Maharashtra Breaking News 04 July 2022 : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Jul 2022 12:05 PM
Sindhudurg News : तळकोकणातील आंबोलीमधील नागरतास धबधब्याजवळ झाड कोसल्यानं तीन तास वाहतूक ठप्प

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले बेळगाव राज्य महामार्गावर आंबोली नागरतास धबधब्या जवळ झाड कोसळून रस्त्यावर पडल्यामुळे तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी दोन किलोमीटर पर्यत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे हे झाड रस्त्यावर कोसळून पडल्याने तीन तास वाहतूक ठप्प होती. वनविभागाने स्थानिकांच्या मदतीने झाडाचा काही भाग बाजूला केल्याने एकेरी वाहतूक तीन तासांनंतर सुरू झाली.

Crime News : पैठणमध्ये सुवर्णपेढीवर तोतया सीबीआय अधिकाऱ्यांचा छापा; चारजण अटकेत

Crime News : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे माजी नगराध्यक्षांच्या सोन्याचांदीच्या दुकानावर पैसे उकळण्याच्या उद्देशानं सीबीआय अधिकारी असल्याचं सांगत छापा टाकणाऱ्या चार तोतयांना अटक करण्यात आली आहे. पैठण शहरातील व्यापारी, माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांच्या ज्वेलरीच्या दुकानावर काल दुपारी या तोतया अधिकाऱ्यांनी तुमच्या विरोधात तक्रार केली असून आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलं. दरम्यान दुकान मालकांना याचा संशय आल्यानं त्यांनी पोलिसांना हा प्रकार सांगितल्यानंतर हा संपूर्ण बनवट प्रकार उघडकीस आला. 

Coronavirus Update : देशात 16 हजार 135 नवे कोरोना रुग्ण

Coronavirus Update : देशातील कोरोनाच्या संसर्गात किंचित वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 135 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात 13 हजार 958 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सध्या भारतात 1 लाख 13 हजार 864 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा सकारात्मकता दर 4.85 इतका आहे.


देशात शनिवारी दिवसभरात 16 हजार 103 नवीन कोरोनाबाधितांची नोंद आणि 31 रुग्णांचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. त्याच्या तुलनेनं रविवारी समोर आलेली रुग्णांची संख्या कमी आहे. पण देशातील कोरोना संसर्ग अद्याप कायम आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Nashik News : नाशिकच्या बॉईज टाऊन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा

Nashik News : नाशिकच्या बॉईज टाऊन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा मोठा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेली दोन वर्ष हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने झाल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला होता मात्र आज सकाळी विठू माऊलीच्या गजराने शाळेचे मैदान दुमदुमून गेले होते. सर्व मुला-मुलिंनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते कोणी विठोबा तर कोणी वासुदेव बनले होते. मैदानावर पालखी सोहळा पार पड़ताच पंढरपुरच्या वारीप्रमाणेच रिंगणच देखिल ईथे आयोजन करण्यात आले होते, मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तूळशी वृंदावन बघून हे जणू खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता. रिंगण आटोपल्यावर टाळ मृदुंगाच्या गजरात विठूरायाची भजने गात, फुगड्या खेळत आणि पसायदान म्हणत ह्या सोहळ्याचा शेवट झाला. हा सर्व सोहळा बघण्यासाठी पालकांनीही ईथे मोठी गर्दी केली होती.  

शिंदे सरकारची बहुमत चाचणी; विश्वासदर्शक ठरावासाठी थोड्याच वेळात मतदान

Nagpur News : नुपूर शर्मा च्या वादग्रस्त वक्तव्याचे आणि त्यानंतर सुरू असलेल्या अराजकतेचे प्रकरण आता वेगळ्या वळणावर?

Nagpur News : नुपूर शर्माला पाठिंबा देणारी पोस्ट सोशल मीडियावर केल्यानंतर उदयपूर येथील कन्हैयालाल तर अमरावती मधील उमेश कोल्हे यांच्या हत्या झाल्या आणि देशातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले. आता नागपूरात तशीच दुर्दैवी घटना घडू नये यासाठी एका कुटुंबाला आपलं घर आणि शहर सोडून अज्ञात ठिकाणी राहावं लागतंय. कारण त्यांनाही विपरीत परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या येत आहेत.

Amravati News : अमरावती शहरात आज उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली देण्यासाठी राजकमल चौकात गर्दी, पोलिसांची करडी नजर

Amravati News : अमरावती शहरात आज उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली देण्यासाठी राजकमल चौकात गर्दी. यासाठी पोलिसांनी रुटमार्च काढला. यावेळी राजकमल चौकाला पोलिसांच्या छावणीचं रूप प्राप्त झालं होतं. यावेळी पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी एबीपी माझाला माहिती दिली की, 500 पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या रूटमार्च मध्ये सहभागी झाल्या अशी माहिती त्यांनी दिली. शहरातील संवेदनशील भागातून हा रूटमार्च काढण्यात आला.

Amravati News : अमरावती शहरात आज उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली देण्यासाठी राजकमल चौकात गर्दी, पोलिसांची करडी नजर

Amravati News : अमरावती शहरात आज उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली देण्यासाठी राजकमल चौकात गर्दी. यासाठी पोलिसांनी रुटमार्च काढला. यावेळी राजकमल चौकाला पोलिसांच्या छावणीचं रूप प्राप्त झालं होतं. यावेळी पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी एबीपी माझाला माहिती दिली की, 500 पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या रूटमार्च मध्ये सहभागी झाल्या अशी माहिती त्यांनी दिली. शहरातील संवेदनशील भागातून हा रूटमार्च काढण्यात आला.

CBSE 10th Result 2022 : cbresults.nic.in वर आज जाहीर होणार CBSE दहावीचा निकाल?

CBSE 10th Result 2022 Date : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र बोर्डाचे इयत्ता दहावीचे निकाल जाहीर करण्यात आले. अशातच अद्याप केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) चे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सीबीएसई बोर्डाचे निकाल कधी लागणार? हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) आज, 04 जुलै 2022 रोजी CBSE 10वी टर्म 2 बोर्ड परीक्षा 2022 चा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. CBSE मॅट्रिक टर्म 2 परीक्षेत बसलेले विद्यार्थी त्यांच्या रोल नंबरच्या मदतीनं CBSE निकाल तपासू शकतात.  


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Petrol-Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठा दिलासा!

Petrol-Diesel Price Today 4th July : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. पण तरिदेखील देशातील पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) मात्र स्थिर आहेत. आज 4 जुलै रोजी भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही. आज सलग 44व्या दिवशी देशातील पेट्रोल (Petrol) -डिझेलचे दर (Diesel Price) स्थिर आहेत. जवळपास दीड महिन्यापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल 111.20 डॉलर प्रति बॅरल रुपयांनी विकलं जात आहे. दरम्यान, पोर्ट ब्लेअरमध्ये देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये लिटर रुपयांनी विकलं जात आहे. 


यापूर्वी 21 मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यानंतर इंधनाचे दर स्थिर आहेत. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Gyanavapi Masjid Case : ज्ञानवापी प्रकरणी आज वाराणसी जिल्हा न्यायालयात सुनावणी

Gyanavapi Masjid Case : उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर या प्रकरणी आजपासून पुन्हा सुनावणीला सुरुवात होणार आहे. ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाच्या पूजेच्या मागणीसाठी दाखल याचिकेवर दुपारी 2 वाजता ही सुनावणी होणार आहे.

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या दौऱ्यावर

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. आंध्र प्रदेशमध्ये मोदींच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक अल्लूरी राजूच्या 30 फूट उंच प्रतिमेचं अनावरण होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यानंतर, मोदी गुजरातला जातील. गांधीनगरमध्ये मोदी पीएम डिजिटल वीक 2022 चं उद्घाटन करणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी 4.30 वाजता आहे.

Maharashtra News : अमरावतीत कोल्हे हत्या प्रकरणाविरोधात निषेध मोर्चा 

Maharashtra News : व्यावसायिक कोल्हे यांच्या हत्येच्या निषेधार्त आज सकाळी 11 वाजता अमरावतीच्या राजकमल चौकात हजारोंच्या संख्येने जमाव जमणार असल्याचं अयोजकांच्या वतीने सांगण्यात येतंय. उमेश कोल्हे यांच्या हत्येचा निषेध करत हा जमाव शांततेत घोषणाबाजी न करता त्यांना श्रद्धांजली वाहणार आहे. यावेळी भाजप, विहिंप, बजरंग दल, व्यापारी आणि अमरावतीकर नागरिक असतील. हत्येतील मुख्य आरोपी इरफान शेख याला वगळून सगळ्या 6 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार आहे. या 6 आरोपींना आज अमरावती न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

Maharashtra News : मेधा सोमय्या बदनामी प्रकरणी संजय राऊत यांना समन्स 

Maharashtra News : किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेनेच्या संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. सोमय्या दाम्पत्याचा सहभाग शौचालय घोटाळ्यात असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. याच प्रकरणी संजय राऊत यांना सकाळी 11 वाजता शिवडी कोर्टात हजर राहायचं आहे.

Maharashtra Politics : आज खातेवाटपाबाबत शिंदे- भाजपाची बैठक

Maharashtra Politics : भाजपाची शिंदे गटासोबत मंत्रीमंडळ वाटपाबाबत बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होईल. भाजपच्या कोअर कमिटीसोबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Maharashtra Politics : शिवसेनेला धक्का, गटनेतेपदी एकनाथ शिंदे कायम

Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्षपदी भाजपच्या राहुल नार्वेकरांची निवड झाल्यानंतर आज शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेच शिवसेनेचे गटनेते असतील असं पत्र विधिमंडळ सचिवालयानं दिलं असून शिवसेनेच्या भरत गोगावले यांची निवड रद्द करण्यात आली आहे. तसेच सुनिल प्रभू यांना शिवसेनेने प्रतोदपदी नियुक्ती केली होती, तीदेखील रद्द करण्यात आली. त्या ठिकाणी शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला हा मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जातंय. 




 


Maharashtra Politics : शिवसेनेला धक्का, गटनेतेपदी एकनाथ शिंदे कायम

Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्षपदी भाजपच्या राहुल नार्वेकरांची निवड झाल्यानंतर आज शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेच शिवसेनेचे गटनेते असतील असं पत्र विधिमंडळ सचिवालयानं दिलं असून शिवसेनेच्या भरत गोगावले यांची निवड रद्द करण्यात आली आहे. तसेच सुनिल प्रभू यांना शिवसेनेने प्रतोदपदी नियुक्ती केली होती, तीदेखील रद्द करण्यात आली. त्या ठिकाणी शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला हा मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जातंय. 




 


Maharashtra Politics : नेमका कुणाचा व्हिप लागू होणार?

Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्षपदासाठी व्हिप विरोधात मतदान केल्याने 39 आमदारांच्या विरोधात शिवसेनेनं अध्यक्षांकडे निलंबनाची मागणी केली आहे. शिंदे गटानेही 16 आमदारांना व्हिपच्या विरोधात मतदान केल्यानं पत्र दिलं आहे. त्यामुळे आता ही लढाई न्यायालयात जाण्याची दाट शक्यता आहे. 

Maharashtra Politics : आज बहुमत चाचणी, शिंदे सरकारसाठी कसोटीचा दिवस

Maharashtra Politics : आज शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी लागणार आहे. सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु होणार आहे. आवाजी मतदानानं बहुमत चाचणी होणार आहे.

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


आज बहुमत चाचणी, शिंदे सरकारसाठी कसोटीचा दिवस
आज शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी लागणार आहे. सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु होणार आहे. आवाजी मतदानानं बहुमत चाचणी होणार आहे.


नेमका कुणाचा व्हिप लागू होणार?
विधानसभा अध्यक्षपदासाठी व्हिप विरोधात मतदान केल्याने 39 आमदारांच्या विरोधात शिवसेनेनं अध्यक्षांकडे निलंबनाची मागणी केली आहे. शिंदे गटानेही 16 आमदारांना व्हिपच्या विरोधात मतदान केल्यानं पत्र दिलं आहे. त्यामुळे आता ही लढाई न्यायालयात जाण्याची दाट शक्यता आहे. 


शिवसेनेला धक्का, गटनेतेपदी एकनाथ शिंदे कायम
विधानसभा अध्यक्षपदी भाजपच्या राहुल नार्वेकरांची निवड झाल्यानंतर आज शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेच शिवसेनेचे गटनेते असतील असं पत्र विधिमंडळ सचिवालयानं दिलं असून शिवसेनेच्या भरत गोगावले यांची निवड रद्द करण्यात आली आहे. तसेच सुनिल प्रभू यांना शिवसेनेने प्रतोदपदी नियुक्ती केली होती, तीदेखील रद्द करण्यात आली. त्या ठिकाणी शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला हा मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जातंय. 


आज खातेवाटपाबाबत शिंदे- भाजपाची बैठक
भाजपाची शिंदे गटासोबत मंत्रीमंडळ वाटपाबाबत बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होईल. भाजपच्या कोअर कमिटीसोबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित राहणार आहेत.


विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवारांचं नाव निश्चित? 
काल रात्री विरोधी पक्षनेतेपदाच्या नावासाठी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडल्याची माहिती आहे. आज विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांचं नाव जाहीर होईल अशी शक्यता आहे.


बंडखोरीनंतर शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची बैठक
आज शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची दुपारी 12 वाजता सेना भवनमध्ये बैठक होणार आहे. तर संध्याकाळी 7 वाजता मुंबईतील विभागवार पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर होणार आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर या बैठकींचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार आहेत.


मेधा सोमय्या बदनामी प्रकरणी संजय राऊत यांना समन्स 
किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेनेच्या संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. सोमय्या दाम्पत्याचा सहभाग शौचालय घोटाळ्यात असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. याच प्रकरणी संजय राऊत यांना सकाळी 11 वाजता शिवडी कोर्टात हजर राहायचं आहे.


अमरावतीत कोल्हे हत्या प्रकरणाविरोधात निषेध मोर्चा 
व्यावसायिक कोल्हे यांच्या हत्येच्या निषेधार्त आज सकाळी 11 वाजता अमरावतीच्या राजकमल चौकात हजारोंच्या संख्येने जमाव जमणार असल्याचं अयोजकांच्या वतीने सांगण्यात येतंय. उमेश कोल्हे यांच्या हत्येचा निषेध करत हा जमाव शांततेत घोषणाबाजी न करता त्यांना श्रद्धांजली वाहणार आहे. यावेळी भाजप, विहिंप, बजरंग दल, व्यापारी आणि अमरावतीकर नागरिक असतील. हत्येतील मुख्य आरोपी इरफान शेख याला वगळून सगळ्या 6 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार आहे. या 6 आरोपींना आज अमरावती न्यायालयात हजर केलं जाणार आहे.


वारी अपडेट
आज संत ज्ञानेश्वरांची पालखी बरडहून निघेल आणि नातेपुतेला मुक्कामी थांबेल. तर संत तुकारामांची पालखी इंदापूरहून निघून सराटीला थांबेल.


ज्ञानवापी प्रकरणी आज वाराणसी जिल्हा न्यायालयात सुनावणी
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर या प्रकरणी आजपासून पुन्हा सुनावणीला सुरुवात होणार आहे. ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाच्या पूजेच्या मागणीसाठी दाखल याचिकेवर दुपारी 2 वाजता ही सुनावणी होणार आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. आंध्र प्रदेशमध्ये मोदींच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक अल्लूरी राजूच्या 30 फूट उंच प्रतिमेचं अनावरण होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यानंतर, मोदी गुजरातला जातील. गांधीनगरमध्ये मोदी पीएम डिजिटल वीक 2022 चं उद्घाटन करणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी 4.30 वाजता आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.