Maharashtra Breaking News LIVE Updates : देश-विदेशातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
आज महाराष्ट्र दिन
राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा केला जोतो. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच दिवशी कामगार दिन देखील साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी जवळपास 106 जणांनी आपले बलिदान दिले. या हुतात्म्यांचे स्मरण 1 मे रोजी केले जाते.
राज ठाकरेंच्या सभेआधी मुंबईत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला 'बुस्टर डोस'
भारतीय जनता पार्टीकडून सोमय्या मैदानावर देवेंद्र फडणवीसांच्या बुस्टर डोस सभेचं आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त सन्मान सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्यासाठी राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, भाजपा मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये सभा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. महाराष्ट्र दिनी होणाऱ्या या सभेचं काऊंटडाऊन सुरु झालंय. औरंगाबादमध्ये होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आणखी एक टीझर मनसेनं प्रसिद्ध केलाय.
डॉ. सुमन बेरी नीति आयोगाच्या उपाध्यक्ष होणार
डॉ सुमन बेरी आजपासून नीति आयोगाच्या उपाध्यक्ष म्हणून पदभार सांभळणार आहे. राजीव कुमार आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पेन्शन पोर्टलचे उद्घाटन करणार
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पेन्शन पोर्टलचे उद्घाटन करणार आहेत. लोकभवनात मुख्यमंत्री योगी पेन्शन पोर्टलची सुरुवात करणार आहे.
आयपीएलचा डबल डोस, आज दोन सामने
ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिट्लस आणि राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्स रविवारी आमनेसामने आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. तर सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सायंकाळी सात वाजता भिडणार आहेत. चेन्नईचा संघ धोनीच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. रवींद्र जाडेजाने शनिवारी चेन्नईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.
आज इतिहासात
1919 : भारतीय प्रतिभासंपन्न पार्श्वगायक मन्ना डे यांचा जन्म
1955 : महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रांचा जन्म
1988 : अनुष्का शर्माचा वाढदिवस
1962 : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना
1983 : अमरावती विद्यापीठाची स्थापना
Devendra Fadnavis : दारूवरील कर 50 टक्क्यांनी कमी केला मग इंधनावरील कर का कमी केला जात नाही ; देवेंद्र फडणवीसांचा प्रश्न
दारूवरील कर 50 टक्क्यांनी कमी केला मग इंधनावरील कर का कमी केला जात नाही? हे सरकार फक्त दारूवाल्यांचं आणि बारवाल्यांच आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.
Devendra Fadnavis : नुसत्या इफ्तार पार्टीने रोजगाराचे प्रश्न सुटणार नाहीत ; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला
Devendra Fadnavis : नुसत्या इफ्तार पार्टीने रोजगाराचे प्रश्न सुटणार नाहीत असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला.
Devendra Fadnavis : तुमचं हिंदुत्व गदाधारी नाही तर गधाधारी आहे ; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल
तुमचं हिंदुत्व गदाधारी नाही तर गधाधारी आहे असा हल्लोबोल देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर केला आहे.
Devendra Fadnavis : तुम्ही रामाच्या बाजूने की रावणाच्या हे एकदाच स्पष्ट करा ; देवेंद्र फडणवीस यांचे शिवसेनेला आव्हान
तुम्ही रामाच्या बाजूने की रावणाच्या हे एकदाच स्पष्ट करा, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेला केले आहे.
बाबरी प्रकरणी 32 आरोपी भाजपमधील ; देवेंद्र फडणवीस यांचा दावा
बाबरी प्रकरणी 32 आरोपी भाजपमधील होते. त्यात शिवसेनेच्या एकाचाही समावेश नव्हता असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.