एक्स्प्लोर
Maharashtra Breaking News LIVE Updates : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Key Events
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
New Corona Guidelines : राज्यासह मुंबईतही कोरोना निर्बंध शिथील; पाहा काय सुरु, काय बंद?
Maharashtra New Corona Guidelines : संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालणारा कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या राज्यातील वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात निर्बंध लादण्यात आले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार आजपासून म्हणजेच, 1 फेब्रुवारी 2022 पासून सर्व पर्यटनस्थळं, राष्ट्रीय उद्यानं, सफारी सुरू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. तसेच, लग्नसोहळे आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारनं घेतला. त्यानुसार मंगळवारपासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्यानं, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्नसोहळे आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अंत्यसंस्काराठी 20 व्यक्तींची मर्यदा हटविण्यात आली असून आता कितीही लोकांना उपस्थित राहता येईल. अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने, उपहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत 50 टक्के क्षमतेने. मनोरंजनात्मक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने, खुल्या मैदानात किंवा सभागृहात क्षमतेच्या 25 टक्के किंवा 200 लोकांना प्रवेश देण्यात आला आहे.
नव्या नियमावलीनुसार, काय बंद, काय सुरु?
- नॅशनल पार्क आणि जंगल सफारी आधीप्रमाणे नियमीत वेळवर सुरु होतील. येथे भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांचं लसीकरण पूर्ण झालेलं असणं बंधनकारक आहे. तसेच मास्कही वापरण्यात यावा. दोन्ही ठिकाणी भेट देण्यासाठी ऑनलाईन तिकिट बूक करावं लागेल.
- सर्व पर्यटनस्थळे नियमीत वेळेवर सुरु होतील. ऑनलाईन तिकिट खरेदी करावी लागेल. तसेच पर्यटनस्थळावर फिरायला जाणाऱ्याचं लसीकरण झालेलं असावं.
- स्पा, ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये 50 टक्के उपस्थिती असावी.
- अंत्ययात्रामध्ये उपस्थितीवर मर्यादा ठेवण्यात आल्या नाहीत. किती लोक उपस्थित राहू शकतात.
- उपहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत 50 टक्के क्षमतेनं.
- अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेनं सुरु होतील.
- हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाट्यगृहांची वेळ स्थानिक प्रशासन ठरवणार
मुंबईकरांनाही दिलासा! मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवली
कोरोनाचा प्रादुर्भाव घटत असल्यानं मुंबईत पालिका क्षेत्रातील निर्बंध शिथील (Mumbai New Corona Guidelines) करण्यात आले आहेत. मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईतील समुद्र किनारे, गार्डन, पार्क खुले होणार आहेत. याशिवाय स्विमींग पूल, वॉटर पार्क, थिम पार्क 50 टक्के क्षमतेने सुरु होणार आहेत.
ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. मुंबईतील रुग्णसंख्या दोन दिवसापासून हजाराच्या आत आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या आता नियंत्रणात आल्याने मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. लग्नसोहळे आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
नव्या नियमावलीनुसार, काय बंद, काय सुरु?
पर्यटनस्थळे, आठवडी बाजार, समुद्रकिनारे, गार्डन, पार्क सुरु राहणार
अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेनं सुरु होतील.
हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाट्यगृहांची 50 टक्के क्षमतेनं सुरु
लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी
भजन, धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांना 50 क्षमतेनं परवानगी
21:02 PM (IST) • 02 Feb 2022
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे.
18:43 PM (IST) • 02 Feb 2022
देशातील बेरोजगारांबद्दल एकही शब्द नाही : राहुल गांधी
राष्ट्रपतींच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर राहुल गांधीचं लोकसभेत भाषण. देशातील बेरोजगारांबद्दल एकही शब्द नाही, गेल्या पन्नास वर्षातील सर्वात अधिक बेरोजगारी सध्या देशात आहे. टीका केल्यास केंद्र सरकारला का सहन होत नाही?, राहुल गांधींचा सवाल.
18:42 PM (IST) • 02 Feb 2022
गेल्या वर्षी देशात 3 कोटी लोक बेरोजगार झाले : राहुल गांधी
गेल्या वर्षी देशात 3 कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. देशातील बेरोजगारांबाबत एकही शब्द काढलेला नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
17:56 PM (IST) • 02 Feb 2022
आमदार नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
आमदार नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे
17:32 PM (IST) • 02 Feb 2022
बीडमधील मांगवडगावच्या तिहेरी हत्याकांडातील आरोपींना जन्मठेप
दोन वर्षांपूर्वी बीडच्या केस तालुक्यातील मांगवडगावमध्ये शेतीच्या जुन्या वादातून तिघांची निर्घृण हत्या झाली होती. या तिहेरी हत्याकांडातील पाच आरोपींना आज अंबाजोगाई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. तर अन्य आरोपींना निर्दोष सोडण्यात आले आहे. पाच आरोपी सचिन मोहन निंबाळकर, हनुमंत उर्फ पिंटु मोहन निंबाळकर, बाळासाहेब बाबुराव निंबाळकर, राजाभाउ हरिश्चंद्र निंबाळकर, जयराम तुकाराम निंबाळकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
Load More
Tags :
Maharashtra Live Updates Marathi News Marathi Political News News Alerts Covid-19 News Breaking Live Updatesमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement