Interesting Facts About Lightning : सध्या पावसाळ्याचे (Monsoon) दिवस आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुसळधार पावसासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही पाहायला मिळतो. या मेघगर्जनेसह वीज कोसळण्याच्या अनेक घटनाही कानावर येतात. पावसाळ्यात वीज कोसळून अनेक माणसं आणि प्राण्यांनाही जीव गमवावा लागल्याचं कानावर येतं. आज आम्ही तुम्हाला वीज कोसळण्याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त?
पावसाळ्याच्या दिवसात वीज कोसळण्याच्या घटना सर्वाधिक घडतात. शहरांपेक्षा ग्रामीण भागात जास्त वीज कोसळण्याचं प्रमाण जास्त असते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या लोकांवर वीज पडण्याची शक्यता जास्त असते. पावसाळ्यात वीज पडण्याचं प्रमाण वाढतं. पण तुम्हाला माहित आहे का की, वीज कोणत्या गोष्टींवर सर्वात जास्त पडते? तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल की काळे कपडे घातलेल्या लोकांवर वीज पडण्याची शक्यता जास्त असते, असा दावा केला जातो. दरम्यान, काळे कपडे घातलेल्या व्यक्तीला विजेचा धक्का बसण्याची शक्यता असते का? याबाबतचं नेमकं तथ्य काय आहे, हे जाणून घ्या.
पावसाळ्यात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ
मान्सूनचे आगमन होताच वीज पडण्याच्या घटना वाढल्याचं पाहायला मिळत आहेत. विजेचा धक्का लागून अनेकदा व्यक्तीचा मृत्यू होतो. एखाद्या व्यक्तीला विजेपासून कसे वाचवता येते आणि कोणत्या ठिकाणी वीज सर्वात जास्त कोसळते हे तुम्हाला माहीत आहे का? कोणत्या लोकांना वीज कोसळण्याचा सर्वाधिक धोका असतो हे जाणून घेण्यापूर्वी, वीज कशी निर्माण होते आणि वीज कोसळल्यायामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू का होतो हे जाणून घ्या.
या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
मिडिया रिपोर्टसमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, 1872 मध्ये वैज्ञानिक बेंजामिन फ्रँकलिन यांनी पहिल्यांदा ढगांमध्ये वीज पडण्याचं नेमके कारण सांगितलं होतं. फ्रँकलिन यांनी सांगितलं होतं की, ढगांमध्ये पाण्याचे छोटे कण असतात. ढगांमधील पाण्याच्या छोट्या कणांचं हवेसोबत घर्षण झाल्यामुळे चार्ज तयार होतो. काही ढग पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक चार्ज होतात, तर काही निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक चार्ज होतात. जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे चार्ज असलेले ढग आकाशात एकमेकांवर आदळतात तेव्हा लाखो व्होल्ट वीज निर्माण होते. काहीवेळा अशा प्रकारे निर्माण होणारी वीज पृथ्वीपर्यंत पोहोचण्याएवढी जास्त असते. या घटनेलाच आपण सोप्या भाषेत वीज कोसळणे म्हणतो.
कुणावर वीज कोसळण्याचा धोका जास्त?
काही लोक सांगतात की, पावसाळ्यात काका-पुतणे एकत्र बाहेर गेल्यावर त्यांच्यावर वीज पडण्याची शक्यता असते, तुम्हीही अनेकदा असं ऐकलं असेल. याशिवाय काळे साप आणि काळ्या वस्तूंवर किंवा काळ्या कपड्यांवर वीज कोसळण्याची शक्यता अधिक असते, असं सांगितलं आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, वीजेबाबत केलेले हे सर्व गृहित दावे चुकीचे आहेत. खरंतर, वीज कोणावरही कधीही आणि कुठेही पडू शकते. वीज कोणत्याही विशिष्ट व्यक्तीवर, रंगावर किंवा जागेवर पडत नाही.