मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा (Jogeshwari Plot Scam) प्रकरणाची फाईल अखेर बंद करण्यात आली आहे. त्यामुळे रवींद्र वायकर यांच्या मागचं चौकशी प्रकरण थांबले असून त्यांचा ससेमिरा गेला आहे. मुंबई महापालिकेने वायकर यांच्याविरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे नमूद केले आहे.
मुंबईतील जोगेश्वरी येथील सुप्रिमो क्लबचा गैरवापर करून तिथे हॉटेल्स बांधताना माहिती लपवल्याचा आणि बनावट माहितीच्या आधारे महापालिकेकडून विविध परवानग्या घेण्यात आल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात दाखल प्रकरण बंद करण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल न्यायालयात दाखल केला होता. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला अहवाल महानगर दंडादाधिकारी न्यायालयाने मान्य केला आहे. मुंबई महापालिकेने वायकर यांच्याविरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नेमकं काय होतं प्रकरण?
रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधले आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेनं वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. वायकर चौकशीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता वायकरांना ईडीकडून देखील समन्स बजावण्यात आलं होतं. आता हे प्रकरण बंद करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या