एक्स्प्लोर

Anjali Damania on Devendra Fadnavis : फडणवीस तुम्ही म्हणता वाल्मिक कराड गायब आहे, मग हे काय? अंजली दमानियांकडून थेट सवाल

वाल्मिक कराडवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन सादर करत कोणालाही सोडणार नसल्याचे म्हटले आहे. बीड जिल्हा  पोलिस अधीक्षकांची सुद्धा उचलबांगडी करण्यात आली आहे.

Anjali Damania on Devendra Fadnavis : बीड जिल्ह्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव आल्यानंतर आरोपांची फैरी झडत आहेत. वाल्मिक कराडवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन सादर करत कोणालाही सोडणार नसल्याचे म्हटले आहे. बीड जिल्हा  पोलिस अधीक्षकांची सुद्धा उचलबांगडी करण्यात आली आहे. तथापि, वाल्मिक कराडवर अजूनही कारवाई झाली नसल्याने बीड जिल्ह्यात संताप आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी केली आहे. 

फडणवीस तुम्ही म्हणता वाल्मिक कराड गायब आहे, मग हे काय?

दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वाल्मिक कराडवरून सरकारवर गंभीर आरोप केला आहे. वाल्मिक कराड नागपुरात फार्म हाऊसवर आहे, मी पत्ता देतो पोलीस त्याला पकडत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, हाच धागा पकडत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला आहे. फडणवीस तुम्ही म्हणता वाल्मिक कराड गायब आहे , मग हे काय? अशी विचारणा त्यांनी ट्विट करून केली आहे. अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडला तातडीने अटक झालीच पाहिजे. अटक नाही झाली तर आम्ही सगळे बीडला जाऊन आंदोलन करणार. धनंजय मुंडे यांना देखील कुठलेही खाते मिळता कामा नये, अशी मागणी ट्विट करून केली आहे. 

फडणवीस विधानसभेत काय म्हणाले?

फडणवीस यांनी सांगितले की, हत्या अतिशय क्रूरपणे झाली असून त्यांच्या डोळ्यांना मार बसला होता. वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरणातील आरोपींबरोबर असलेल्या संभाषणाचे व अन्य पुरावे पाहता गुन्ह्यात सहभाग आहे. कराडचा देशमुख हत्येतही सहभाग असल्याचे एसआयटी चौकशीत दिसून आले, तर त्याचे सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील कोणत्याही राजकीय नेत्याबरोबर संबंध असले, तरी त्याचा मुलाहिजा न बाळगता 'मोक्का' नुसार कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी जाहीर केले. मात्र कराडचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असल्याचा आणि सरकार मुंडे यांना वाचवत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra live blog updates: मुंबईतील सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ
Maharashtra live blog updates: मुंबईतील सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ
Nitesh Rane Thnae: 'मुंब्रा नव्हे, मुंब्रादेवी म्हणा; हा देश हिंदूराष्ट्र, कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही'; ठाण्यातील कावड यात्रेत मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य
'मुंब्रा नव्हे, मुंब्रादेवी म्हणा; हा देश हिंदूराष्ट्र, कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही'; ठाण्यातील कावड यात्रेत मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह! नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह! नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Embed widget