एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 18 July 2022 : तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या खेड-भीमाशंकर राज्य रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा; नितीन गडकरींची घोषणा  

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 18 July 2022 : तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या खेड-भीमाशंकर राज्य रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा; नितीन गडकरींची घोषणा  

Background

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

आज राष्ट्रपतीपदाची निवडणूक
राष्ट्रपती पदासाठी एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना तर विरोधकांकडून यशवंत सिन्हांना उमेदवारी देण्यात आली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदार आणि सगळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेतील आमदार राष्ट्रपती पदासाठी मतदान करणार आहेत. प्रेफरन्शियल व्होटिंगद्वारे ही मतदान प्रक्रिया पार पडते. सकाळी10 ते संध्याकाळी 5 या वेळेत संसदभवन आणि राज्यांच्या विधिमंडळात मतदान पार पडेल. शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांचा मुक्काम काल रात्रीपासून ट्रायडंट हॉटेलमध्ये आहे. गेले दोन दिवस मतदानाबाबत शिंदे गट- भाजपाच्या बैठका सुरु आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांची सकाळी 9 वाजता विधान भवनात बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला अजित पवार आणि जयंत पाटील मार्गदर्शन करतील.

संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून
संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. सरकारकडून अधिवेशनात 24 नवीन विधेयकं मांडली जाणार आहेत. दोन्ही सभागृहांचं कामकाज सकाळी 11 वाजता सुरु होणार आहे. पंतप्रधान मोदी सकाळी 10 वाजता संसद भवनात दाखल होतील आणि माध्यमांशी संवाद साधतील. अधिवेशनात अग्नीपथ, असंसदीय शब्दांची यादी, संसद परिसरातील आंदोलनांना बंदी या विषयांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

आज जगदीप धनकड उपराष्ट्रपती पदासाठी नामांकन अर्ज भरणार
एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनकड आज सकाळी 10.30 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विरोधकांकडून मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. मार्गारेट अल्वा 19 जुलैला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 

आजपासून खाद्यपदार्थ आणि घरगुती वापराच्या वस्तू महागणार
पनीर, दूध, लस्सी असे पदार्थ, स्टेशनरी वस्तू, किराणा माल आदी गोष्टी आजपासून महागणार आहेत. या गोष्टींना जीएसटीतून देण्यात आलेली सूट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापाऱ्यांनी विविध मार्गांनी या निर्णयाला विरोध केला आहे.

थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा इशारा
उत्तर ओडिशा भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने आणि गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो.  किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग देखील अधिक असणार. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज गोंदिया आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

पंढरपूरमध्ये 40 जणांना विषबाधा
पंढरपूर येथील श्री विठ्ठल आश्रम या ठिकाणी 40 जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या सर्वांवर सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.  

ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम हा पुरंदर तालुक्यातील वाल्हे या ठिकाणी असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान घातले जाईल. पंढरपूरला जाताना आणि पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परतीच्या प्रवासावेळी देखील नीरा स्नान घातले जाते.

20:43 PM (IST)  •  18 Jul 2022

नागपुरात भंगार गोदामात स्फोट 

नागपुरातील पारडी पोलीस ठाण्याअंतर्गत एका भंगाराच्या गोदामात स्फोट झाला आहे. नागपुरातील पुलगाव येथील आयुध निर्माणीतून आलेल्या भंगारात स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. 

पारडी येथील भंगार व्यापाऱ्याने पुलगाव येथील आयुध निर्माणीतून काही भंगार खरेदी करून आणले होते.  भंगार व्यापाऱ्याकडील कर्मचारी त्यापैकी एक सेल कापताना त्यात स्फोट झाला आणि त्यामध्ये गुड्डू रतनेरे या 52 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. 

19:51 PM (IST)  •  18 Jul 2022

Nagpur Covid Update : 39 कोरोनाबाधित रुग्णालयात भरती, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

नागपूरः जिल्ह्यात दररोज कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत असून रविवारी एकाच शाळेतील 38 विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. दुसरीकडे सध्या 39 कोरोना बाधितांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आल्याने नागरिकांमध्येही भितीचे वातावरण आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार 68 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. तर जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितसंख्या 1194 वर पोहोचली आहे.

16:48 PM (IST)  •  18 Jul 2022

तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या खेड-भीमाशंकर राज्य रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा; नितीन गडकरींची घोषणा  

तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या खेड-भीमाशंकर राज्य रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. 

16:39 PM (IST)  •  18 Jul 2022

पुणे जिल्ह्यातील नगर परिषद आणि महापालिकांच्या निधीला शिंदे - फडणवीस सरकारकडून स्थगिती

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुणे जिल्ह्यातील नगर परिषद आणि महापालिकांना देण्यात आलेल्या निधीला शिंदे - फडणवीस सरकारने स्थगिती दिलीय.  महाविकास आघाडी सरकारकडून पुणे जिल्ह्यासाठी 340 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.  त्यापैकी 270 कोटी रुपयांचा निधी बारामती नगरपरिषदेला, 28 कोटी पुणे महापालिकेला, साडे तेरा कोटी रुपये पिंपरी-चिंचवड महापालिकेला तर इतर नगरपरिषदांना अल्प प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला होता. 

16:21 PM (IST)  •  18 Jul 2022

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाची सुनावणी एक दिवस लांबणीवर, महाराष्ट्रातल्या दोन महत्त्वाच्या सुनावण्या 20 जुलैला

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाची सुनावणी एक दिवस लांबणीवर.  महाराष्ट्रातल्या दोन महत्त्वाच्या सुनावण्या 20 जुलैला एकाच दिवशी होणार आहे. 

 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Embed widget