Maharashtra Live: ज्येष्ठ बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यातील पावसाचे अपडेट्स मिळवा एका क्लिकवर.
LIVE

Background
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहूतून बुधवारी दुपारी प्रस्थान ठेवणार आहे आणि याच सोहळ्याची लगबग सध्या देहूत पाहायला मिळते आहे. विविध नेतेमंडळी या प्रस्थान सोहळ्यासाठी देहूत दाखल होणार आहेत. इंद्रायणी काठावर वारकऱ्यांची मांदीयाळी पाहायला मिळत आहे. यंदा संस्थानाने तीन बैलजोड्या खरेदी केल्या आहेत. पालखीपुढे चालणारा मानाचा पेठ बाभुळगावकरांचा अश्व मंगळवारी चिखली येथे मुक्कामी असणार आहे. (ashadhi wari 2025)
हिंदी भाषा सक्तीला महाराष्ट्र साहित्य मंडळाचा तीव्र विरोध, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत दर्शवली नाराजी
पुणे
हिंदी भाषा सक्तीला महाराष्ट्र साहित्य मंडळाचा तीव्र विरोध
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत दर्शवली नाराजी
पुण्यात आज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते
यामध्ये महाराष्ट्र शासनाने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केलेला नाही तसा शासन निर्णय काल प्रसिद्ध करण्यात आला आहे
याबाबत पत्रकार परिषद घेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आपली भूमिका जाहीर केली आहे.
हिंदी सक्तीला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने तीव्र विरोध केला आहे
याबाबतचे एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले
इतर राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा शिकवली जात नाही
मग महाराष्ट्रात आपण का लादत आहात?
हिंदी व अन्य भाषा शिकवण्याचा निर्णय तात्काळ शासनाने रद्द करावा
या बैठकीला अध्यक्ष मिलिंद जोशी,भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख लेखक,अच्युत गोडबोले यांच्यासह अन्य लेखकाने सहभाग दर्शवला...
सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये भीषण दुर्घटना, हवेतूनच पाळणा तुटला; एकाचा मृत्यू, 2 जखमी
सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमधील (Water park) फिरत्या पाळण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. येथील पार्कमध्ये वेगात पाळणा फिरत असताना एक पाळणा निसटून पडल्याने पाळण्यातील तिघेजण जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत भिगवण येथील तुषार धुमाळ नावाचे व्यावसायिक अत्यंत गंभीर जखमी झाले होते. धुमाळ यांना तात्काळ अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. धुमाळ हे भिगवण येथील नावाजलेले एलआयसी उद्योजक आहेत. दरम्यान, अपघातातील इतर दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.























