Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : बॉर्डर गावसकर ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आनंदाची बातमी दिली आहे. खरंतर, रोहित शर्मा आज दुसऱ्यांदा बाप झाला आहे. त्यांची पत्नी रितिका सजदेहने गोंडस बाळाला जन्म दिला. रोहित शर्माच्या घरातून ही आनंदाची बातमी समजल्यानंतर चाहते खूप आनंदी झाले आहेत. 


रोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाबा






भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि रितिका सजदेह आज दुसऱ्यांदा बाबा झाले. रोहित आणि रितिका यांना आधी एक मुलगी आहे. तिचे नाव समायरा आहे. रोहित आणि रितिका यांनी 2015 मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या 3 वर्षानंतर म्हणजेच 2018 मध्ये रोहित आणि रितिका पहिल्यांदाच आई-वडील झाले आणि समायरा यांचा जन्म झाला. आता लग्नासाठी 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दोघेही दुसऱ्यांदा आई-वडील झाले असून रितिकाने मुलाला जन्म दिला आहे. या दोघांनीही आपल्या मुलाचे नाव काय ठेवले आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.(Indian captain Rohit Sharma and wife Ritika Sajdeh have been blessed with a baby boy)






रोहित पर्थ कसोटीत खेळणार?


रोहित शर्मा भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला नव्हता. मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला अजून सात दिवस बाकी आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवली जाणार आहे. म्हणजेच रोहित आज म्हणजेच 15 तारखेला दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. अशा स्थितीत रोहितची पर्थ कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियात पोहोचण्याची शक्यता लक्षणीय वाढली आहे. मात्र, रोहित पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


बॉर्डर गावसकर ट्रॉफीचे वेळापत्रक


पहिली कसोटी: 22 ते 26 नोव्हेंबर
दुसरी कसोटी : 6 ते 10 डिसेंबर
तिसरी कसोटी: 14 ते 18 डिसेंबर
चौथी कसोटी : 26 ते 30 डिसेंबर
पाचवी कसोटी : 3 ते 7 जानेवारी


बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जैसवाल मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.