Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी जर घराबाहेर पडून लोकलनं प्रवास करण्याच्या विचारात असाल, तर जरा थांबा. आधी मुंबई लोकलचं (Mumbai Local) वेळापत्रक तपासून घ्या. कारण, रविवारी (17 नोव्हेंबर 2024) मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक (Mega Block) घेतला जाणार आहे. तांत्रिक आणि इतर कामांसाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी, पश्चिम रेल्वे (Western Railways) मार्गावर गर्डर उभारणीच्या कामासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर 'मेगाब्लॉक' (Megablock On Central Railway)
मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी ते दुपारी 3 वाजून 55 मिनिटांनी या कालावधीत, मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
हार्बर मार्गावरही 'ब्लॉक' (Harbor Line Megablock)
हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 वाजून 10 मिनिटं ते 4 वाजून 10 मिनिटं या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील ब्लॉक कालावधीत सकाळी 10 वाजून 34 मिनिटं ते दुपारी 3 वाजून 36 मिनिटांपर्यंत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेल डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सकाळी 10 वाजून 16 ते दुपारी 3 वाजून 47 मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या सीएसएमटीसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. या कालावधीत सीसीएसएमटी ते कुर्ला आणि कुर्ला ने पनवेल/वाशी दरम्यान विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गावर ब्लॉक (Block On Slow Route of Western Railway)
पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान पुलाच्या पुनर्बाधणीसाठी अप आणि डाऊन धौम्या मार्गावर तसेच अप आणि डाउन हार्बर मार्गावर 12 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवारी मध्यरात्री 12 वाजून 30 मिनिटं ते रविवारी सकाळी 11 वाजून 30 मिनिटं या कालावधीत घेतला जाणार आहे. जोगेश्वरी ते गोरेगाव स्थानकादरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच, राम मंदिर स्थानकावर गाडी थांबणार नाही. प्रवाशांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.