Maharashtra News LIVE Updates : ओबीसी आरक्षण प्रकरणात 25 तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
International Mother Language Day : आज जागतिक मातृभाषा दिन, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व
World Mother Language Day : जगभरात 21 फेब्रुवारी रोजी जागतिक मातृभाषा दिवस साजरा केला जातो. जगभरातील भाषा आणि सांस्कृतिक विविधता जोपासणे आणि त्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश्य आहे. युनेस्कोने 17 नोव्हेंबर 1999 रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती.
जगात सुमारे ७ हजार भाषा बोलल्या जातात. भारतातही प्रामुख्याने २२ भाषा बोलल्या जातात. भारतात जवळपास 1300 च्या आसपास मातृभाषा आहेत. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या दिवशी जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. यानिमित्ताने शिक्षण आणि साहित्याशी निगडित लोक विविध भाषांबद्दल चर्चा करतात. मातृभाषेबद्दल जागरूकता निर्माण करणे, भाषिक विविधता जोपासणे, त्याचे महत्त्वदेखील अधोरेखित केले जाते. जगात काही मातृभाषा लोप पावत असल्याबद्दलही जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जाते. मातृभाषेचे संवर्धन करणे, मातृभाषेचा प्रचार-प्रसार करण्याबाबत धोरण ठरवले जाते.
21 फेब्रुवारी रोजी का साजरा करतात मातृभाषा दिवस
Sangamner News : बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावात रात्री 8 च्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात हिराबाई एकनाथ बढे या 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मेंढवण शिवारातील बढे वस्तीजवळ ही घटना घडली आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरातील वाघ जेरबंद
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. ऊर्जानगर वसाहतीतील न्यू एफ गाळा येथे दृष्टीस पडलेला वाघ अखेर जेरबंद झाला आहे. हा वाघ नर असून अंदाजे 2 वर्षांचा आहे.
Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचे नाव बदलण्याची केली मागणी
Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. संजय लीला भन्साळींसह इतरां विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका सादर करण्यात आली आहे. काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी याचिका दाखल केली आहे. सिनेमाच्या नावात 'काठियावाड' असल्यानं शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचा अमीन पटेलांचा आरोप आहे. तसेच वेश्या व्यवसाय चालणा-या तीन गल्ल्यांमुळे संपूर्ण कामाठीपुराचं नाव बदनाम करणं योग्य नसल्याचा दावादेखील करण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
Nandurbar News: दोन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्याला शिक्षा
Nandurbar News: वाघोदा येथे दोन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. शिवदास उर्फ काल्या भाईदास ठाकरे असं त्याचं नाव आहे.
ओबीसी आरक्षण प्रकरणात 25 तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी
महाविकास आघाडी सरकारची ओबीसी आरक्षणावरची सर्वात मोठी परीक्षा 25 फेब्रुवारीला होणार आहे. कारण, ओबीसी आरक्षण प्रकरणात 25 तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अंतरिम रिपोर्टनुसार निवडणुकांना परवानगी द्यावी असा अर्ज राज्य सरकारकडून दाखल करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार की नाही याचे उत्तर याचं सुनावणीवर अवलंबून आहे.