Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातल्या स्थानिक राजकारणातला चर्चेतला विषय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून 17 नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल. राज्यभरात सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे मात्र अनेक भागात महायुती की माविआ म्हणून निवडणुका लढवणार हे अद्याप स्पष्ट नाही. 17 नोव्हेंबरही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारिख आहे. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल आहे.
भाजपला दूर ठेवत कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र
भाजपला दूर ठेवत कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र
चंदगड नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनोमिलन
मंत्री हसन मुश्रीफ यांनी कुपेकर गट आणि राजेश पाटील यांना आणलं एकत्र
विधानसभा निवडणुकीत नंदाताई बाभुळकर आणि राजेश पाटील होते एकमेकांच्या विरोधात
राजर्षी शाहू विकास आघाडी स्थापन, काँग्रेस देखील सोबत येणार असल्याचा दावा
आमदार संदीप क्षीरसागर यांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपाच्या वाटेवर; आमदार भावाला देणार आव्हान
बीड: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर आहेत. याबाबतीत हेमंत क्षीरसागर यांनीच स्पष्टता दिलीय. आजपर्यंतच्या निवडणुकीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत राहिलेले त्यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर यांचा भाजपा प्रवेश निश्चित होतोय. विकासाचा दृष्टिकोन ठेवून भाजपा बरोबर जात असल्याचं क्षीरसागर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. आतापर्यंत बीड विधानसभा मतदार संघात हेमंत क्षीरसागर यांची संदीप क्षीरसागर यांना साथ राहिली. मात्र आता सख्ख्या भावाकडूनच संदीप क्षीरसागर यांना राजकीय आव्हान मिळणार असे चित्र दिसत आहे.























