एक्स्प्लोर

Majha Katta : फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत केवळ चर्चा, लेखी व्यवहार झालेच नाहीत, उदय सामंतांचा माझा कट्ट्यावर गौप्यस्फोट

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत कोणताही सामंज्यस करार झाला नव्हता. केवळ चर्चा झाली होती असे मत उद्योगमंत्री उदय सामंत ( Uday Samant) यांनी केलं.

Uday Samant on Majha Katta : वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्पाबाबत कालपासून संभ्रम निर्माण केला जात आहे. या प्रकल्पाबाबत कोणताही सामंज्यस करार झाला नव्हता. केवळ चर्चा झाली होती असे मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं. पॅकेज वेळेत दिलं असतं तर हे झालचं नसते असेही सामंत म्हणाले. सामंत हे आज एबीपी माझाच्या (ABP Majha) 'माझा कट्टा' (Majha Katta) या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सध्या विरोधक करत असललेले दावे फेटाळून लावले. दरम्यान, संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात आणू अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचेही सामंत यावेळी म्हणाले.

वेदांता-फॉक्सकॉनचा  प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. यावरुन राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याचं खापर महाविकास आघाडीवर फोडलं आहे. गेली दोन वर्षे कंपनीला जो प्रतिसाद मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी आधीच्या सरकारकडे बोट दाखवलं आहे. दरम्यान, आज या सर्व प्रकल्पाबाबत माहिती देण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत हे माझा कट्ट्यावर आले होते. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली. 

वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याचं मला कालच समजलं

वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प हा गुजरातला गेला हे मला कालच समजल्याचे उदय सामंत यावेळी म्हणाले. उच्च तंत्र शिक्षण विभाग आणि उ्दयोग विभाग ऐकमेकांशी संलग्न असणे गरजेचे असल्याचे सामंत यावेळी म्हणाले. यासंबंधी आम्ही धोरण तयार करत असल्याचे सामंत म्हणाले. येत्या काही दिवसात चांगला प्रकल्प महाराष्ट्राला मिळेल, असेही उदय सामंत यावेळी म्हणाले. दरम्यान, ड्रग्ज पार्कचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार आहे. तसेच नागपूरमध्ये देखील टाटा एअरबसचा प्रकल्प होणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. 

रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही

रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नसल्याची घोषणा देखील यावेळी उदय सामंत यांनी केली. रिफायनरीबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचेही सामंत यावेळी म्हणाले. आमदारही रिफायनरीसाठी आग्रही आहेत. रिफायनरी प्रकल्पामुळं मोठी रोजगार निर्मिती होणार असल्याचे सामंत यावेळी म्हणाले. मोठे प्रकल्प आणायचे असल्यास राजकारण बाजूला ठेवणं गरजेचं आहे. सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे सामंतांनी यावेळी सांगितले. राजकारण करम्यापेक्षा सांघिक अभ्यास करावा असेही सामंत यावेळी म्हणाले. 

सर्व पक्षीय नेत्यांसोबत चर्चा करण्यास मी तयार

महाराष्ट्राचे उद्योग वाढणार असतील तर सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करण्यास मी तयार आहे. पण या नेत्यांना बोलावण्याची विनंती मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करमार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. उद्योगमंत्री म्हणून मला जे काही करता येईल ते मी करणार आहे. उद्योग राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. उद्योगासंदर्भात चांगली धोरण राबवण्यासाठी मी विविध ठिकाणी जाऊन माहिती घेऊल. तेथील मंत्र्यांच्या भेटी घेून चर्चा करेल अशी माहिती देखील सामंत यांनी दिली. तरुणांच्या रोजगारात कोणाही अडचणी आणू नये असेही ते म्हणाले.

फॉक्सकॉन प्रकल्पापेक्षा दुप्पट नोकऱ्या महाराष्ट्रात देणार

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पातून जेवढ्या नोकऱ्या मिळणार होत्या, त्याच्यापेक्षा दुप्पट नोकऱ्या पुढच्या काळात महाराष्ट्रात आणण्याची जबाबदारी मी घेतो असे आश्वासन देखील यावेळी उदय सामंत यांनी दिले. याबाबत नोकरी लागल्याचा सगळा डेटा मी पुढच्या वर्षी तुमच्यासमोर ठेवेन असेही सामंत म्हणाले. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार टीका करत असल्याच्या मुद्यावर देखील सामंत बोलले. अजित पवार हे विरोधी पक्ष नेते आहेत. हे जर बोलले नाहीत तर असा समज होईल की ते पण शिंदे गटात सामील झाले आहेत. मात्र, मी स्वत: अजित पवार यांनी भेटणार आहे. मी पंचायत समितीच्या सदस्यांनी बोलावले तरी मी भेटायला जाईल. आदित्य ठाकरे यांनी बोलावले तरी मी चर्चा करायला जाईल असेही सामंत यांनी यावेळी  सांगितले. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Sanjay Raut Letter to CM: संजय राऊत यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, रामरक्षा आंदोलनाच निमंत्रण धाडलं, म्हणाले, आपण प्रखर रामभक्त अन् कडवट हिंदुत्ववादी...
संजय राऊत यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, रामरक्षा आंदोलनाच निमंत्रण धाडलं, म्हणाले, आपण प्रखर रामभक्त अन् कडवट हिंदुत्ववादी...
NCP Meeting: पटेल, तटकरे फडणवीसांना भेटले; पण सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवल्याची चर्चा; राष्ट्रवादीमधील घडामोडींची Inside Story
पटेल, तटकरे फडणवीसांना भेटले; पण सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवल्याची चर्चा; राष्ट्रवादीमधील घडामोडींची Inside Story
Raj Thackeray On Sonam Wangchuk Protest: दृश्य काळजीत टाकणारी...सोनम वांगचुक यांच्यासाठी राज ठाकरेंची पोस्ट; म्हणाले, भाजपला कोणी प्रश्न विचारु नये असा माज
दृश्य काळजीत टाकणारी...सोनम वांगचुक यांच्यासाठी राज ठाकरेंची पोस्ट; म्हणाले, भाजपला कोणी प्रश्न विचारु नये असा माज

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
High Court On BMC: उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
Gashmeer Mahajani On Pravin Tarde: '100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
'100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
Kandivali Crime: गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, कांदिवलीतील एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
Beed Crime Vilas Ghule Case: बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
Embed widget