Maharashtra Breaking News LIVE Updates : भारतात येऊन अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका नायजेरियनला अटक
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
रामदास आठवलेंनी घेतला शशी थरुर यांचा इंग्रजीचा क्लास, मजेदार ट्वीट्स व्हायरल
इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वासाठी ओळखले जाणारे काँग्रेस नेते शशी थरूर यांची इंग्रजीतील चूक केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पकडली. रामदास आठवले यांनी लक्षात आणून दिलेली चूक शशी थरूर यांनी मान्य केली. मात्र, त्यांनी अप्रत्यक्षपणे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनाही चिमटा काढला आहे. शशी थरूर आणि रामदास आठवले यांच्यात झालेल्या संवादाचे ट्वीटस व्हायरल झाले आहेत.
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्वीट करताना फोटो पोस्ट केला होता. या फोटोत अर्थमंत्री निर्मला सीतारमण या लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना दिसत आहे. त्याच वेळेस त्यांच्या मागे बसलेले रामदास आठवले यांनी भावमुद्रा ही निर्मला सीतारमण आश्चर्यजनक सांगत असल्यासारखी होती. त्यावर शशी थरूर यांनी ट्वीट केले आहे. शशी थरूर यांनी म्हटले की, अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेवर अर्थमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर केंद्रीय मंत्र्यांनादेखील विश्वास वाटत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव सांगून जात असल्याचे थरूर यांनी म्हटले.
TET घोटाळ्यानंतर आरोग्य पेपरफुटी प्रकरणाला वेग; आणखी एका आरोपीला अटक
Paper Leak : शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळासमोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत काहींना अटक केली होती. त्यानंतर आता आरोग्य विभाग गट 'ड' परीक्षा पेपरफुटीच्या तपासाला आणखी वेग आला आहे. पुणे पोलिसांनी या पेपरफुटीसंदर्भात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अर्जुन भरत राजपूत असे असून त्याला औरंगाबादमधून अटकत करण्यात आली. आरोपी अर्जुन राजपूत हा औरंगाबाद येथे म्हाडा परीक्षेसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अर्जुन राजपूत याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पेपरफुटीच्या म्होरक्याला अटक
आरोग्य भरती पेपर फुटीतील पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला आणखी एक म्होरक्या सायबर पोलीसांच्या हाती लागला. अतुल प्रभाकर राख असे गुरुवारी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अतुल राख हा याआधीच अटकेत असलेला आरोपी संजय सानप याचा मेहुणा आहे. पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला मुख्य आरोपी जीवन सानप याची पेपरफुटी प्रकरणातील संबंधित सर्व कामे अतुल राख करायचा. अतुल राखला पोलिसांनी पुण्यातूनच अटक केली. आरोग्य भरतीतील गट ‘क’ आणि गट ‘ड’ या दोन्ही परीक्षांचे पेपर फुटले होते. या पेपरफुटीमुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली होती. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत काही आरोपींना अटक केली असून काहींचा शोध सुरू आहे. आरोग्य भरतीच्या दोन्ही पेपरफुटीमध्ये पुणे सायबर पोलीसांना वडझरीचे सानप बंधू हवे आहेत. या प्रकरणात केवळ संजय शाहुराव सानप याला पोलिसांनी गजाआड केले आहे.
कर्नाटकात येण्यासाठी आता आर टी पी सी आर ची आवश्यकता नाही
त्याचबरोबर कोविड लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्यांनाच प्रवेश मिळेल. याचा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे. हा आदेश आल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या नजीकच्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
बेळगावची बाजारपेठ महाराष्ट्रातील तालुक्यांवर अवलंबून आहे. यामुळे व्यापारी वर्गाने जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन ही विनंती केली होती. याचबरोबरीने कर्नाटकाच्या विविध सीमाभागात लागून असलेल्या राज्यातून विशेषता केरळ मधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने तेथूनही या संदर्भात मागणी होती. दरम्यान सध्या महाराष्ट्र संदर्भात हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे दिलासा मिळाला आहे.
अखेर..ठरलं ! बीड जिल्ह्यातील पहिलीपासून च्या शाळा सोमवारपासून उघडणार
भारतात येऊन अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका नायजेरियनला अटक
कपडे विक्री व्यवसायाच्या नावाने भारतात येऊन अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका नायजेरियनला अटक करण्यात आली आहे. कोट्यवधीच्या कोकेन या अमली पदार्थांसह अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या बांद्रा युनिटने अंधेरीमधून केली आहे. या नायजेरियन अमली पदार्थ तस्कराचे नाव पॉल इबे एन्जोकु असे असून तो नायजेरियाच्या लागोसचा रहिवासी आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे बांद्रा युनिटचे अधिकारी सहारगाव अंधेरी या परिसरात गस्त घालत होते. या वेळी त्यांना पॉल हा संशयितरित्या या भागात फिरताना आढळला. यावेळी पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल 407 ग्रॅम कोकेन हा अमली पदार्थ आढळून आला. याची किंमत तब्बल 1 कोटी 22 लाख 10 हजार रुपये इतकी आहे. पॉल हा मुंबई आणि मुंबईच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विकत होता. कपडे विक्री व्यवसायाच्या नावाखाली तो भारतात आला आणि इथे अमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय करू लागला. त्याच्या बरोबर त्याने आणखी सहा ते आठ आफ्रिकन नागरिकांची अमली पदार्थ विक्रीसाठी टोळी देखील तयार केली आहे. पॉलला अटक झाल्याने एक मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यात सोमवारपासून पहिलीपासून शाळा सुरू होणार
बीड जिल्ह्यात सोमवारपासून पहिलीपासून शाळा सुरू होणार. मागच्या काही दिवसांपूर्वी वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील केवळ दहावी बारावी आणि नंतर काही दिवसांनी आठवी नववीच्या वर्गाला परवानगी देण्यात आली होती. परंतु, आता कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आली असून पहिली पासून शाळा भरवण्यास दिनांक 14 फेब्रुवारी म्हणजेच सोमवार पासून पहिलीपासूनच्या शाळा सुरु करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.
किरीट सोमय्या यांचे नाव किरीट नाहीतर स्पिरिट आहे - गिरीश बापट
ही लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधातील आहे. किरीट सोमय्या यांचे नाव किरीट नाहीतर स्पिरिट आहे. भाजपने शहराच्या इतिहासात सर्वाधिक चांगलं काम केले आहे. असे गिरीश बापट म्हणाले.