Maharashtra Breaking News LIVE Updates : अखेर राजापेठ उड्डाणपुलावर पुतळ्याला मनपाच्या आमसभेत मंजुरी
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
People Died In Kushinagar's Wedding Program : उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे लग्नसमा लग्नसोहळ्याच्या आनंदावर विरझण पडलं असून त्याचं रुपांतर शोकात झालं. जिल्ह्यातील नेबुआ नौरंगिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत विहिरीत पडून 11 लहान मुलं आणि महिलांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. लग्नासोहळ्याचे विधी पार पडत असताना हा अपघात झाला. यावेळी विहिरीच्या स्लॅबवर लहान मुलं आणि महिला बसल्या होत्या, विहिरीच्या स्लॅबवर जास्त भार पडल्यामुळं तो कोसळला आणि त्यावर बसलेले सर्वजण विहिरीत पडले. या अपघातामुळं लग्नाच्या आनंदाचं रूपांतर शोकात झालं आहे. सध्या प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. विहिरीतून मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत.
कुशीनगरचे जिल्हा दंडाधिकारी एस. राजलिंगम यांनी या दुर्घटनेबाबत बोलताना सांगितलं की, "अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल." ते म्हणाले, "नौरंगिया टोला गावात एक जुनी विहीर होती, जिच्यावर स्लॅब होता. त्या स्लॅबवर लग्नसोहळ्या दरम्यान लहान मुलं आणि महिला बसल्या होत्या, त्या दरम्यान स्लॅब कोसळला आणि मलबा त्यांच्यावर पडला. बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
Petrol-Diesel Price Today 17 February 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी (Oil Companies) पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) चे आजचे दर जारी करण्यात आले आहेत. आजही इंधनांच्या किमतींमध्ये कोणताही खास बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, गेल्या वर्षात 3 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कावर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर घट केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आलं. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत.
निवडणुकांनंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती कडाडणार?
सध्या देशात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. याच पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर (Petrol Price Today) असल्याचं बोललं जात आहे. अशातच निवडणुकांनंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा कडाडणार असल्याचं बोललं जात आहे. कच्च्या तेलाच्या भावात 2014 सालानंतर पहिल्यांदाच मोठी वाढ झाली आहे. भारताला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. निवडणुकांनंतर भारतातील पेट्रोल-डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुचाकीच्या अपघातात मारेगाव येथील दोन युवकांचा मृत्यू
दुचाकीच्या अपघातात मारेगाव येथील दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. पांढरकवडा तालुक्यातील मांगुर्डा गावाजवळ ही घटना घडली. जिवन बुधाराम गेडाम (27), नितीन सुरेश रायपुरे (38) रा. मारेगाव असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत.
अखेर राजापेठ उड्डाणपुलावर पुतळ्याला मनपाच्या आमसभेत मंजुरी
बीड जिल्ह्यातील अवैद्य गर्भपाताची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयाचे मिळणार बक्षीस
बीड जिल्ह्यातील अवैद्य गर्भपाताची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयाचे मिळणार बक्षीस - जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे
चंद्रपूर - सहा नगरपंचायतींपैकी ५ ठिकाणी महाविकास आघाडी तर एका ठिकाणी भाजपचा अध्यक्ष
मुंबईतील कामाठीपुरा येथे भीषण आग
मुंबईतील कामाठीपुरा येथे आग लागली आहे. घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या 4 ते 5 गाड्या रवाना केल्या आहेत.