(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News LIVE Updates : संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या सावंत कणकवली न्यायालयात शरण
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Elections 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या सुरू आहे. यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर उत्तर प्रदेशबरोबरच गोवा आणि उत्तराखंडमध्ये देखील आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. उत्तर प्रदेशमध्य दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 55 विधानसभा जागांसाठी आज मतदान होणार आहे. दरम्यान, सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 च्या दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांव्यतिरिक्त, गोवा-उत्तराखंडच्या सर्व विधानसभा जागांसाठी आज सोमवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. त्यामुळे या मतदानात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री धरमसिंग सैनी यांचा समावेश आहे. ते भाजप सोडून सपामध्ये गेले आहेत.
Nashik Breaking : प्रेमप्रकरणातून पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या नाशिकमधील देवळा तालुक्यातील लोहणेरच्या तरूणाचा अखेर मृत्यू झाला आहे. गोरख बच्छाव असं या तरुणाचं नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मुलीनेच आपल्या कुटुंबियाच्या मदतीनं तरूणावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवलं होतं. या घटनेत संबंधित तरूण 55 टक्के भाजला होता.
गोरखवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. शुक्रवारी प्रेमप्रकरणातून प्रेयसी आणि तिच्या कुटुंबाने गोरखला मारहाण करत अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या गोरखला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणात पोलिसांनी मुलीसह आई वडील आणि दोन भाऊ यांना अटक केली आहे. देवळा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केलं आहे.
आमदार वैभव नाईक यांच्यासह सेना, भाजप, काँगेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
Akola News Update : आकोल्यात घराला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू
Akola News Update : अकोला शहरातील सराफा गल्लीतील एका घराला आग लागली. या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
रिझर्व्ह बॅंकेने सहकारी बॅंक, पतपेढी बाबत घेतलेले निर्णय चिंताजनक - शरद पवार
रिझर्व्ह बॅंक चे सहकारी संस्थांकडे बघण्याचा दृष्टीकोन चत्मकारीक झाला आहे. गेल्या काही दिवसात त्यांचे सहकार क्षेत्राला सहकार्य मिळत नाही. रिझर्व्ह बॅंकेने सहकार बाबत घेतलेले निर्णय चिंताजनक आहेत. त्यामुळे राज्यातील सहकारी बॅंका, पतपेढ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत आपण स्वता लक्ष घालणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याबरोबर बैठक घेणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. शिवकृपा पतपेढीकडून उभारण्यात आलेल्या ऐरोली येथील इमारतीचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. देशातील राज्यापैकी महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये सहकार चळवळ चांगली रूजू झाली आहे. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यातील सहकार चळवळीला वेगळा आयाम दिला होता.
सातारा जिल्हा बॅंक ही देशात एक नंबरची बॅंक म्हणून ओळखली जात होती असे शरद पवार म्हणाले.
Mumbai News Update : घाटकोपर येथील कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांना कोरोना नियमांचा विसर
Mumbai News Update : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते घाटकोपर येथील मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन झाले. परंतु, या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना कोरोना नियमांचा विसर पडल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती.
Nanded News : नगरपंचायत नगराध्यक्ष निवडीत दोन ठिकाणी काँग्रेसची सत्ता तर एका ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता
Nanded News : नांदेड जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींपैकी नायगांव आणि अर्धापुरमध्ये काँग्रेसच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदांची बिनविरोध निवड झाली आहे. अर्धापुरमध्ये छत्रपती कानोडे यांची नगराध्यक्षपदी तर यास्मिन सुलताना यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर नायगांवमध्ये नगराध्यक्ष पदी गीता जाधव आणि उपनगराध्यक्षपदी विजय चव्हाण यांची निवड झाली आहे. तर माहुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्तेसाठी एकत्र आली असून नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे फेरोज दोसानी तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या नाना लाड यांचा विजय झाला आहे.