Maharashtra Breaking News 10 April 2022 : अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या घराची झडती घेऊन आता पोलीस बाहेर पडले
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या घरी मुंबई पोलिसांच्या पथकाने झडती घेतल्यानंतर आता ते पथक बाहेर पडलं आहे. यावेळी या ठिकाणचे सीसीटीव्ही, रजिस्टर तपासण्यात आलं असून सदावर्तेंना भेटायला कोण-कोण आलं होतं याची माहिती घेण्याचं काम पोलिसांनी केलं. ही झडती सुमारे सात ते आठ तासांपासून सुरू होती असं सांगितलं जातंय.
Gunaratna Sadavarte : अॅड. गुरणरत्न सदावर्ते यांच्या घरी मुंबई पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. सदावर्ते यांच्या घराची मुंबई पोलीस झाडाझडती घेणार आहेत.
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला कोल्हापूर महाविकास आघाडीकडून 5 लाखाचे बक्षीस.
पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि अरुण दुधवडकर यांच्याकडून बक्षिसाची घोषणा.
पैलवांनाच्या पाठीशी महाविकास आघाडी कायम राहणार असल्याचं आश्वासन.
Beed News Update : भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात दरोड्यासारखी कलमे वाढवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. बीडमधील आष्टी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मनोज चौधरी यांच्या पत्नी माधुरी चौधरी यांनी आठ महिन्या पूर्वी फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून आमदार सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर दाखल झालेल्या गुन्ह्यात आता दरोड्या सारखी गंभीर कलमे वाढविण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले आहेत.
Cm Uddhav Thackeray : विरोधकांकडे बोलण्यासारखे मुद्दे नाहीत. बोलण्यासारखे काही नाही, त्यामुळे खोटे आरोप करण्याचे काम सुरू आहे, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.
शरद पवारांच्या घरासमोर झालेल्या आंदोलन प्रकरणी आता गावदेवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामप्यारे राजभर यांची बदली करण्यात आली आहे. एक दिवस आधी या विभागातील DCP योगेश कुमार गुप्ता यांचीही बदली झाली होती.
Satara News Update : महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेल्या पैलवान पृथ्वीराज पाटील याला भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्यांनी फत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. शिवसेना नेते गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही पृथ्वीराज पाटील याला दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
Pune News Update : पुण्याचे मनसेचे नेते वसंत मोरे उद्या सकाळी 11 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या मुबंईतील शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेणार आहेत. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केलेल्या भाषणात मुस्लिम समाजाबाबत केलेल्या वक्तव्यावरून वसंत मोरे नाराज आहेत. पुण्यातील मनसेचा कुठलाही पदाधिकारी या भेटीवेळी सोबत असणार नाही. वसंत मोरे एकटेच मुबंई जाऊन राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त करणार आहे.
संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला... त्यामुळं त्यांच्याकडून शरद पवार यांच्या घरावरील आंदोलनाचे काम झालं नसावं... शरद पवार यांच्या घरावर आलेले खरंच एसटी कर्मचारी होते का? हे तपासले पाहिजे अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. ते नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.. हे आंदोलक स्वतः आले की त्यांना एकत्रित करून पाठवले... ते अजून कळलेले नाही... शरद पवार हे सुरक्षेच्या दृष्टीने कधी ही संरक्षणाकडे लक्ष देत नसतात, त्यामुळे हे लोक आणखी आत पोहचले असते तर काय घडलं असतं याचं विचार आपण करू शकत नाही... त्यामुळे सिल्वर ओक वर झालेलं आंदोलन नक्कीच गंभीर घटना आहे, सखोल चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे असे जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं अमरावती शहरात आगमन..
शरद पवार आज एक दिवसीय अमरावतीच्या दौऱ्यावर...
शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या घरी आगमन...
शरद पवारांसह, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मंत्री राजेंद्र शिंगणे,मंत्री सुनील केदारही अमरावतीच्या दौऱ्यावर..
शरद पवारांच्या हस्ते आज शिवाजी संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व सभागृहाचे उद्घाटन..
अमरावतीत सायंकाळी 5 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावती विभागाच्या सवांद मेळाव्याला शरद पवार करणार मार्गदर्शन...
शहरात ठिकठिकाणी लागले स्वागताचे पोस्टर; पोलिसांचाही तगडा बंदोबस्त...
राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष....
उपमुख्यमंत्री अजित पवार हे माळेगाव येथील कार्यक्रम उरकून बारामतीला येत होते. बारामतीला जात असताना माळेगाव येथील माळेगाव कॉलनीजवळ अजित पवारांना एक अपघात झालेला दिसला. तत्काळ अजित पवारांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवला. आणि ताफ्यातील एका गाडीत जखमीला दवाखान्यात नेण्याचे आदेश दिले. तसेच जखमीला बारामतीतील गिरीधर हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या सूचना केल्या. डॉक्टरांना फोन करून जखमींची विचारपूस केली.. बारामतीत सकाळपासून अजित पवारांचे विविध कार्यक्रम सुरू आहेत.
शरद पवारांच्या परवा सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी सुप्रिया सुळे गृहमंत्र्यांच्या भेटीला
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या निवासस्थानी शिवगिरी या शासकीय निवासस्थानी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे भेट घेतली
गेल्या अर्ध्या तासापासून त्यांची या सर्व प्रकरणाची चर्चा झाली
खासदार सुप्रिया सुळे या दिलीप वळसे पाटील यांच्या शासकीय निवासस्थान आतून बाहेर पडलेले आहेत
Maharashtra News : शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे. सरकारी वकिल प्रदीप घरतही बैठकरीला उपस्थित चर्चा सुरू आहेत. मुंबईचे पोलीस कमिशनर संजय पांडे, जॉईंट सीपी कायदा-सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील, डीसीपी निलोत्पल हेदेखिल या बैठकीला उपस्थित आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील जलंब रेल्वे स्थानकासमोर गेल्या चार दिवसांपासून नागरिकांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. कोरोना आणि लॉकडाउन काळात बुलढाणा जिल्ह्यातील जलंब जंक्शन रेल्वे स्थानकावर थांबा बंद केलेल्या प्रवासी गाड्यांना थांबा पूर्ववत सुरू करावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे. आज आंदोलकांनी आक्रमक होत स्थानकाहून कोल्हापूर-गोंदिया-महाराष्ट्र एक्सप्रेस अडवून रेल रोको केला. या ठिकाणी रेल्वे पोलीस, बुलढाणा पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. महाराष्ट्र एक्स्प्रेस गेल्या 20 मिनिटांपासून अडविली आहे.
Maharashtra Kesari Kusti Competition : महाराष्ट्राच्या मातीतील प्रतिष्ठेची स्पर्धा महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesri) नुकतीच पार पडली असून अत्यंत अटीतटीच्या सामन्यात कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील याने 5-4 च्या फरकाने मुंबई पश्चिमचं नेतृत्त्व करणाऱ्या विशाल बनकरला मात दिली आहे. विशेष म्हणजे जवळपास 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळाली आहे. याआधी विनोद चौगुले यांनी महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती.
कोरोना महामारीच्या (Corona Virus) संकटामुळे गेले दोन वर्ष जणू काही सारं विश्वच थांबलं होतं. त्यात ही स्पर्धाही पार पडली नव्हती. मात्र आता निर्बंधमुक्तीनंतर जनजीवन रुळावर येत असून ही स्पर्धाही साताऱ्यात उत्साहात पार पडली. यंदाच्या 'महाराष्ट्र केसरी' (Maharashtra Kesari Kusti Championship) स्पर्धेला सुरुवात झाली आणि बघता बघता किताबाच्या कुस्तीची वेळही जवळ आली आहे. आज म्हणजेच 9 एप्रिलला महाराष्ट्र केसरी किताबाची कुस्ती मॅटवर रंगली. या कुस्तीत खुल्या म्हणजे 86 ते 125 किलो वजनी गटाच्या माती आणि गादी विभागाच्या अंतिम फेरीत विजयी झालेले दोन पैलवान आमनेसामने होते. विशेष म्हणजे दोघेही कोल्हापूरच्या तालमीत तयार झाले आहेत. पण यातील एक पृथ्वीराज पाटील कोल्हापूरचं तर दुसरा विशाल बनकर मुंबईचं प्रतिनिधित्व करत होता. अटीतटीच्या लढतीत अखेर पृथ्वीराजने विशालला 5-4 ने मात दिली.
Corona Vaccine : देशात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. 10 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत ते नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन कोरोना लसीचा बूस्टर लस घेऊ शकतील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे वय 18 वर्षे आहे आणि लसीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत, ते बूस्टर डोससाठी पात्र असतील.
Pakistan New PM : पाकिस्तानमध्ये मध्यरात्री राजकीय नाट्य पाहायला मिळालं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधात संसदेत आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मतदान झालं. यादरम्यान इम्रान खान यांना पराभवाचा सामना करावा लागला. अविश्वास ठरावाच्या बाजूने 174 मते पडली. इम्रान खान यांचा पक्ष पीटीआय मतदान प्रक्रियेत सहभागी झाला नाही. इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वी पंतप्रधान निवासस्थान सोडले. पीटीआयचे खासदार फैसल जावेद यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'त्यांनी सभ्यतेने पदभार सोडला आणि नतमस्तक झाले नाही.'
दरम्यान, आता पुढील पंतप्रधानाची निवडणूक सोमवारी होणार आहे. इम्रान खान यांच्या विरोधात एकजूट राहिलेल्या विरोधकांनी शाहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाचा आधीच नवा चेहरा बनवलं आहे. अशा स्थितीत शाहबाजच पंतप्रधान होणार हे स्पष्ट झालं आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Corona Booster Dose: आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना 'बूस्टर'; लसींच्या किमतीही घटल्या
Corona Vaccine : देशात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. 10 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत ते नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन कोरोना लसीचा बूस्टर लस घेऊ शकतील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे वय 18 वर्षे आहे आणि लसीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत, ते बूस्टर डोससाठी पात्र असतील.
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या किमती घटवल्या
सीरम इन्स्टिट्यूकडून उत्पादित करण्यात येणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीचे दर कमी करण्यात आली आहे. सीरमने खासगी रुग्णालयासठी कोव्हिशिल्डचे दर हे तब्बल 375 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. कोव्हिशिल्डची लस आता 225 रुपयांना मिळणार आहे. सोबतच भारत बायोटेकच्या सुचित्रा एला यांनी देखील खासगी रुग्णालयासाठी कोवॅक्सीनच्या किंमत कमी केल्या आहेत. कोवॅक्सीनची किंमत आता 1200 वरून 225 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Pakistan New PM : इम्रान खाननंतर 'हे' होणार पाकिस्तानचा पुढचे पंतप्रधान, सोमवारी होणार अधिकृत घोषणा
Pakistan New PM : पाकिस्तानमध्ये मध्यरात्री राजकीय नाट्य पाहायला मिळालं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधात संसदेत आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मतदान झालं. यादरम्यान इम्रान खान यांना पराभवाचा सामना करावा लागला. अविश्वास ठरावाच्या बाजूने 174 मते पडली. इम्रान खान यांचा पक्ष पीटीआय मतदान प्रक्रियेत सहभागी झाला नाही. इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वी पंतप्रधान निवासस्थान सोडले. पीटीआयचे खासदार फैसल जावेद यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'त्यांनी सभ्यतेने पदभार सोडला आणि नतमस्तक झाले नाही.'
दरम्यान, आता पुढील पंतप्रधानाची निवडणूक सोमवारी होणार आहे. इम्रान खान यांच्या विरोधात एकजूट राहिलेल्या विरोधकांनी शाहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाचा आधीच नवा चेहरा बनवलं आहे. अशा स्थितीत शाहबाजच पंतप्रधान होणार हे स्पष्ट झालं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -