एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 21 June 2022 : परिवहन  मंत्री अनिल परब ईडी कार्यालयात

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 21 June 2022 : परिवहन  मंत्री अनिल परब ईडी कार्यालयात

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू... 

संत  ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

कोरोना संकट मागे सारल्यानंतर अखेरीस यंदा पायी वारी होतेय... हा आनंदसोहळा त्यांना याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे... वारकऱ्यांची पावलं त्यामुळे देहू आळंदी नगरीकडे वळली आहेत... आज आळंदीतून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे.

योग दिनानिमित्त 75,000 तरुण करणार योगासने 

दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी देखील जगभरात 21 जून 2022 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. योग दिनाच्या निमित्ताने देशाच्या विविध भागात कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त देशभरातील 75000 हून अधिक तरुण योगासने करणार  आहेत.

राहुल गांधी आजही ईडीच्या चौकशीला राहणार

नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ED) काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. त्यांची काल सुमारे 10 तास चौकशी झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांना बुधवारीही चौकशीसाठी ईडीने बोलावले आहे. गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस त्यांची चौकशी करण्यात आली.

शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आज विरोधी पक्षांची बैठक

राष्ट्रपती निवडणुकीतील उमेदवारीबाबत विरोधी पक्षांची बैठक आज  होणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे. त्याचबरोबर 12 पक्ष या बैठकीत सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीत सहभागी होऊ शकणार नाहीत. मात्र त्यांच्या जागी तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहू शकतात.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. दापोलीतल्या रिसॉर्टप्रकरणी त्यांना उद्या सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. ईडीकडून अनिल परब यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहेत. यापूर्वी त्यांना ९ जूनला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र नियोजीत कार्यक्रमामुळे हजर राहू शकत नसल्याचं त्यांनी कळवलं होतं. 

आज इतिहासात

1948 : पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्याकडे सूत्रे

1949 : राजस्थान उच्‍च न्यायालयाची स्थापना

2006 : नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे ’निक्स’ व ’हायड्रा’ असे नामकरण करण्यात आले.

2015  : 21 जून : आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) 

15:53 PM (IST)  •  22 Jun 2022

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची पुन्हा हायकोर्टात धाव

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे.  जुहू येथील 'अधीश' बंगल्यावरील कारवाईविरोधात केलेलं अपील प्राधिकरणानं फेटाळलं आहे. 24 जूनपर्यंत बंगल्यातील  बेकायदेशीर बांधकामावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत,  कारवाईवर दिलेली स्थगिती वाढवण्याची मागणी करणार आहे. उद्या तातडीची सुनावणी आहे

15:44 PM (IST)  •  22 Jun 2022

Anil Parab : परिवहन  मंत्री अनिल परब ईडी कार्यालयात

Anil Parab : परिवहन  मंत्री अनिल परब ईडी कार्यालयात पोहचले आहेत. 

21:47 PM (IST)  •  21 Jun 2022

Breaking News: पोलीस अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्याकडूनच चाकू हल्ला; अधिकारी गंभीर जखमी

Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरातील पोलिस दलात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली असून, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यावर पोलीस ठाण्यातच चाकू हल्ला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चाकू हल्ला करणारा सुद्धा पोलिस कर्मचारीच असल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. 

व्यंकटेश केंद्रे असे हल्ला झालेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. केंद्रे हे जिंसी पोलीस स्टेशनचे ठाणेप्रमुख आहे. तर हल्ला करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव शेख मुजाहिद असल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रे हे आपल्या कॅबिनमध्ये बसले असताना मुजाहिदने त्यांच्यावर हल्ला केला. ज्यात केंद्रे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अपेक्स रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याचं बोलले जात आहे. 

20:24 PM (IST)  •  21 Jun 2022

चंद्रपूरमधील वरवट गावात वीज पडून तिघांचा मृत्यू

चंद्रपूरमधील वरवट गावात वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे. रामटेके कुटुंबातील 2 मुली आणि आईचा मृत्यू झाला आहे. 

15:15 PM (IST)  •  21 Jun 2022

सांगली : सावकारी कर्जानेच एकाच कुटुंबातील 9 जणांची सामूहिक आत्महत्या

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील 9 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. ही आत्महत्या सावकारी कर्जापोटीच झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये काही महिन्यांपूर्वी सांगली पोलिसांनी तडीपार केलेल्या सावकार धुमाळ पिता पुत्राचा समावेश आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget