Maharashtra Breaking News 05 May 2022 : महाराष्ट्रातली 28 वी महापालिका म्हणून इचलकरंजीची घोषणा होणार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 May 2022 09:21 PM
महाराष्ट्रातली 28 वी महापालिका म्हणून इचलकरंजीची घोषणा होणार

महाराष्ट्रातील 28 व्या महानगरपालिकेची घोषणा करण्यात आली आहे.   राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत  28 वी नवी महानगरपालिका होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात यापुढे  दोन महानगरपालिका असणार आहे. राज्य शासनाच्यावतीने इचलकरंजी महानगरपालिकेची घोषणा केली.

राणांचा तुरुंगातला अनुभव ऐकला, इंग्रजांची आठवण झाली: सोमय्या

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. कारागृहातून सुटका होताच नवनीत राणा यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास जाणवत असल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशातच त्यांची भेट घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या हे पोहोचले आहेत. राणा दाम्पत्यांची भेट घेतल्यानंतर ते म्हणाले आहेत की, नवनीत राणा आणि रवी राणा यांचा तुरुंगातला अनुभव ऐकला. त्यांचा अनुभव ऐकून मला इंग्रजांच्या काळाची आठवण झाली, असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.    

Ravi Rana : नवनीत राणांना होणाऱ्या त्रासावर प्रशासनाचे दुर्लक्ष: रवी राणांचा आरोप

गेल्या सहा दिवसांपासून नवनीत राणा या त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल सांगत होत्या, पण प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. ते तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर नववीत राणांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचले आहेत. 

Ravi Rana :  रवी राणा 12  दिवसानंतर कारागृहातून बाहेर

Ravi Rana :  रवी राणा 12  दिवसानंतर कारागृहातून बाहेर आले आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर रवी राणा लीलावती रुग्णालयात  नवनीत राणा यांना भेटायला जाण्याची शक्यता आहे.

जेवण दिलं नाही म्हणून दगड आणि लोखंडी फुकणीने मारुन आईचा खून, कवठेमहांकाळमधील घटना, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Sangli News : जेवण दिले नाही म्हणून आईचा दगड आणि लोखंडी फुकणीने मारुन खून केल्याचा धक्कादायक प्रकार कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव गावात घडला आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आगळगाव येथील पाटील मळ्यात राहणाऱ्या राजाक्का ज्ञानू जाधव (वय 70 वर्षे) या महिलेला मुलगा दशरथ जाधवने जेवण दिलं नसल्याच्या कारणावरुन दगड, विट आणि लोखंडी फुकणीने जबर मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेला तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. मात्र या दरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलाल दारुचं व्यसन असून रोज तो आईशी भांडत होता आणि मारहाण करत होता, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. या प्रकरणी नातू गणेश भोसले यांनी तक्रार दिली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे..
राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही : भाजप खासदार बृजभूषण सिंह

Brij Bhushan Singh :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.मात्र अयोध्येला येण्याआधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागवी, असा इशारा  भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना दिला आहे

नवनीत राणांची भायखळा तुरुंगातून सुटका, मानदुखीचा त्रास बळावल्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल

Navneet Rana : न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा यांची भायखळा कारागृहातून सुटका झाली आहे. कारागृहात प्रकृती बिघडल्यामुळे नवनीत राणांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय

Nawab Malik Updates : नवाब मलिक यांचा मुक्काम तूर्तास जेजे रुग्णालयातच, नवाब मलिक यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार करण्याकरता केलेल्या अर्जावर न्यायालयात सुनावणी 

Nawab Malik Updates :  नवाब मलिक यांचा मुक्काम तूर्तास जेजे रुग्णालयातच, नवाब मलिक यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार करण्याकरता केलेल्या अर्जावर न्यायालयात सुनावणी, नवाब मलिक यांचा खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी ईडीचा विरोध, मलिक यांचा उपचार जेजे रुग्णालयात करण्यात यावा मात्र नवाब मलिक यांच्या कडून सुचविलेल्या खाजगी डॉक्टर आणि जेजे रुग्णालयचे डॉकटर मिळून करतील उपचार

Navneet Rana Updates : नवनीत राणा 12 दिवसांनंतर तुरुंगाबाहेर, भाजप नेते किरीट सोमय्या खासदार नवनीत राणांची भेट घेणार

Navneet Rana Updates : नवनीत राणा 12 दिवसांनंतर तुरुंगाबाहेर, भाजप नेते किरीट सोमय्या खासदार नवनीत राणांची भेट घेणार

Navneet Rana News : नवनीत राणा भायखळा कारागृहाबाहेर, प्रकृती बिघडल्यामुळं उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करणार

#BREAKING : नवनीत राणा भायखळा कारागृहाबाहेर, प्रकृती बिघडल्यामुळं उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करणार

Navneet Rana & Ravi Rana Updates : नवनीत राणा यांची रिलीज ऑर्डर भायखळा कारागृहाच्या वॉरंट बॉक्समध्ये टाकले, रवी राणा यांची रिलीज ऑर्डर 2.30 वाजेपर्यंत पोहोचणार

Navneet Rana & Ravi Rana Updates : नवनीत राणा यांची रिलीज ऑर्डर भायखळा कारागृहाच्या वॉरंट बॉक्समध्ये टाकले, रवी राणा यांची रिलीज ऑर्डर 2.30 वाजेपर्यंत पोहोचणार, रवी राणा 4 ते 5 वाजेदरम्यान जेलमधून बाहेर येण्याची शक्यता 

मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली समर्पित मागासवर्गीय आयोगाची भेट.. 

मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली समर्पित मागासवर्गीय आयोगाची भेट.. 


शक्य तितक्या लवकर इम्पिरिकल डाटा देण्याची मागणी, राज्य सरकार संपूर्ण सहकार्य करण्यास तयार 


यावेळी मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे, उपस्थित होते तर 


समर्पित ओबीसी आयोगाचे अध्यक्ष आणि माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया,  आयोगाचे सदस्य एच. बी. पटेल,पंकज कुमार,  महेश झगडे, नरेश गीते, शैलेशकुमार दरोकर उपस्थित होते

राष्ट्रवादी महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची नियुक्ती, राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांची घोषणा  

#BREAKING : राष्ट्रवादी महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची नियुक्ती, राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांची घोषणा, रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त जागी चव्हाण यांची नियुक्ती

लोकप्रतिनीधींनी जबाबदारीनं वागलं पाहिजे, प्रक्षोभक वक्तव्य करता कामा नये : शरद पवार

Sharad Pawar : लोकप्रतिनीधींनी जाहीर वक्तव्य करताना जबाबदारीने वागलं पाहिजे. त्यांनी प्रक्षोभक वक्तव्य करता कामा नये. जेणेकरून समाजातील विविध स्तरात त्याचे पडसाद उमटून जातीय तेढ निर्माण होईल. जर तसं होत असेल तर त्याची जबाबदारी त्या नेत्याचीच असेल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

Pune News : गुणरत्न सदावर्ते यांचा विरोध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी पोलीस स्टेशनच्या बाहेर

Pune News : गुणरत्न सदावर्ते यांचा विरोध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी पोलीस स्टेशनच्या बाहेर, सदावर्ते यांनी एका मुलाखतीत छत्रपती शिवरायांच्या वंशजांबद्दल केलं होतं आक्षेपार्ह विधान


मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी करणार विरोध

Ratnagiri News : मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना धमकीचा फोन
Ratnagiri News : मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना धमकीचा फोन.. 

 

वैभव खेडेकर यांना आलेला फोन परदेशातून.. 

 

मनसेनं उचललेल्या भोंगा भूमिकेच्या अनुशंघाने फोन.. 

 

भूमिका बदला अन्यथा घरात येवून मारण्याची धमकी.. 

 

वैभव खेडेकर खेडच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देणार.. 

 

धमकीचा फोन आलेल्या व्यक्तीने नाव सांगितले नाही..
भिमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार चौकशी आयोगासमोर हजर, साक्ष नोंदवणार



भीमा कोरेगाव दंगल ही जाणीवपूर्वक घडवली - रामदास आठवले

शरद पवार हे आज हजर राहणार असतील तर ते त्या संदर्भात त्यांची बाजू मांडतील


मात्र आमचं म्हणणं आहे की भीमा कोरेगाव दंगल ही जाणीवपूर्वक घडवली गेली.


त्या दंगलीचा आणि एल्गार परिषदेचा काहीही संबंध नाही


संभाजी भिडे यांना क्लिन चीट मिळाली असेल. कारण त्यांच्याविरोधात पुरावे नसतील


संभाजी भिडेंवर कारवाई व्हावी ही आमची भूमिका आहे


आयोगाला त्या संदर्भात पत्र लिहू

गुणरत्न सदावर्ते भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात हजर, सदावर्तेंवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा

गुणरत्न सदावर्ते भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात हजर. सदावर्तेंवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.. त्या प्रकरणात हजर राहण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली होती.. त्यानुसार गुणरत्न सदावर्ते पोलीस ठाण्यात हजर झाले

औरंगाबादमध्ये 50 रुपयांचं पेट्रोल टाकण्यावरुन सेव्हन हिल पुलाजवळील पेट्रोल पंपावर गुंडांचा धुडगूस

Aurangabad News : औरंगाबादमध्ये 50 रुपयांचं पेट्रोल टाकण्यावरुन सेव्हन हिल पुलाजवळील पेट्रोल पंपावर गुंडांनी धुडगूस घातला. पोलिसांनी प्रकरण समजून घेत गुंडांना पकडणं अपेक्षित असताना त्यांनी गुंडांना सोडून चक्क गुंडाच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांनाच खाक्या दाखवला. तर वार्तांकनासाठी आलेल्या दोन पत्रकारांनाही व्हॅनमध्ये कोंबलं आणि ठाण्यात नेलं. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या एकाने 50 रुपयांचं पेट्रोल टाकलं. पैसे देऊन गाडी पुढे घेतल्यावर त्याला पेट्रोल टाकलं की नाही, याची शंका आली. त्याने पेट्रोल टाकले की नाही, असं विचारुन वाद केला. काही वेळात आपल्या मित्रांना बोलवून पंपावर धुडगूस घातला. तर वाद सोडवण्यासाठी गेलेल्या लोकांना मारहाण केली.

वसंतराव नाईक मराठवाड कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ प्रमोद येवले, औरंगाबाद विद्यापीठासह परभणीचा अतिरिक्त पदभार सांभाळणार

Parbhani News : परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण हे उद्या 6 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत.  त्यांच्या जागी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबाद विद्यापीठासह परभणीचा अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे असणार आहे, असे आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी काढलेल्या आदेशात त्यांनी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे (कृषी विद्यापीठ) अधिनियम, 1983 च्या कलम 17(4) अन्वये त्यांना बहाल केलेल्या अधिकारांचा वापर करताना, औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद गोविंदराव येवले यांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कुलगुरु म्हणून नियुक्ती केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील त्यांच्या स्वत:च्या कर्तव्याव्यतिरिक्त, 7 मे 2022 पासून, पुढील आदेशापर्यंत डॉ. येवले यांच्याकडे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची जबाबदारी राहणार आहे.


बुलढाण्यात आयुर्वेदिक जडीबुटीच्या नावाखाली रुग्णांना गंडवणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांना अटक

Buldhana News : बुलढाण्यात आयुर्वेदिक जडीबुटीच्या नावाखाली रुग्णांना गंडवणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. हे बोगस डॉक्टर शहराच्या मध्यवर्ती भागात स्टॉल लावून आयुर्वेदिक जडीबुटीच्या सहाय्याने सांधेदुखी बरी करतो, असा विश्वास रुग्णांना देऊन औषधी विकत होते. बुलढाणा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन बुलढाणा शहर पोलिसांनी त्यांना अटक केली. हे दोन्ही डॉक्टर हरियाणातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Petrol-Diesel Price on 5th May 2022 : जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर

Petrol-Diesel Price on 5th May 2022 : आधीच महागाईनं सर्वसामान्य बेहाल झाले आहेत. अशातच देशातील पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल (Petrol Price) -डिझेलचे (Diesle Price) आजचे नवे दर जारी केले आहेत. आजही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जवळपास एक महिन्यापासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. यापूर्वी 6 एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली होती. पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी 80-80 पैशांची वाढ करण्यात आली होती. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ प्रमोद येवले

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण हे उद्या 6 मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी विद्यापीठाच्या कुलगूरूपदी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबाद विद्यापीठासह परभणीचा अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे असणार आहे.असे आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले आहेत.  


राज्यपाल कोश्यारी यांनी काढलेल्या आदेशात त्यांनी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे (कृषी विद्यापीठ) अधिनियम,१९८३ च्या कलम १७(४) अन्वये त्यांना बहाल केलेल्या अधिकारांचा वापर करताना,  औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद गोविंदराव येवले यांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कुलगुरू म्हणून नियुक्ती केली आहे. डॉ.  आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील त्यांच्या स्वत:च्या कर्तव्याव्यतिरिक्त, 7 मे 2022 पासून, पुढील आदेशापर्यंत डॉ.येवले यांच्याकडे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची जबाबदारी राहणार आहे.

Hanuman Chalisa Row : पोलिसांना गुंगारा देत पळून जाणाऱ्या संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल, शोध सुरु; अटकेची शक्यता

Hanuman Chalisa Row : मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मशिदींवरील भोंग्यांविरोधात काल (बुधवारी) मनसेनं आंदोलन केलं. मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनसेच्या आंदोलनादरम्यान संदीप देशपांडे यांनी पळ काढल्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून त्यांची शोधाशोध सुरू झाली आहे. त्यावेळी पोलिसांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्यांच्यावर अटकेची कारवाईही होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांकडून संदीप देशपांडेंचा शोध सुरु आहे. त्यांना शोधण्यासाठी पोलीस राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थावरही पोहोचले होते. अशातच संतोष साळी (Santosh Sali) नावाचा व्यक्ती मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून संतोष साळी हा मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या निकटवर्तीय असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस धक्काबुक्की प्रकरणात संतोष साळी देखील आरोपी आहे. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होती. अशातच राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळून मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दोघांनीही पोलिसांच्या हातावर तुरी देत तिथून पळ काढला. या दरम्यान झालेल्या झटापटीत एक महिला पोलीस जखमी झाली. त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Loudspeaker Controversy : आज मुंबईत अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्यांशिवाय

Loudspeaker Controversy : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे आणि त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण याबाबत आवाज उठविल्यानंतर आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्यांचा वापराशिवाय झाली. कुर्ला येथील एससीएलआर जवळील विभागात तीन ते चार मोठ्या मशिदी आहेत. त्यामुळे इथे पहाटे 6 च्या आधीच मोठ्या आवाजात अजान होत असे. मात्र, आज या विभागात नमाज पठण झाले. पण लाउडस्पीकरवर अजाण झाली नाही. दरम्यान, मुंबईमधील काही मोठ्या मशिदीच्या ट्रस्टींनी एकत्र येत पहाटेची अजान स्पीकरवर न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Shirdi : शिर्डीत साईंची काकड आरती, शेजारती होणार लाऊडस्पीकर विना

Loudspeaker Controversy : राज ठाकरे यांच्या अल्टीमेटमनंतर पोलीस प्रशासनाने सर्वच धार्मिक स्थळांना नोटीस दिल्या असून याचा फटका शिर्डीच्या साईमंदिराला देखील बसलाय. साईबाबांची पहाटे होणारी काकड आरती आणि रात्री 10.30 ला होणारी शेजारती आता  लाऊडस्पीकर विनाच पार पडणार आहे. पोलिसांनी सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत साईबाबा संस्थानला लाऊडस्पीकर परवानगी दिली असल्याने स्पीकरविना होणाऱ्या आरतीमुळे भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे.  


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Bhima Koregaon : भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडेंचा सहभाग आढळला नाही, पोलिसांची न्यायालयात माहिती

Bhima Koregaon : भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या विरोधात 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासामाध्ये संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सहभाग आढळला नसल्याच पोलीसांनी न्यायालयात सांगितलंय. त्याचबरोबर राज्य मानवी हक्क आयोगालाही त्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात ज्या इतर 41 आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 1 जानेवारी 2018 ला भिमा कोरेगाव या ठिकाणी झालेल्या हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडेंचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केल्यानंतर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारनं संभाजी भिडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

Bhima Koregaon : भिमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार आज साक्ष नोंदवणार

NCP Supremo Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज भीमा कोरेगाव प्रकरणी आपला साक्ष नोंदवणार आहेत. भीमा कोरेगाव (Bhima Koregan) इथं घडलेल्या हिंसचाराची चौकशी करणाऱ्या जे. एन. पटेल आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार पवार साक्ष देणार आहेत. आयोगाकडून 5 आणि 6 मे रोजी मुंबईत होणाऱ्या सुनावणीत हजर राहण्यासाठी पवारांना देण्यात आलेलं हे तिसरे समन्स आहे. सकाळी साडेदहा वाजता शरद पवार आयोगासमेर साक्ष देणार असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणी शरद पवारांनी आपलं अतिरिक्त प्रतिज्ञापत्रही नुकतंच आयोगापुढे सादर केलं होतं. तसेच, यापूर्वी 23 आणि 24 फेब्रुवारीला शरद पवार आपली साक्ष नोंदवण्यासाठी आयोगापुढे हजर राहणार होते. पण काही कारणास्तव ते हजर राहू शकले नाहीत. दरम्यान, आज भीमा कोरेगाव प्रकरणी ते आपली साक्ष नोंदवणार आहेत. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


आज नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची तुरुंगात सुटका होऊ शकते 


अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. नवनीत राणा आणि रवी राणा यांना 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील खाजगी निवासस्थान 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याच्या जाहीर घोषणेवरून झालेल्या वादानंतर अटक करण्यात आली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत या जोडप्याने ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची त्यांची योजना रद्द केली होती. विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे यांनी बुधवारी राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला. जामिनावर सुटल्यानंतर अर्जदाराने असा कोणताही गुन्हा करू नये आणि प्रकरणाशी संबंधित कोणत्याही विषयावर माध्यमांशी बोलू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, आज त्यांची तुरुंगात सुटका होऊ शकते.


जोपर्यंत मशिदीत लाऊडस्पीकर वाजत आहेत, तोपर्यंत हनुमान चालीसा मोठ्या आवाजात वाजतच राहणार : राज ठाकरे


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी सांगितले की, जोपर्यंत मशिदींवरील लाऊडस्पीकर बंद होत नाहीत, तोपर्यंत त्यांचे कार्यकर्ते मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवत राहतील. पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलिसांची खिल्ली उडवली आणि सांगितले की, पोलिस त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहेत, परंतु जे कायदा पाळत नाहीत त्यांना सोडत आहेत. राज ठाकरे यांनी दावा केला की, जेव्हा त्यांनी मशिदीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन केले, तेव्हा 90 ते 92 टक्के मशिदींनी सकाळच्या अजानसाठी लाऊडस्पीकर वापरला नाही. बुधवारपासून मशिदींवरील लाऊडस्पीकरविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला होता. राज ठाकरे यांनी दावा केला की मुंबईत 1,104 मशिदी आहेत, त्यापैकी 135 मशिदींनी बुधवारी सकाळच्या प्रार्थनेदरम्यान लाऊडस्पीकरचा वापर केला. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या मशिदींवर काय कारवाई केली जात आहे, असा सवाल त्यांनी केला.


माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा मनसुखच्या हत्येचा मुख्य सूत्रधार :  एनआयए


मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसुख हिरण हत्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा असल्याचं सांगण्यात येत आहे. एनआयएने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की, प्रदीप शर्मा यांना मनसुख हिरण यांची हत्या कर्णयातही एक मोठी रक्कम दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप शर्मा यांच्या जामिनाच्या सुनावणीवेळी एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. त्यात असं सांगण्यात आलं आहे की,  सचिन वाझेने मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्मांना 45 लाख रूपये दिले होते. यासोबतच मनसुख हिरण यांचा हत्येचा कात हा प्रदीप शर्मा यांनीच रचला होता, असं या प्रतिज्ञापत्रात एनआयएने म्हटलं आहे. हे प्रतिज्ञापत्र दाखल करत एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या जामिनाला विरोध केला आहे. याप्रकरणी आणखी काही नावे समोर येऊ शकतात. यातच हे 45 लाख रुपये नेमके दिले कोणी? सचिन वाझे यांनी दिले आहे, तर त्यांना हे पैसे दिले कोणी? याबाबत एनआयए तपास करत आहे.   


भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात शरद पवारांना पाच आणि सहा मे रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे 


भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील युद्ध स्मारकावर जानेवारी 2018 मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाच आणि सहा मे रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाने यापूर्वी 2020 मध्ये पवारांना समन्स बजावले होते, परंतु कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे ते आयोगासमोर हजर राहू शकले नाहीत. 


यवतमाळ- वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले


यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. महिला प्रतिष्ठान ट्रस्टमधील मनी लाँड्रिंग प्रकरण बरेच जुने आहे. याआधीही भावना यांना ईडीने समन्स बजावले होते, मात्र त्या अद्याप ईडीसमोर हजर झालेल्या नाही. ईडी गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ट्रस्टचे खाजगी कंपनीत फसवणूक करण्याच्या गुन्हेगारी कटाच्या मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करत आहे.


आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघात लढत 


आज आयपीएलमध्ये (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे संघ मैदानात उतरणार आहेत. गुणतालिकेत पाचव्या स्थानी असलेल्या हैदराबादला आजचा विजय पुढील फेरीत एन्ट्रीसाठी महत्त्वाचा आहे. तर दिल्लीही चार विजयासंह सातव्या स्थानी असल्याने त्यांनाही स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आज विजय मिळवणं महत्त्वाचं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.