एक्स्प्लोर

Nashik: प्रेमप्रकरणातून तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रकार, मुलीनेच ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवलं; नाशिक येथील खळबळजनक घटना  

Nashik: ही घटना नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या लोहणेर (Lohoner) गावात घडली.

Nashik: प्रेमप्रकरणातून तरूणाचा जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. ही घटना नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या लोहणेर (Lohoner) गावात घडली. धक्कादायक बाब म्हणजे, मुलीनेच आपल्या कुटुंबियाच्या मदतीनं तरूणावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिलंय. या घटनेत संबंधित तरूण 55 टक्के भाजला आहे. त्याच्यावर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी देवळा पोलिसांनी मुलीसह चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरु केलीय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली. 

मिळालेल्या माहितीनुसार, गोरख काशिनाथ बच्छाव असं पीडित तरुणाचं नाव आहे. पीडिताची तीन वर्षांपूर्वी मालेगाव जवळील रावळगाव येथील कल्याणी गोकुळ सोनवणे हिच्याशी ओळख झाली होती. दरम्यान, त्यांच्या ओळखीचं प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यांच्या लग्नास दोघांच्या नातेवाईकांनी विरोध दर्शवला. यातून वाद सुरु झाला. काही दिवसांपूर्वी संबंधित मुलीचे दुसऱ्यासोबत लग्नही ठरले होते. मात्र त्यास गोरख हा अडथळा आणत होता अशी प्राथमिक माहिती आहे. 

दरम्यान, गोरख हा आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास लोहणेर वासोळ रोडवर उभा असतांनाच मुलीसह मुलीचे वडील, आई आणि दोन भाऊ त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी गोरखला लोखंडी रॉड आणि काठीनं मारहाण करण्यास सुरुवात केली. स्वतःच्या बचावासाठी गोरख एका मोबाईलच्या दुकानात घुसला. त्यानंतर मुलीनं त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिलंय. या घटनेत गोरख 55 टक्के भाजला. यावेळी बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. तसेच या घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानं पुढील अनर्थ टळला.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget