(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News LIVE Updates : चंद्रपूर जिल्ह्यात ट्रक-दुचाकीची धडक, अपघातात तीन युवकांचा मृत्यू
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
संजय राऊतांचा सोमय्या पिता-पुत्रांवर हल्लाबोल; आरोपांवर आज सोमय्या दिल्लीत प्रत्युत्तर देणार
Kirit Somaiya Press Conference On Sanjay Raut : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा उल्लेख मुलुंडचा दलाल असा केला. मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो, ईडीच्या (ED) धाडी पडणार, असंही राऊत म्हणाले आहेत. तर मुख्यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सोमय्यांनी ते 19 बंगले दाखवावं नाही तर शिवसैनिक जोड्यानं मारतील असा इशारा दिला आहे. अशातच आज सकाळी राऊतांच्या आरोपांना उत्तरं देण्यासाठी साडेनऊ वाजता किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेणार आहेत. सध्या किरीट सोमय्या दिल्लीत असून दिल्लीतून पत्रकार परिषद येणार आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केलेल्या आरोपानंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे दिल्लीमध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे. संजय राऊतांच्या आरोपांवर आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या उत्तर देणार आहेत.
ABG Bank Fraud : काही राज्यांनी CBIच्या तपासाची संमती काढून घेतल्याने अनेक अडचणी: सीबीआयचा राज्य सरकारांवर गंभीर आरोप
ABG Bank Fraud Case: बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळ्याप्रकरणी (22842 कोटी रुपये) आठ आरोपींच्या विरोधात सीबीआयने लूक आऊट नोटीस जारी केली आहे मात्र काही राज्यांनी CBIच्या तपासाला दिलेली सर्वसाधारण संमती काढून घेतल्याने अनेक अडचणी येत असल्याचा गंभीर आरोप सीबीआयनं काही राज्य सरकारांवर केला आहे. एबीजी शिपयार्डप्रकरणी सीबीआयकडून सविस्तर प्रेस रिलीज जारी करण्यात आली आहे. या प्रकरणी संचालक ऋषी अग्रवाल आणि 8 आरोपींविरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आली असून सर्व आरोपी भारतातच असल्याची माहिती आहे.
12 फेब्रुवारी रोजी 12 ठिकाणी सीबीआयकडून धाडसत्र टाकण्यात आले. यात कंपनी खात्यांची पुस्तके, खरेदी-विक्रीचा तपशील, विविध कराराच्या फाइल्ससोबतच अन्य महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
एबीजी शिपयार्ड कंपनीकडून अनेक नियमबाह्य कामं, बॅंकांची कर्ज परदेशात वळवत तिथे मोठी गुंतवणूक, काही जणांच्या नावे मोठी मालमत्ता खरेदी करण्यासाठी निधी वळवण्यात आल्याचा आरोप आहे. सीबीआयला सुरुवातीच्या तपासात असं लक्षात आलं की 2005 ते 2012 हा कालावधी गंभीर असून मोठी आर्थिक अनियमितता आहे.
सीबीआयने पत्रकात असंही म्हटलंय की, त्यांना अनेक महत्त्वाच्या प्रकरणांची नोंद करण्यात अडचण येत आहे. कारण काही राज्यांनी सीबीआयच्या चौकशीतून सर्वसाधारण संमती (जनरल कंसेन्ट) काढून घेतली आहे. काही राज्यांनी सीबीआयच्या तपासाला दिलेली सर्वसाधारण संमती काढून घेतल्याने अनेक अडचणी येत आहेत असा गंभीर आरोप सीबीआयनं राज्य सरकारांवर केला आहे.
ट्रक-दुचाकीच्या धडकेत तीन युवकांचा मृत्यू
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून 10 वकिलांची नियुक्ती करण्याची शिफारस
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून 10 वकिलांची नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे.
Aurangabad: एका गाडीत महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळला
औरंगाबाद गांधेलीनी परिसरातील एका गाडीमध्ये 35 ते 40 वर्षीय महिला आणि पुरुष याचा मृतदेह आढळला आहे. गाडी आतून जळालेली असून एसी चालू असताना स्फोट झाल्याची पोलिसांनी शंका व्यक्त केली आहे. अद्याप गाडीतील व्यक्तींची ओळख पटली नाही.
20 हजार रुपयांची लाच घेताना सरपंचाला अटक
पालघरमधील चिंचणी ग्रामपंचायतीच्या लाचखोर सरपंचाला वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचा हा सरपंच असून पालघर लाच लुचपत विभागाने त्याला अटक केली आहे. खाजगी विकासकाकडून घरपट्टी आणि नाहरकत दाखला देण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती.
येस बँकेच संस्थापक आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी राणा कपूर यांना दिलासा
Yes Bank : येस बँकेच संस्थापक आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी राणा कपूर यांना दिलासा मिळाला असून मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर झाला आहे. राणा कपूर यांना कठोर अटीशर्तींवर जामीन मंजूर झाला असून देशाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच पासपोर्ट जमा करण्याचे आणि तपासयंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश त्यांना यावेळी देण्यात आले आहेत.