Maharashtra Breaking News Live 15 September 2022 : नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम, गंगापूर धरणातून 7 हजार क्युसेकने विसर्ग

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Sep 2022 01:36 PM
शिवतीर्थावर दसरा मेळाव्याच्या परवानगीवरुन अनुचित प्रकार होऊ नये यासाठी दादरमध्ये महापालिकेच्या जी नॉर्थ कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

Mumbai News : दादर इथे होणाऱ्या दसरा मेळाव्यावरुन सध्या शिवसेना आणि शिंदे गट यामध्ये जुंपली आहे. शिवतीर्थावर परवानगी मिळावी यासाठी प्रशासनावर दोन्ही बाजूने दबाव निर्माण झाला आहे दादर इथल्या जी नॅार्थ या महापालिकेच्या कार्यालयाबाहेर राजकीय राडा होण्याची शक्यता लक्षात घेऊन इथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परवानगी मिळेपर्यंत जी नॅार्थ ॲाफिसच्या बाहेर मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

Nashik Rain : गंगापूर धरणांतून विसर्ग वाढविला, दुतोंडया मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी

Nashik Rain : नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असल्यामुळे गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. सकाळी केलेल्या विसर्गामध्ये होऊन 7 हजार क्यूसेकने गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरीची पाणी पातळीत वाढ झाल्याने दुतोंडया मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे. दरम्यान गंगापूर पाणलोट क्षेत्रातील त्र्यंबकेश्वर, गिरणारे परिसरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. तसेच अंबोली, वेलुंजे आदी परिसरात पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून नाशिक शहरात मात्र अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. 

Mumbai Fire : कूपर रुग्णालयात लागलेली आग नियंत्रणात, कोणतीही जीवित हानी नाही

मुंबईचा विलेपार्ले पश्चिमेत असलेल्या कूपर रुग्णालयामध्ये मोठी आग.


कूपर हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये असलेल्या स्टोअर रूममध्ये संध्याकाळी चारच्या सुमारास लागली आग.


घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाचा चार गाड्या घटना स्थळावर दाखल होऊन तब्बल अर्धा तासांमध्ये आगीवर मिळवले नियंत्रण.


सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नसून मात्र स्टोर रूम मध्ये असलेला कपडे जळून खाक झाले आहेत.


वायर मध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे.


सध्या फायर कूलिंगचे काम सुरू आहे. 

बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. सुनील धांडे यांचा शिवसेनेत प्रवेश  

बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. सुनील धांडे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत धांडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.  प्राध्यापक सुनील धांडे हे मागच्या काही वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होते. बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत ते मागच्या अनेक दिवसांपासून बीडच्या राजकारणात सक्रिय होते. आता मात्र त्यांनी राष्ट्रवादी सोडून शिवबंधन हाती बांधले आहे. 

Mumbai Rain : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबईच्या पश्चिम उपनगरात दहिसर, बोरीवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव परिसरात गेल्या 15 मिनिटांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. 

Sharad Pawar: प्रकल्पासाठी तळेगावची जागा योग्य होती. राज्याबाहेर प्रकल्प जाणे हे दुर्देवी: शरद पवार

Sharad Pawar: प्रकल्पासाठी तळेगावची जागा योग्य होती. राज्याबाहेर प्रकल्प जाणे हे दुर्देवी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. 

Sharad Pawar : प्रकल्प गुजरात गेल्यावर आता चर्चा नको; शरद पवार यांची प्रतिक्रिया

 Sharad Pawar : वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरात गेल्यावर आता त्यावर चर्चा नको अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. 

भिवंडी : पडघा येथील टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पडघा येथील टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आमदार शांताराम मोरे यांनी रस्त्यावर उतरून टोल नाक्यावरून वाहन टोल न भरताच सोडून दिली. या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने टोल वसुली बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचं आमदार शांताराम मोरे यांनी सांगितलं आहे.

Majha Katta : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पापेक्षा दुप्पट नोकऱ्या महाराष्ट्रात देणार, उदय सामंतांचं आश्वासन

Uday Samant on Foxconn : वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्पातून जेवढ्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्याच्या दुप्पट नोकऱ्या पुढच्या काळात महाराष्ट्रात आणण्याची जबाबदारी मी घेतो असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिले. पुढच्या वर्षी याचवेळी नोकरी लागल्याचा डेटा महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवेल असे देखील सामंत यावेळी म्हणाले. माझा विश्वास कामावर आहे. मी त्यानुसार वागत असल्याचे त्यांनी सांगितलं. उदय सामंत हे आज (15 सप्टेंबर)  एबीपी माझाच्या (ABP Majha) 'माझा कट्टा' (Majha Katta) या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सध्या विरोधक करत असललेले दावे फेटाळून लावले. तसेच फॉक्सकॉन प्रकल्पाच्या संदर्भात माहिती देखील दिली.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

इंदापूर : 13 वर्षीय दिव्यांग मुलीवर वारंवार अत्याचार
इंदापूर तालुक्यातील गावात सहावीत शिकणाऱ्या 13 वर्षीय दिव्यांग मुलीवर वारंवार अत्याचार झाल्याची घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपी महिला शुभांगी अमोल कुचेकर हिला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील बलात्कारी आरोपी अनिल नलावडे आणि नाना बगाडे या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल नलावडे याने वारंवार या मुलीवर बलात्कार केल्याची फिर्याद या मुलीच्या आईने दिल्यानंतर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. नोव्हेंबर 2021 ते एप्रिल 2022 या कालावधीत मुलीवर वारंवार बलात्कार करण्यात आला. शुभांगी कुचेकर ही महिला सहावीत शिकणाऱ्या या मुलीला गोड बोलून फिरायला न्यायची आणि गाडीतून आलेल्या अनिल नलावडेबरोबर उसाच्या शेतात पाठवायची अशा धक्कादायक प्रकारे ही घटना घडली. मागील आठवड्यात या मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला बारामतीत तपासणीसाठी नेल्यानंतर ही मुलगी गरोदर असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मुलीने सर्व प्रकार सांगितला आणि मुलीच्या आईने वालचंदनगर पोलिसांकडे धाव घेतली.
सिंधुदुर्ग : सागरी सुरक्षा प्रभावी करण्यासाठी मच्छीमारांना देण्यात येणार विशेष आधारकार्ड

रायगडमधील हरिहरेश्वर किनाऱ्यावर सापडलेल्या संशयित बोटीच्या अनुषंगाने कोकण किनारपट्टीवरील सागरी सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी कोकणातील मच्छीमार नौकेवरील मालक, तांडेल आणि खलाशांना विशेष आधारकार्ड देण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने 'क्यूआर -कोड' असलेले हे आधार कार्ड देण्यात येणार असून सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारने एक पाऊल उचलले आहे. या आधारकार्ड मुळे संशयास्पद गोष्टीना आळा घालणे शक्य होईल.

यवतमाळ : सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलानेच केली पोलिस कर्मचाऱ्यांची हत्या
जुन्या वादाच्या कारणातून सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलानेच पोलिस कर्मचाऱ्यांची हत्या केल्याची घटना यवतमाळच्या पोलीस मुख्याल्याच्या गेटसमोर मद्यरात्रीच्या सुमारास घडली. अवधुतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे. निशांत खडसे, असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मृतक हा  पोलीस मुख्यालयातील बँड पथकमध्ये कार्यरत होता.  जुन्या वादाच्या कारणावरून झालेल्या भांडनातून मध्यरात्री च्या सुमारास हत्या केली. यावेळी हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर वार केल्यानं त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी यांचा मुलगा अभिषेक बोंडे आणि त्याचा मित्र कुंदन मेश्राम या दोघांना अवधुतवाडी पोलिसांनी अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
कोकणात पावसाचा मुक्काम लांबण्याची शक्यता, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

कोकणात हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस आणि त्यापुढील दिवसांत मोसमी पाऊस सक्रिय राहणार आहे. त्यामुळे कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. सिंधुदुर्गात तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आजही जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी, कुडाळ तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भातशेती, सुपारी पीक धोक्यात आले आहे. फुलोरा येण्याच्या स्थितीत पाऊस पडत असल्याने भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे तर अति पावसामुळे कोळे रोगाचा सुपारीवर प्रादुर्भाव होत असल्याने सुपारी गळून पडत आहे.

सांगली : साधू मारहाण प्रकरण पोलीस साधूंचा जबाब नोंदवणार

पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या चार साधूंना मारहाण करणाऱ्या सात आरोपीना आज दुपारी जत न्यायालयात हजर केले जाणार आहे. जत तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या लवंगा परिसरातील ग्रामस्थांनी या साधूंना बेदम मारहाण केली होती. मुले चोरणारी टोळी असल्याची संशयावरून ही मारहाण झाली होती. चार चाकी गाडीतून ओढून रस्त्यावर लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.  एकूण 25 जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल  असून, अन्य आरोपीचा शोध सुरू आहे. अटकेत असलेले आमसिध्दा तुकाराम सरगर आणि लहु रकमी लोखंडे, हे दोघे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. आमसिध्दा तुकाराम सरगर हा लवंगा गावच्या काँग्रेसच्या सरपंच बायक्का तुकाराम सरगर यांचा मुलगा आहे. आणि लहू रकमी लोखंडे हा माजी सरपंच आहे.  सागर शिवाजी तांबे, रमेश सुरेश कोळी, सचिन बसगोंडा बिराजदार व शिवाजी सिधराम सरगर अशी अटकेतील अन्य लोकांची नावे आहेत. 

धुळे : बनावट कंपन्या उभारून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

वित्तीय फर्ममध्ये पैसे गुंतवले तर आकर्षक व्याजदर मिळेल अशी बतावणी करून दोंडाईच्यातील अनेक गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट फर्मच्या माध्यमातून गंडा घातल्याची रक्कम तब्बल दीड कोटींच्या घरात आहे. एका गुंतवणूकदाराच्या तक्रारीवरून फर्मच्या संचालकांसह कलेक्शन करणाऱ्या दोन एजंटवरही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम तब्बल 76 कोटी रुपये असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, यातून निव्वळ 56 कोटी रुपये हे धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची रक्कम असून गुन्ह्याच्या तक्रारीत तब्बल 1 कोटी 40 लाख 50 हजार 508 रुपयांची गुंतवणुकीची फसवणूक झाल्याच्या प्राथमिक तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

कोल्हापूर : नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी ई-पासची सुविधा

यंदाच्या नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी ज्यांना रांगेत उभा राहायचं नाही अशा भाविकांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पेड ई पास सुविधा उपलब्ध केली आहे. पेड दर्शन असू दे पण व्हीआयपी दर्शन नको म्हणत, या निर्णयाचे काहीजण स्वागत करत आहेत. तर काहींनी विरोध दर्शवला आहे. व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली अनेकांना दर्शनासाठी सोडावं लागतं. त्यामध्येच देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा बहुतांश वेळ वाया जातो. त्यामुळे आता ज्यांना रांगेत उभा राहायचं नाही त्यांच्यासाठी पेड ई-पासची सुविधा केली आहे. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी दिली. तर याला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे.

रत्नागिरी : आदित्य ठाकरे यांच्या स्वागताच्या बॅनरवर खूनातील आरोपीचा फोटो

आदित्य ठाकरे यांच्या स्वागताच्या बॅनरवर खूनातील आरोपीचा फोटो...


 उद्या आदित्य ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा...

 

 आपल्या दौऱ्या दरम्यान आदित्य ठाकरे रत्नागिरी आणि दापोली इथे कार्यकर्तेशी साधणारा संवाद...

 

 स्वप्नाली सावंत यांचा खून करणाऱ्या आरोपीचा फोटो आदित्य ठाकरे यांच्या स्वागताच्या बॅनरवर असल्यानं खळबळ...

 
सिंधुदुर्ग : तळकोकणात अतिवृष्टीमुळे 183 हेक्टर भात शेतीचे नुकसान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे गेल्या तीन महिन्यांत सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला पाठवला आहे. यामध्ये भातशेतीसह अतिवृष्टीत 250 गावे बाधित झाली असून अनेक घरांना नुकसान झाली. तर दोघांचा मृत्यू आणि नऊ जनावरे दगावली आहेत. या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे अहवाल पाठविला आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत 183 हेक्टर वरील भात शेतीचे देखील नुकसान झाले आहे. यामध्ये सावंतवाडी तालुक्यात 146 हेक्टर, वेंगुर्ले 0.89 हेक्टर, कुडाळ 14.25 हेक्टर, देवगड 0.05 हेक्टर, वैभववाडी 0.65 हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत दीड कोटीचे नुकसान गेल्या तीन महिन्यांमध्ये झाले असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

नाशिक : सुरक्षारक्षकाला जाग आल्याने मोबाईल दुकानातील चोरीचा प्रयत्न फसला

नाशिकमध्ये सुरक्षारक्षकाला जाग आल्याने मोबाईल दुकानातील चोरीचा प्रयत्न फसला असून चारचाकीमधून आलेल्या चोरट्यांना आपल्या एका साथीदाराला सोडूनच पळून जाण्याची वेळ आलीय. काही चोरट्यानी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एमजी रोडवरील एक मोबाईल दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र जवळच असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या हा प्रकार लक्षात येताच, त्याने आरडाओरड केली आणि चारचाकीमधून आलेले चोरटे आपल्या एका साथीदाराला सोडूनच पळून गेलेत. ही संपूर्ण घटना एका दुकानाबाहेरील सीसीटीव्ही मध्ये कैद झालीय. सध्या पोलीस या चोरांचा शोध घेतायत. 

उस्मानाबाद : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांची उस्मानाबाद ते मुंबई पदयात्रा
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी उ्स्मानाबादच्या शिवसैनिकांची उस्मानाबाद ते मुंबई पदयात्रा….शिवसेना पक्षासाठी दसरा मेळावा महत्त्वाचा मानला जातो. या मेळाव्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आजपर्यंत शिवसैनिकांचे कान आतूरलेले असायचे. त्यांच्या विचारांचा वारसा आणि दसरा मेळाव्याची परंपरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढे कायम राखली आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या खंडानंतर यावर्षी मोठ्या दिमाखात शिवतीर्थावर दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी उस्मानाबाद येथील शिवसैनिक भीमा जाधव, सतीश आदरकर, महेश खडके हे उस्मानाबाद ते शिवतीर्थ पायी निघाले आहेत. आज ग्रामदैवत श्री धारासूरमर्दिनी देवीचा आशीर्वाद घेऊन त्यांनी या पदयात्रेला सुरुवात केली.
शिर्डी : जिलेटीन कांडीच्या स्फोटात 13 वर्षीय मुलगा जखमी

निळवंडे उजव्या कालव्यांच्या बोगद्याची कामे सध्या सुरू असून त्या परिसरात एका मुलाला जिलेटिनची कांडी सापडली. मात्र त्याला खेळण समजून 13 वर्षीय यशने तो घरी आणली आणि त्याच्याशी खेळत असताना अचानक स्फोट झाल्याने यश जखमी झालाय. 15 दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील निभेंरे गावात घडलेला प्रकार असून नातेवाईकांनी माहिती दिल्यावर हा प्रकार समोर आलाय. यश अंबरनाथ नागरे हा 13 वर्षीय मुलगा तालुक्यातील निंभेरे येथे खेळत असताना निळवंडे धरनाच्या उजव्या कालव्याच्या बोगद्याच्या चालू असलेल्या कामाजवळ त्याला सफेद रंगाच्या दोन पुड्या सापडल्या यशने ऐक पुडी तेथेच टाकून देऊन दुसरी पुडी सोबत घरी आणली आणि खेळत असतानाच त्या जिलेटीनचा मोठा आवाज होऊन स्फोट झाला. सदर घटना घडल्यानंतर यशला उपचारासाठी संगमनेर मधील खाजही रुगणालयात दाखल करण्यात आलं आहे.

नागपूर :
महाराष्ट्रात सणासुदीचे दिवस आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे कारवाई सुरु आहे. दूध, तेल, पनीर यांच्यात भेसळ होत असल्याचे आढळून आले. त्याबाबत विभागीय स्तरावर आणि आयुक्तांना सूचना दिल्याची माहिती राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. खाद्य पदार्थांमध्ये भेसळ आढळून आली तर कठोर कारवाई केली जाईल असेही संजय राठोड म्हणाले. विशेष म्हणजे पुण्यामध्ये सातत्याने नकली पनीरचे प्रकरण समोर येत आहेत.
पंढरपूरच्या विकासासाठी दोन हजार कोटींचा आराखडा तयार, मग आता अधिकाऱ्यांचे दौरे कशासाठी?

पंढरपूरच्या (Pandharpur) विकासासाठी काशीनंतर आता तिरुपती पॅटर्नचा (Tirupati Pattern) अभ्यास करण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक रवाना झाले आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी आणि पंढरपूरचे मुख्याधिकारी या चार अधिकाऱ्यांचे पथक दोन दिवसांच्या तिरुपती दौऱ्यासाठी रवाना झाले आहे. तिरुपती येथे असणारी दर्शन व्यवस्था, भाविकांची निवास व्यवस्था आणि गर्दीचे नियोजन यासंदर्भात माहिती घेतली जाणार आहे. दरम्यान, एका बाजूला दोन हजार कोटींचा आराखडा तयार असताना हे अभ्यास दौरे नेमके कशासाठी? असा सवाल भाविक करत आहेत.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.


 

अहमदनगर : 'स्मशानातील सोन्या'च्या हव्यासापोटी अस्थींचीही चोरी
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील स्मशानभूमीतील राखेला चक्क पाय फुटल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. अंत्यविधीनंतर उरणारी राख अगदी अस्थीसह गायब होत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. आतापर्यंत तीन ते चार वेळा अशा घटना घडल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. करंजी गावातील लिलाबाई वामन यांचे सोमवारी दुःखत निधन झाले. करंजी गावातील उत्तरेश्वराच्या मंदिराजवळ त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले...मात्र दुसऱ्या दिवशी जेंव्हा त्यांचे नातेवाईक अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत गेले तर त्यांच्या अस्थी गायब होत्या. लिलाबाई यांच्या अंगावर पाऊणे दोन तोळे सोने होते त्यांना नथ घालण्याची हौश होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी त्यांना नवीन नथ घातली होती... डाग दागिने गेले याचे दुःख वाटत नाही पण काही घटनांमध्ये थेट अस्थीच चोरून नेल्या जात असल्याने संताप होतो अशी भावना नातेवाईक व्यक्त करत आहेत.
पुणे : शिरूर लोकसभेचा पुढचा उमेदवार येणारा काळ अन भाजपचं राष्ट्रीय नेतृत्वचं ठरवणार

पुण्यातील शिरूर लोकसभेचा पुढचा खासदार हा भाजपचाच असेल. या दाव्यानंतर आता इथला युतीचा उमेदवार कोण असेल? हे भाजपचं राष्ट्रीय नेतृत्व ठरवणार आहे. असं केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी आढळरावांच्या बालेकिल्ल्यात पत्रकार परिषद घेत हे जाहीर केलंय. यामुळं उद्धव ठाकरेंशी काडीमोड घेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाशी घरोबा केलेल्या शिवाजी आढळरावांची मोठी गोची झालीये. केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह यांच्यावर शिरूर लोकसभेत भाजपचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. 

सांगली : शाळेत जाण्यासाठी मुलांची ओढ्यातून जीवघेणी पायपीट

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील वाक्षेवाडी गावामधील सावळा वस्ती वरील शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी ओढ्यातून वाट काढत पायपीट करावी लागतेय. ही गावापासून काही अंतरावरती आहे. या वस्तीवर जाण्यासाठी ओढ्यातून जावे लागते. जाण्यासाठी रस्त्याची सोय नसल्याने पावसाळ्यामध्ये ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यावर गाव आणि वस्ती यांचा संपर्क तुटतो. वस्तीवरील शाळकरी मुलांना शाळेसाठी या ओढ्यातून जीवघेणी कसरत करून यावे लागते. तसेच वस्तीवरील शेतकऱ्यांचे शेत ओड्याच्या अलीकडे असल्यावर त्यांना ओढा ओलांडून जाता येत नाही. यामध्ये विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. स्थानिक प्रतिनिधींना वेळोवेळी रस्त्याबाबत पाठपुरावा करून सुद्धा प्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांची वर्षा बंगल्यावर चर्चा

पुण्यात सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत शिक्षा भोगून आलेल्या सराईत गुन्हागाराकडून हॉटेलची तोडफोड

Pune News : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत शिक्षा भोगून आलेल्या सराईत गुन्हागाराने हॉटेलची तोडफोड केली. आजूबाजूच्या व्यावसायिकांनाही शिवीगाळ करत दुकाने बंद करायला लावली. तुषार उर्फ सोन्या कोळप्पा धोत्रे असे या गुन्हेगाराचे नाव आहे. सध्या तो फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली आहे.

मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, गोदामावर छापा टाकून 200 हून अधिक सिलेंडर जप्त

Mumbai News : घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या एका मोठ्या टोळीसह गोदामावर छापा टाकून 200 हून अधिक जास्त सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत. मुंबई पोलिसांच्या झोन 11 च्या पथकाने मालवणी भागातील एका गोदामातून काळाबाजारासाठी वापरले जाणारे 200 गॅस सिलेंडर हस्तगत केले. घरगुती गॅस सिलेंडरच्या काळाबाजार करण्याचा लाईव्ह डेमोचा व्हिडीओ देखील पोलिसांच्या हाती लागला आहे. चारकोप पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. यातील एका सिलेंडरचा जरी स्फोट झाला तर मोठा अपघात झाला असता. सध्या चारकोप पोलीस या रॅकेटचा तपास करत आहेत.

वर्धा : नगर परिषदेच्या दिव्यांग कर्मचाऱ्याला दोघांकडून मारहाण

वर्धा नगरपालिकेतील जन्म-मृत्यू विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्याला दोघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर जीवे मारण्याची धमकीही दिली. हा प्रकार कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय.

बिल्कीस बानो प्रकरणाच्या निषेधार्थ मुस्लिम महिलांचा भव्य निषेध मूक मोर्चा

बिल्कीस बानो प्रकरणात बीड शहरात आज मुस्लिम महिलांचा भव्य निषेध मूक मोर्चा निघत आहे. या निषेध मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्यात, बीड शहरातील किल्ला मैदान कारंजा रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चाच्या अनुषंगाने मुस्लिम महिला किल्ला मैदाना येथे मोठ्या संख्येने जमा झाल्या. बीड शहरामध्ये ठीक ठिकाणी काळे झेंडे लावून प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जातोय. याचाच एक भाग म्हणून महिला भगिनी रस्त्यावर उतरल्या आहेत. या अनुषंगाने बीड जिल्हा पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला असून निषेध मोर्चा मध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांची करडी नजर राहणार आहे. या मोर्चामध्ये प्रामुख्याने बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, मुस्लिम धर्मगुरूंबाबत वारंवार केला जाणाऱ्या वक्तव्याचा निषेध देखील यातून केला जातोय.

नंदुरबार : 45 दिवसांपासून शवविच्छेदनाच्या प्रतिक्षेत असलेला तरुणीचा मृतदेह जे. जे रुग्णालयात दाखल

45 दिवसांपासून शवविच्छेदनाच्या प्रतिक्षेत मिठाच्या खड्यात गाडून ठेवलेल्या तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आज जे. जे रुग्णालयात नेण्यात आला आहे. 

संदिपान भुमरेंच्या जावायाने रजिस्ट्री करून ब्राम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचं कंत्राट मिळवले; अंबादास दानवेंचा आरोप 

ब्राम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचं कंत्राट ज्या कंत्राटदाराला मिळाले आहे, त्याच्याकडून रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी रजिस्ट्री करून जावयाला दिले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. शिंदे सरकारमधील मंत्र्यांवर पहिला भष्ट्राचाराचा आरोप झाल्याने आता खळबळ उडाली आहे.

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आंदोलन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला लॉलीपॉप दिला म्हणून पुण्यातील बालगंधर्व चौकात राष्ट्रवादी काँग्रेस लॉलीपॉप आंदोलन करत आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत.

बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलीये. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून करण्यात आलीये. 

मुंब्रा : मुले चोरणाऱ्या टोळीची अफवा, दोन महिलांना जबर मारहाण

ठाण्यातील मुंब्रा येथेही मुले चोरणाऱ्या टोळीची अफवा पसरल्याने, बुधवारी दोन महिलांना जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीचे व्हिडीओ सध्या वायरल झाले आहेत. मुंब्रा देवी रोड पटेल स्कूलजवळ ही घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. ज्या दोन महिलांना मारहाण झाली त्या मुले चोरणाऱ्या टोळीचा हिस्सा नसल्याचे मुंब्रा पोलिसांनी सांगितले आहे, त्यांची प्राथमिक चौकशी करून त्या दोन्ही महिलांना पोलिसांनी नंतर सोडून दिले,

कोकणात पावसाचा मुक्काम लांबण्याची शक्यता, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Sindhudurg News : हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणात पुढील तीन ते चार दिवस आणि त्यापुढील दिवसांत मोसमी पाऊस सक्रिय राहणार आहे. त्यामुळे कोकणात मुसळधार पावसाची शक्यता  आहे. सिंधुदुर्गात तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आजही जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी, कुडाळ तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भातशेती, सुपारी पीक धोक्यात आले आहे. फुलोरा येण्याच्या स्थितीत पाऊस पडत असल्याने भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे तर अति पावसामुळे कोळे रोगाचा सुपारीवर प्रादुर्भाव होत असल्याने सुपारी गळून पडत आहे.

औरंगाबाद : ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्याविरोधात लुटमारीचा गुन्हा दाखल 

औरंगाबाद ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्याविरोधात लुटमारीचा गुन्हा दाखल 


संतोष वाघ असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव 


ग्रामीण पोलीस दलातील सोयगाव पोलीस ठाण्यात कार्यरत 


सराफा व्यापारांना अडवून लुटल्याचे आरोप 


औरंगाबादच्या सिडको एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल 


26 तोळे सोनं आणि साडेआठ लाखांचा रुपयाची केली लूट

राज्य सरकार विरोधात निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादीकडून मंत्रालय परिसरात आंदोलन

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्य सरकार विरोधात निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादीकडून मंत्रालय परिसरात आंदोलन केले जाणार आहे


या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे


मंत्रालय परिसरातील महात्मा गांधी पुतळ्या बाहेर पोलिसांनी बॅरिगेटिंग केले आहे


काल राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून नोटीस देण्यात आली असली तरी राष्ट्रवादी मंत्रालय परिसरात आंदोलन करण्यावर ठाम असल्याची माहिती आहे

मोठी बातमी! संदिपान भुमरेंच्या जावाईने रजिस्ट्री करून ब्राम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचं कंत्राट मिळवले; अंबादास दानवेंचा आरोप

Aurangabad: ब्राम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचं कंत्राट ज्या कंत्राटदाराला मिळाले आहे, त्याच्याकडून रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी रजिस्ट्री करून जावयाला दिले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. शिंदे सरकारमधील मंत्र्यांवर पहिला भष्ट्राचाराचा आरोप झाल्याने आता खळबळ उडाली आहे.

दादर : वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने युवासेनेचं आंदोलन

कीर्ती कॉलेज परिसरात युवासेनेकडून सकाळी 11 वाजता वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गेल्यानं आंदोलन करणार आहे. एक लाख तरुणांचा रोजगार गेल्याचा आरोप करत युवासेनेतर्फे दादरच्या किर्ती कॉलेजजवळ स्वाक्षरी मोहीम राबवत आंदोलन करण्यात येणार आहे. कीर्ती कॉलेजबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे.

कल्याण डोंबिवली महानगरालिकेचे ट्विटर अकाऊंट हॅक 

कल्याण डोंबिवली महानगरालिकेचे ट्विटर अकाऊंट हॅक... प्रशासनाची एकच धावपळ... ट्विटर अकाऊंट तासाभरात पुन्हा रिस्टोर केल्याची केडीएमसीेची माहिती... याच दरम्यान हॅकर कडून 100 हून अधिक मेसेज...ट्विटर अकाउंट हॅक केल्याप्रकरणी केडीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार - केडीएमसी आयुक्तांची माहिती

पुणे : शिवणे भागात भर दिवसा घरफोडी

पुण्यातील शिवणे भागात भर दिवसा घरफोडी केल्याची बातमी आहे. शिवणेतील माजी उपसरपंच संतोष कदम यांच्या घरातील सर्व भोसरीला चौथभरनीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. याचाच फायदा घेत चोरटय़ांनी घराची कडी उचकटून २८ तोळे सोने आणि दीड लाख रुपये रोख लंपास केले. दोघेही चोरटे सीसीटिव्हीमध्ये चित्रित झाले आहेत .उत्तम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांकडून शोध सुरू आहे. शिवण्यातील राहुल नगर येथील धक्कादायक घटना आहे. 

ठाणे : ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत, ठाणे येथे लोकलमध्ये तांत्रिक बिघाड

ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत... ठाणे येथे लोकलमध्ये तांत्रिक बिघाड... ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली...





वाशी-ठाणे लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत, ठाणे स्थानकात गर्दी वाढली

Mumbai Local Train : मुंबई लोकलच्या ट्रान्स हार्बर मार्गावरी वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाशी-ठाणे लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मागून येणाऱ्या सर्व लोकल उशिराने धावत आहे. परिणामी ठाणे स्थानकात गर्दी वाढली आहे.

रायगड : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या गाडीवर दगडफेक

उरणनजीक राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या गाडीवर दगडफेक..


भावना घाणेकर यांच्या फॉरच्यूनर गाडीवर अज्ञात गुंडांची दगडफेक...


उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड परिसरात गाडीवर हल्ला... 


रात्री 8.40 च्या दरम्यानची घटना, गाडीच्या मागच्या बाजूच्या काचेवर दगडफेक.. 


वाहनचालक आणि भावना घाणेकर दोघेही सुखरूप..

कोकण रेल्वे मार्गावर तुतारी एक्स्प्रेस आजपासून तर नेत्रावती एक्स्प्रेस 20 सप्टेंबरपासून विजेवर धावणार
Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते ठोकूरदरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने प्रवासी रेल्वे गाड्या विजेवर धावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 15 सप्टेंबर म्हणजे आजपासून तुतारी एक्सप्रेस विद्युत शक्तीवर धावणार आहे. तर नेत्रावती एक्स्प्रेस 20 सप्टेंबरपासून विजेवर धावणार आहे. रत्नागिरी येथील ट्रॅक्शन सबस्टेशन पूर्ण क्षमतेने कारण कार्यान्वित झाल्याने प्रवासी रेल्वे गाड्या डिझेलऐवजी विद्युत शक्तीवर चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 
हिंगोली : जनावरे क्वारंटाईन करायची वेळ, लम्पी रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न  

राज्यामध्ये आता लम्पी रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये आढळून येत आहे, या आजाराचा संसर्ग हा कोरोना सारखाच मानला जातोय, त्यामुळे आता माणसांपाठोपाठ गुरांनाही क्वारंटाईन करण्याची वेळ आली आहे. कोरोना काळामध्ये सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जावा यासाठी सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आव्हान केले होते आणि आता सुद्धा जनावरांना लम्पीपासून दूर ठेवण्यासाठी  सामाजिक अंतर ठेवून  क्वारंटाईन करण्यात आले आहे. लम्पी रोखण्यासाठी कोरीनाचीच नियमावली वापरली जात आहे, परंतु पशुपालक चिंताग्रस्त आहेत.

यवतमाळ : पोलीस मुख्यालया जवळच पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या 

यवतमाळ : पोलीस मुख्यालया जवळच पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निशांत खडसे असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. दारू पिण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून हत्या झाल्याचं समोर आलं आहे. हॉकी स्टिक लोखंडी रॉडने वार करून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली असून अभिषेक बोंडे, कुंदन मेश्राम असे आरोपींची नावे आहेत.

वाशिम : डव्हा जिल्हा परिषदेची शाळेची इमारत मोडकळीस, विद्यार्थ्यांचे हाल

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील जिल्हा परिषदेची शाळेची इमारत मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणास अडथळे येत आहेत. पाऊस आल्यानंतर वर्गखोल्यात पाणी साचत असल्याने इमारत जिर्ण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे.याबाबत गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून ही शाळेची इमारत दुरुस्त न केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज मालेगाव येथील पंचायत समिती कार्यालयात शाळा भरवली जो पर्यंत शाळेची नवीन इमारत दुरुस्ती होत नाही तोपर्यंत विद्यार्थी शाळेत पाठवणार नसून तात्काळ शाळेची दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी संतप्त पालकांनी केली आहे

रायगड : मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर खोपोलीनजीक कंटेनर ट्रेलरचा अपघात

रायगड : मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर खोपोलीनजीक कंटेनर ट्रेलरचा अपघात...


मुंबईकडे येणाऱ्या बाजूवर ट्रेलरचा ब्रेकफेल झाल्याने अपघात... 


ट्रेलरची अज्ञात वाहनाला ठोकर, ट्रेलरचालक गंभीर जखमी.. 


पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास अपघात, जखमी चालकाला नवीमुंबईच्या रुग्णालयात दाखल...





Ratnagiri Crime : आधी गळा आवळून खून, त्यानंतर मृतदेह जाळून 18 ते 20 पोती भरुन राख समुद्रात फेकली

सध्या रत्नागिरी (Ratnagiri)  जिल्ह्यात चर्चा सुरु आहे ती स्वप्नाली सावंत यांच्या हत्येची (Swapnali Sawant Murder Case) पंचायत समितीच्या माजी सभापती राहिलेल्या स्वप्नाली सावंत या मागिल 31 ऑगस्टपासून बेपत्ता होत्या. शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख राहिलेले त्यांचे पती सुकांत ऊर्फ भाई सावंत यांनी त्या हरवल्याची तक्रार 2 सप्टेंबर रोजी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दिली होती. पण,स्वप्नाली सावंत यांचा पत्ता काही लागत नव्हता. अखेर चार ते पाच दिवस चाललेल्या तपासाअंती पोलिसांनी स्वप्नाली यांच्या आईच्या तक्रारीवरुन सुकांत सावंत यांना अटक केली. त्यानंतर समोर आलेलं वास्तव धक्कादायक असंच म्हणावे लागेल. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

कोकणातला रिफानरी प्रकल्प देखील राज्याबाहेर जाण्याची शक्यता, आरआरपीसीएल कंपनी राज्य सरकारला शेटवचं अल्टिमेटम देण्याच्या तयारीत

Ratnagiri News : वेदांता-फॉक्सकॉननंतर कोकणातला रिफानरी प्रकल्प देखील राज्याबाहेर जाण्याची शक्यता


आरआरपीसीएल कंपनी राज्य सरकारला शेटवचं अल्टिमेटम देण्याच्या तयारीत


एक महिन्याचे अल्टिमेटम देण्याच्या तयारीत- सुत्रांची माहिती

 

आरआरपीसीएल कंपनी तीन वर्षापासून रिफायनरी प्रकल्पाच्या ग्रीन सिग्नलसाठी प्रतिक्षेत

 

रिफायनरी प्रकल्प उभारण्यासंदर्भात गेल्या तीन वर्षापासून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने प्रकल्प गुंडाळण्याच्या हालचाली वाढल्या

 

धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षण पूर्ण होण्यास विरोधकांच्या अडसर तर प्रशासनाची गुळमुळीत भुमिकेमुळे कंपनी नाराज

 

रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्प 2018 सालापासून रखडलेला

 

नाणार रिफायनरी प्रकल्प 60 मिलियन मॅट्रिक टनाचा

 

आता विलंबामुळे धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प 20 मिलियन मेट्रिक टन क्षमतेचा

 

रिफायनरीचा पहिला प्रकल्प 3 लाख कोटींचा आता विलंबामुळे 2 लाख कोटींची अपेक्षित गुंतवणूक

 

 

विलंबामुळे राज्यसरकारने १ लाख कोटींची गुतवणुक गमावली
Vedanta Foxconn : फडणवीसांनी वेदांताचे 'या'साठी मानले आभार; विरोधकांवरही साधला निशाणा

वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपाने चांगलेच तापले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी मौन सोडले आहे. वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल फडणवीस यांनी वेदांता समूहाचे अनिल अग्रवाल यांचे आभार मानले आहेत. तर, सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांवर फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. राजकीय स्वार्थसाठी निराधार दावे केले जात असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

Nawab Malik : नवाब मलिकांच्या जामिनाला ईडीचा विरोध

नवाब मलिक दावा करत असलेली  पॉवर ऑफ एटर्नी ही बनावट असल्याचे ईडीने कोर्टात सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध केला आहे. हसिना पारकरच्या पुढाकाराने झालेला व्यवहार म्हणजे दहशतवादाला रसद असल्याचे  अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी पीएमएलए कोर्टाला सांगितले. नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी ईडीने जोरदार विरोध केला. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

नंदुरबारमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला, पॅनल प्रमुख आणि उमेदवारांकडून घरोघरी जाऊन मतदारांची भेट

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील 149 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत असून त्यापैकी दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 139 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे. अनेक ठिकाणी सरळ लढती होत असल्याने उमेदवार आणि पॅनल प्रमुख थेट मतदारांची संपर्क साधण्याला प्राधान्य देत आहेत. यात मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदारराजाला उमेदवार विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. एकूणच ग्रामीण भागात सकाळपासूनच उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांच्या रॅली निघत असून प्रचाराने जोर पकडला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला अवघे 2 दिवस बाकी असल्याने सर्वच उमेदवार मतदारराजाला भेटून त्याचा मताचा जोगवा आपल्या पॅनलला कसा मिळेल यासाठी प्रयत्न करत आहे. 18 तारखेला मतदान होणार असून 19 तारखेला मतमोजणी होणार आहे. एकूणच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने मोठे राजकीय नेतेही आपल्या समर्थकांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र जिल्हाभर पाहण्यास मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे

सांगली : साधूंना झालेल्या मारहाण प्रकरणी 25 जणांवर गुन्हा दाखल

सांगली : साधूंना झालेल्या मारहाण प्रकरणी लवंगा गावातील एकूण 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सात जणांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये सरपंच पुत्रासह माजी सरपंचाचाही समावेश आहे. मारहाणीनंतर साधूंनी तक्रार देण्यास नकार दिला. मात्र मारहाण करणाऱ्याना परमेश्वर शिक्षा देईल असे सांगून साधू पुढच्या प्रवासाला गेल्याची माहिती समोर आली आहे. साधूंना मारहाण केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.


 





Maharashtra Rain : आज मुंबईसह रायगड, पालघर पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट

हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. रात्रीपासूनच मुंबईसह, ठाणे परिसरात पावसाची रिपरिप सुरु आहे. तसेच पुणे, पालघर, नाशिक आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज कोकणातील रायगड तसेच ठाणे, पालघर, मुंबई आणि पुण्याला पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...


युवासेनेचे राज्यभरात आंदोलन 
वेदांत आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प गुजरातमध्ये गेला, यामुळे एक लाख तरुणांचा रोजगार गेला, याच्या निषेधार्थ युवासेनेतर्फे उद्या 15 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत, तालुक्यात, शहरात, मुख्य चौकात निषेध मोहीम घेण्यात येणार आहे. 'शिंदे-फडणवीस या खोके सरकारच्या हलगर्जीपणामुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला आहे. त्यामुळे आता राज्यातील एक लाख तरुणांचा रोजगार हिरावला जाणार असल्याने आम्ही उद्या, 15 सप्टेंबरला राज्यभरात शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करणार असल्याचे युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले.' 


लालबागच्या राजाच्या दानपेटीत आलेल्या सोन्याचांदीच्या वस्तूंचा लिलाव -
गेली दोन वर्ष कोरोनामुळे भक्तांना लालबागच्या (Lalbaug News) राजाचं ऑनलाईन दर्शन घ्यावं लागलं. मात्र यंदा थेट बाप्पाच्या चरणी माथा टेकवता आला. दर्शनासाठी दहा दिवस भक्तांनी गर्दी केली होती.  मुंबईत (Mumbai) लालबागच्या (Lalbaugcha Raja News) राजाला भक्तांनी यावर्षीही भरभरून दान दिलं आहे. भक्तांनी रोख रकमेत आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांच्या रुपात राजाला दान दिलं आहे. याशिवाय सोन्याची फुलं, सोन्याचे चरण, हार, अंगठी, मुकूट, कडं असे सोन्याचे दागिनेही लालबागच्या राजाला भक्तांनी दान दिले आहेत. चांदीचा गणपती, चांदीचा मोदक, चांदीच्या दुर्वा अशा चांदीच्या वस्तूही भक्तांनी राजाला अर्पण केल्या आहेत. लालबागच्या राजाच्या दानपेटीत आलेल्या सोन्याचांदीच्या वस्तूंचा आज लिलाव होणार आहे. 
 
मुंबईत यलो अलर्ट -
पुढील दोन दिवस मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आला आहे. मुंबईसाठी हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केलाय. त्याशिवाय पालघर, रायगड आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातही काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम सुरुपाचा पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 


सुप्रीम कोर्टात सुनावणी -
युक्रेनमधून भारतात परतणाऱ्या मेडिकल विद्यार्थांना भारतातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवा, या मागणीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.  मागील सुनावणीवेळी विदेश मंत्रालयात हा विषय हाताळत असल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी दिली होती. केंद्र सरकार या विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं होतं. 


विदेश मंत्रालयाची पत्रकार परिषद -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समरकंद दौऱ्याबाबत विदेश मंत्रालयाची पत्रकार परिषद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबाबात सविस्तर माहिती देण्यासाठी सकाळी 11 वाजता विदेश मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. विदेश सचिव विनय मोहन क्वात्रा पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबात माहिती देणार आहेत.  


पीएम नरेंद्र मोदी समरकंद दौऱ्यावर जाणार - 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एससीओ शिखर सम्मेलन 2022 साठी समरकंदला जाणार आहेत. आज सायंकाळी पंतप्रधान रशियाचे राष्ट्रपती पुतिन आणि उजबेकिस्तान के राष्ट्रपती यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी समरकंदसाठी रवाणा होणार आहेत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान यांना मोदी भेटण्याची शक्यता आहे. 


गोवा काँग्रेसची महत्वाची बैठक - 
गोव्यामध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडले आहे.  काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीच्या अवघ्या एक वर्षाच्या आतच गोव्यात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. त्यामुळे आज गोवा काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. गोवा काँग्रेसचे प्रभावी प्रमोद गुंडराव यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. गोवा काँग्रेस कोर्टात जाण्याची शक्यता आहे.  


केजरीवाल यांची पत्रकार परिषद - 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी 12 वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार आहे. यावेळी ते केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडण्याची शक्यता आहे.  


कॅथरीन कोलोना यांच्या दौऱ्याचा अखेरचा दिवस -
फ्रान्सच्या युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्या 13 ते 15 सप्टेंबर या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.  कोलोना यांच्या दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. बुधवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 


नोरा फतेहीला ईडीची नोटीस, आज होणार चौकशी -
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) अडचणीत वाढ झाली आहे. सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandra Shekhar Case) मनी लॉंड्रिंग प्रकरणी जॅकलीन (Jacqueline Fernandez) नंतर आता नोरा फतेहीची चौकशी होणार आहे. ईडी नोरा फतेहीची उद्या सुकेश चंद्रशेखर मनी लॉंड्रिंग प्रकरणी चौकशी करणार आहे. नोरा फतेही आज सकाळी (15 सप्टेंबर) 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहणार आहे.  याआधीदेखील नोराची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी तब्बल सहा तास नोराची चौकशी सुरू होती. त्यावेळी त्यांनी नोराचा जबाबदेखील नोंदवून घेतला होता.


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लंडनला जाणार -
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu)  देखील लंडनला जाणार आहेत. भारत सरकारच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 17 ते 19 सप्टेंबर 2022 रोजी लंडनमध्ये असतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.