एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates : ज्यांना घरातून बाहेर काढल त्यांच्यावर काय बोलणार, अकबरुद्दीन औवेसींचा राज ठाकरेंना टोला

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates : ज्यांना घरातून बाहेर काढल त्यांच्यावर काय बोलणार, अकबरुद्दीन औवेसींचा राज ठाकरेंना टोला

Background

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुकीला परवानगी द्या आयोगाची मागणी, सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष?  
राज्यातल्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाकडून अर्ज सादर करण्यात आला आहे. निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात सादर अर्जाची एक्स्क्लुझिव्ह कॉपी एबीपी माझाकडे आहे. महापालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये घेण्यास परवानगी द्यावी अशी विनंती निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याची परवानगी द्या अशी विनंती देखील केली आहे. जून महिन्याअखेरीस सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वॉर्ड रचना आणि इतर प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करु असं आयोगाने कोर्टात सादर केलेल्या अर्जात म्हटलं आहे. पण त्यानंतर पुढची प्रक्रिया ऐन पावसाळ्यात पूर्ण करावी लागेल. त्यात काय काय प्रशासकीय अडचणी आहेत हे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे. पावसाळ्यात मतदान झाल्यास मतदानाची टक्केवारी कमी होऊ शकते ही भीती देखील व्यक्त केली आहे. त्यामुळे यावर न्यायालय काय निर्णय देतं याकडे लक्ष आहे?

राहुल गांधी पुन्हा कॉंग्रेस अध्यक्षपदी विराजमान होणार?  
काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याकडे सोपवावीत अशी मागणी नेहमी होत असते. आता राहुल गांधीही काँग्रेस अध्यक्षपदाबाबत सकारात्मक विचार करत असल्याची माहिती आहे.  काँग्रेसची संघटनात्मक मतदान प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे उदयपूर येथील चिंतन शिबिरात अध्यक्षपदाबाबत चर्चा होणार नाही. तसंच संघटनात्मक पातळीवर पूर्ण प्रक्रिया पार पाडूनच राहुल गांधी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील अशी सूत्रांची माहिती आहे. राहुल गांधी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहिले तर त्यांच्याविरोधात काँग्रेसमधून कोणी उमेदवारी दाखल करणार का? याबाबत उत्सुक्ता आहे. ठरल्याप्रमाणे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पार पाडणार आहे. अशोक गेहलोत, प्रियंका गांधी यांचीही नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत असतात.

यूपीत विरोध, मुंबईत जोरात तयारी; राज ठाकरेंच्या दौऱ्यासाठी मनसे 11 ट्रेन बुक करणार? 
भाजप खासदाराकडून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध होत आहे. तर मनसेकडून मात्र दौऱ्याची जोरात तयारी सुरु आहे. अयोध्या दौऱ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 11 ट्रेन बुक केल्या जाणार आहेत. महाराष्ट्रभरातून मनसैनिक राज ठाकरेंच्या आधी अयोध्येत दाखल होतील. मोठं शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत मनसे आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा दौरा वादळी होण्याची शक्यता आहे. 

21:23 PM (IST)  •  12 May 2022

Beed News Update : आज पुन्हा एका शेतकऱ्याने उसाचा फड दिला पेटवून , बीड जिल्ह्यात अतिरिक्त ऊस गाळपाचा प्रश्‍न गंभीर

बीड जिल्ह्यातील हजारो हेक्टर उस शेतात उभा आहे. साखर कारखाने ऊस घेऊन जात नाहीत. त्यामुळे  ऊसाचा फड पेटवून देऊन शेतकऱ्याने कालच आत्महत्या केली होती. त्यानंतर आज आणखी एका शेतकऱ्याने कारखाना ऊस घेऊन जात नाही म्हणून उसाच्या फडाला आग लागून पेटवून दिला आहे. 

19:12 PM (IST)  •  12 May 2022

Sri Lanka's New PM: रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान

रानिल विक्रमसिंघे आता श्रीलेंकेचे नवे पंतप्रधान असतील. महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. 

18:57 PM (IST)  •  12 May 2022

Akbaruddin Owaisi : आम्ही कोणालाही घाबरणार नाही : अकबरुद्दीन ओवैसी

आम्ही कोणालाही घाबरणार नाही, ज्यांची लायकी नाही त्यांना आम्ही का उत्तर द्यायचं? असा प्रश्न उपस्थित करत अकबरुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.  

18:57 PM (IST)  •  12 May 2022

Akbaruddin Owaisi : ज्यांना घरातून बाहेर काढल त्यांच्यावर काय बोलणार, अकबरुद्दीन औवेसींचा राज ठाकरेंना टोला

मी कुणालाही उत्तर देण्यासाठी आलो नाही, ज्यांना घरातून बाहेर काढलं आहे त्यांच्यावर काय बोलणार असा टोला एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन औवेसी यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. आम्ही कुणालाही घाबरणारे नाही असंही ते म्हणाले. 

18:39 PM (IST)  •  12 May 2022

Jalna Crime: जालना दोन गटात दगडफेक, पोलिसांचा हवेत गोळीबार

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या चांदई गावांमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा असलेल्या  कमानीला नाव देण्यावरून दोन गटात तुफान दगडफेक झाली, यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. जमावाने केलेल्या दगडफेकी मध्ये 4 ते 5 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून या दगडफेकीत पोलिसांची व्हॅन, जीपसह अग्निशमन दलाच्या गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आलीय. या प्रकरणी पोलिसांनी गावच्या सरपंच आणि उपसरपंचासह 20 ते 25 जणांना अटक केली आहे. दरम्यान गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी अनधिकृत पणे उभारलेला शिवरायांचा पुतळा हटवला असून ती कमान देखील काढण्यात येणार आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Full PC : वर्दीची भीती राहिली नाही, पुणे अपघात प्रकरणी सरकारवर निशाणा ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा 09 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024Manoj Jarange Full Speech : भुजबळ मला गावठी म्हणतात...मला लग्न करायचे का तुझ्या सोबत?Sharad Pawar Speech Sangli : येणाऱ्या काळात रोहितला ताकद द्या, आबांच्या लेकासाठी खुद्द पवार मैदानात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Embed widget