीटर कमी होणार तर डिझेलवरील एक्साईज ड्युटी 6 रुपये प्रति लीटर कमी होणार आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरात 9.50 रुपये तर डिझेलच्या दरात 7 रुपये घट होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्वीटद्वारे ही घोषणा केली आहे. 

तसेच, पहिल्या 12 गॅस सिलेंडरवर प्रत्येकी 200 रुपये सबसिडी मिळणार आहे. त्यामुळे सिलेंडरच्या किमतीही 200 रुपयांनी कमी होणार आहेत. 

मान्सून अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ
मान्सून अपडेट- मान्सून अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झाला आहे. काल नैऋत्य मौसमी वाऱ्याची कोणतीही प्रगती बघायला मिळाली नाही. मात्र येत्या 27 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, त्याआधी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून कोकणात पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिवसभर बारामतीत असतील. सकाळी विविध विकास कामांची पाहणी करून बारामतीतील विद्या प्रतिष्ठान याठिकाणी जनता दरबार घेणार आहेत. त्यानंतर कोऱ्हाळे येथे अजित पवारांची सभा होणार आहे. त्यानंतर बारामतीतील विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच मालेगावला सामुदायिक विवाह सोहळ्याला अजित पवार उपस्थिती लावतील.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह नागपूर दौऱ्यावर
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूर दौऱ्यावर येत आहेत. दुपारी 12 वाजता ते नागपुरात दाखल होतील. विमानतळावरच काही संरक्षण अधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार असून त्यानंतर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या वर्धा रोड स्थित निवासस्थानी भेट देणार आहेत. 

अमित शाह यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्याचा दुसरा दिवस
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज अमित शाह दुपारी 1.30 वाजता चीन- भारत सीमेवरील जवानांशी संवाद साधणार आहेत.

आसाममध्ये मदतकार्य सुरू
पुरामुळे आसाममधील जनजीवन विस्कळीत झालंय. आतापर्यंत सुमारे 7 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. या ठिकाणी एनडीआरएफ, वायुसेनेकडून मदतकार्य सुरु आहे.

22:02 PM (IST)  •  22 May 2022

Solapur News Update :  सांगोल्याजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दोघांचा मृत्यू

सांगोला तालुक्यातील चिकमहूद ते दिघंची मार्गावरील हॉटेल विशाल जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरासमोर धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला . अपघातातील मयत तरुण वरकुटे-मलवडी(ता.माण, जि.सातारा) येथील आहेत . 

आज रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चिकमहूद ते दिघंची मार्गावर चिकमहूद शिवारातील हॉटेल विशाल जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात सुशांत शांताराम जाधव (वय 28,रा.वरकुटे-मलवडी ता. माण, जि.सातारा) हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या सोबत असणारा मंगेश शिवाजी पिसे (वय 28,रा.वरकुटे-मलवडी,ता. माण,जि.सातारा) याचा उपचारासाठी  नेते असताना वाटेत मृत्यू झाला. 

19:14 PM (IST)  •  22 May 2022

Sambhaji Raje : संभाजीराजे यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार : सूत्र 

संभाजीराजे यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून उमेदवारी देण्याची संभाजीराजे यांची मागणी असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.  

19:05 PM (IST)  •  22 May 2022

Solapur News Update : मोहोळ-पंढरपूर महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात ; सहा जण जागीच ठार

मोहोळ-पंढरपूर महामार्गावर पेनूर जवळील माळी पाटी नजीक दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मोहोळ येथील रहिवाशी असलेल्या खान कुटुंबातील सदस्यांचा मृतामध्ये समावेश आहे. अपघातातील दोन जखमी व्यक्तींना  उपचारासाठी सोलापूरला हलवल्याची माहिती आहे. 

18:31 PM (IST)  •  22 May 2022

Osmanabad: उस्मानाबादेत सापडली सातवाहन कालीन वसाहत

उस्मानाबाद शहरालगत निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या श्री हातलाई देवीच्या डोंगरावर सातवाहन कालीन वसाहत सापडली आहे. इतिहास आणि पुरातत्व अभ्यासक संशोधक जयराज खोचरे हे या भागाचे अनेक दिवसांपासून संशोधन करत होते. त्यांना या भागात सातवाहन कालीन खापरे, विटा सापडल्या असून आज सातवाहन कालीन नाणे सापडले आहे. या धार्मिक आणि निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या या डोंगरावर प्राचीन वसाहत ही इथे येणाऱ्या पर्यटकांना पर्वणीच असणार आहे. याचे संरक्षण तसेच उत्खनन होणे गरजेचे आहे, असे मत खोचरे यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच इथे सापडलेल्या वस्तूसाठी साईट म्युझियम देखील इथे उभारलं जावं, अशी आशा खोचरे यांनी बोलून दाखविली.

16:38 PM (IST)  •  22 May 2022

Mahadev Jankar : गाईच्या दुधाला राज्य सरकारने किमान पन्नास रुपये लिटरला दर द्यावा : महादेव जानकर

गाईच्या दुधाला राज्य सरकारने किमान पन्नास रुपये लिटरला दर द्यावा अशी मागणी राज्याचे माजी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे.  

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNitin Gadkari : गडकरींना सरकारमध्ये दिसते विषकन्या; संजय राऊत म्हणतात...Avimukteshwaranand Swami On Eknath Shinde : एकनाथ शिंदे गोमाता का बेटा..Manoj Jarange Maratha reservation : मराठा आणि कुणबी एकच; सरकारला अजून किती पुरावे हवेत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
Embed widget