मुंबई : अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) आज 8 जूलैला 66 वा वाढदिवस साजरा करत आहे. नीतू कपूरने रुपेरी पडद्यावर दीर्घकाळ राज्य केलं पण, हे यश मिळवणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. नीतू कपूरने फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक बड्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. पण, इथे पोहोचण्यापर्यंतचा तिच्या प्रवासात तिच्या आईची फार मोठी भूमिका आणि फार मोठी संघर्ष होता. नीतू कपूरच्या आईने वेश्यागृहातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं. या दोघींची संघर्षमय कहाणी वाचा.


वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं


नीतू कपूरच्या आजीला तिच्या नातेवाईकांनी वेश्या व्यवसायात विकलं. हरजीत सिंग ही पंजाबी कुटुंबातील मुलगी होती. ती 10 वर्षांची असताना हरजीतच्या आई-वडिलांचे निधन झालं. त्यानंतर नातेवाईकांनी 10 वर्षांच्या हरजीतला जबर मारहाण केली आणि नंतर तिला दिल्लीला नेऊन विकलं. वयाच्या 18 व्या वर्षी हरजीत सिंह या जीवनाला कंटाळून तिथून पळून काढला. यावेळी तिला एका ड्रायव्हरने मदत करत आपल्या कारमध्ये बसवलं, तो दुसरा कोणी नसून लखनौचा प्रसिद्ध नवाब अमिनउल्ला शेख होता. त्याचे आधीच लग्न झालं होतं आणि पण त्याने तिला आसरा दिला. 


नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी


4 वर्षानंतर नवाब शेखचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या पत्नी आणि मुलांनी हरजीतला घराबाहेर हाकलून दिले. हरजीतला पुन्हा एकदा दारोदारी ठेच खाऊ लागली. यानंतर तिचं नशीब तिला पुन्हा वेश्यालयात घेऊन गेलं. लखनौच्या जमाल खान या श्रीमंत माणसाने हरजीतला पुन्हा वेश्यालयात विकलं आणि पुन्हा ती तेच काम करण्यास भाग पडली, ज्यातून तिने पळ काढला होतो. वेश्यालयाचा दलाल फतेह सिंगने हरजीतशी लग्न केलं आणि त्यांना एक मुलगी झाली. लग्न आणि मुलगी झाल्यानंतरही तिच्या वाटेचं दु:ख संपलं नव्हतं. वेश्यालयाच्या अटीनुसार, तिला वेश्या व्यवसाय करावाच लागत होता. हरजीतने मुलीचं नवा राजी सिंह ठेवलं. 


राजी सिंह नीतू सिंहची आई 


राजी ही दुसरी कोणी नसून नीतू सिंगची आई होती. राजी सिंह याचं नीतू सिंह म्हणजे आताच्या नीतू कपूरची आई. राजी मोठी झाल्यावर तिच्यासोबतही तेच होऊ लागलं, जे तिच्या आईसोबत व्हायचं. वयाच्या 14 व्या वर्षापासून तिला या व्यवसायात ढकललं गेलं. राजी खूप महत्त्वाकांक्षी होती आणि तिला पुढे जायचं होतं. एक अभिनेत्री बनण्याचं तिचं स्वप्न होतं. तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजी वयाच्या 22 व्या वर्षी वेश्यालयातून दिल्लीला पळून गेली.


बालकलाकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात


वेश्याव्यवसायातून पळाल्यानंतर ती एका गिरणीत काम करू लागली. मिलमध्येच त्यांची दर्शन सिंह नावाच्या मुलाशी तिची ओळख झाली. हळूहळू दोघांचं प्रेम जुळलं आणि त्यांनी लग्न केलं. लग्नाच्या एका वर्षानंतर त्यांना मुलगी झाली. त्यांनी मुलीचं नाव हरनीत सिंग ठेवलं. ही मुलगी नंतर प्रसिद्ध अभिनेत्री नीतू सिंग म्हणून प्रसिद्ध झाली. हरनीत जेव्हा 5 वर्षांची झाली तेव्हा तिचे आईवडील तिच्यासोबत दिल्लीहून मुंबईला शिफ्ट झाले. येथे, हरनीतला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देऊन, राजी सिंगने पुन्हा अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केला. तिने स्टुडिओला भेट द्यायला सुरुवात केली, पण प्रत्येक वेळी तिच्या पदरी  निराशाच पडली. मग तिला समजलं की, आता तिची अभिनेत्री बनण्याची वेळ निघून गेली आहे. यानंतर त्या स्वतःसाठी नाही तर आपल्या मुलीसाठी काम शोधू लागल्या. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आणि राजश्री प्रॉडक्शनच्या सूरज या चित्रपटासाठी बाल कलाकार म्हणून हरनीत कौरची निवड झाली.


बेबी सोनिया ते नीतू सिंह हा प्रवास


फिल्म इंडस्ट्रीत हरनीत कौरला बेबी सोनिया हे नाव मिळालं. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि 8 वर्षांच्या हरनीतला काम मिळू लागलं. बेबी सोनियाने दस लाख, दो दुनिया चार आणि दो कलियांसारखे चित्रपट केले आणि प्रत्येक चित्रपट हिट झाला. दो कलियांमध्ये बेबी सोनियाने दुहेरी भूमिका साकारली होती आणि तिच्या कामाची  खूप प्रशंसा झाली. या चित्रपटातील 'बच्चे मन के सच्चे' हे गाणे लता मंगेशकर यांनी गायलं होतं आणि हे गाणं आजही अनेकांच्या मनात घर करुन आहे. राजी सिंगला आपल्या मुलीला कोणत्याही किंमतीत मोठी अभिनेत्री बनवायचं होतं. राजी यांना वाटलं की, आपली मुलगी फक्त बाल कलाकारच होईल, म्हणून तिने बेबी सोनियाला पंजाबमधील तिच्या गावी नेलं. 


तीन वर्षांनी नीतूसोबत मुंबईत परतले


राजी सिंहन तीन वर्षानंतर 1973 मध्ये आपल्या मुलीसह मुंबईत परतल्या. त्यांनी आपल्या मुलीचे नाव नीतू सिंग ठेवलं. नीतू सिंग आता खूपच सुंदर तरुणी झाली होती. आतापर्यंत लोक बेबी सोनियाला विसरले होते. यानंतर त्यांनी पुन्हा चित्रपटांमध्ये काम शोधण्यासा सुरुवात केली. नीतू सिंहला 'रिक्षावाला' नावाचा पहिला चित्रपट मिळाला, यामध्ये रणधीर कपूर मुख्य भूमिकेत होते. 'रिक्षावाला' चित्रपट फ्लॉप झाला. फ्लॉप इमेज बदलण्यासाठी आईने नीतू सिंगचं एक बोल्ड फोटोशूट केलं. नीतू सिंहचं बोल्ड फोटोशूट एका प्रसिद्ध मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालं, त्यानंतर मात्र चित्रपटात साईन करण्यासाठी नीतूच्या मागे चित्रपट निर्मात्यांची रांग लागली होती. मात्र, नीतू फक्त त्या चित्रपटांनाच हो म्हणायची ज्यासाठी तिची आई हो म्हणायची. 1973 मध्ये नीतू कपूर 'यादों की बारात' या चित्रपटात दिसली, हा चित्रपट सुपरहिट झाला आणि नीतू सिंगच्या करिअरलाही सुरुवात झाली.


नीतू कपूर ऋषी कपूरच्या प्रेमात पडल्या


यानंतर नीतू सिंहची ऋषी कपूर यांच्यासोबत भेट झाली. नीतू आणि ऋषी कपूर यांनी खेल खेल में, दो दुनिया चार, दूसरा आदमी, रफू चक्कर, पतनी और वो, झूठा कहीं का आणि अमर अकबर अँथनी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. यादरम्यान त्यांचं प्रेम फुललं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही जोडी चाहत्यांच्याची पसंतीची होती, पण नीतूच्या आईचा या नात्याला विरोध होता. जेव्हा राजी सिंगला तिच्या आणि ऋषी कपूरच्या अफेअरबद्दल कळले तेव्हा त्यांनी नीतूला मारहाणही केली, कारण त्या खूप संघर्ष करून इथंपर्यंत पोहोचल्या होत्या. नीतूने लग्न करून इतर सुनांप्रमाणे गृहिणी व्हावं असे आईला वाटत नव्हतं. जेव्हा ऋषी कपूर यांनी नीतूचा हात मागितला आणि तिला सोबत नेण्याचं वचन दिलं, तेव्हा आईने होकार दिला. 1980 मध्ये ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी मोठ्या थाटामाटात लग्न झालं. लग्नानंतर नीतूने चित्रपटात काम करणं बंद केलं. नीतू आणि ऋषी कपूरला मुलगी रिद्धिमा कपूर आणि मुलगा रणबीर कपूर अशी दोन मुले आहेत. रिद्धिमा फॅशन डिझायनर आहे, तर रणबीर आघाडीचा अभिनेता


नीतू कपूर आजी झाली 


2020 मध्ये ऋषी कपूर यांचे निधन झाले आणि दोन वर्षांनी रणबीर कपूरने आलिया भट्टसोबत लग्न केलं. रणबीर आणि आलियाला राहा नावाची एक मुलगी असून नीतू कपूर आजीही झाली आहे. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूरने तिची दुसरी इनिंग सुरू केली आणि अनिल कपूरसोबत ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटात दिसली. अनेक टीव्ही रिॲलिटी शोमध्ये ती पाहुणी म्हणूनही दिसली आहे.