Maharashtra Live Updates: ऐन दिवाळीत मुंबईत जोरदार पाऊस, नागरिकांची तारांबळ उडाली
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Updates: दीपावलीच्या पर्वात आज लक्ष्मीपूजन आहे. केरसुणी, लाह्या, बत्ताशांनी बाजारपेठा व्यापल्या आहेत. तर संध्याकाळी लक्ष्मीसह कुबेर, भगवान विष्णू आणि गणेशाचं पूजन करण्यात येतं. लक्ष्मीपूजनानिमित्त शेअर बाजार मुहूर्त ट्रेडिंगसाठी फक्त एका तासासाठी खुला राहणार आहे. यंदा संध्याकाळऐवजी दुपारी पावणे दोन ते पावणेतीनदरम्यान मुहूर्त ट्रेडिंग असणार आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
Mumbai Rain : ऐन दिवाळीत मुंबईत जोरदार पाऊस, नागरिकांची तारांबळ उडाली
ऐन दिवाळीमध्ये मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. पश्चिम उपनगरात मागील पंधरा ते वीस मिनिटांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, विलेपार्ले या सर्व परिसरात पावसाच्या जोर जास्त आहे. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाल्याचं दिसून येतंय.
एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक, उपोषणस्थळीच बंजारा समाजाची दिवाळी
एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक, जालन्यात सुरू असलेल्या उपोषणस्थळीच बंजारा समाजाची दिवाळी...
उपोषण स्थळी बंजारा महिलांकडून पारंपारिक वेशभूषेत चुलीवर स्वयंपाक, तर बंजारा समाजातील अविवाहित मुली जिल्हाधिकाऱ्यांकडे एसटी आरक्षणाचा पारंपारिक मेरा मागणार...
बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मागील चार दिवसापासून जालन्यात सुरू आहे विजय चव्हाण यांच उपोषण....
अँकर: जालन्यात एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक झालेला आहे जालन्यात सुरू असलेल्या बंजारा समाजाच्या उपोषण स्थळीच बंजारा समाजाकडून दिवाळी साजरी केली जात आहे.उपोषण स्थळी बंजारा महिलांकडून पारंपारिक वेशभूषेत चुलीवर स्वयंपाक केला जात आहे.तर बंजारा समाजातील अविवाहित मुली जिल्हाधिकाऱ्यांकडे एसटी आरक्षणाचा पारंपारिक मेरा देखील मागणार आहे.बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मागील चार दिवसापासून जालन्यात विजय चव्हाण या तरुणाच आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून अद्यापही सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात असल्यामुळे बंजारा समाजाकडून निषेध म्हणूने उपोषण स्थळीच स्वयंपाक करत दिवाळी साजरी केली जात आहे..
























