Maharashtra Breaking LIVE News Updates: देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Live Blog Updates 1 September 2025 : राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली. मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
लालबागचा राजा पंडालातील व्हीआयपी – सामान्य दर्शन प्रकरणात मानवाधिकार आयोगाकडून नोटीस
वसई : लालबागचा राजा गणेशोत्सव पंडालातील व्हीआयपी आणि सामान्य दर्शन या वेगळ्या व्यवस्थेविरोधात दाखल केलेल्या तक्रारीवर राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.
अॅडव्होकेट आशीष राय आणि ॲड पंकज मिश्रा यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी करताना आयोगाने या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलिस आयुक्त, लालबाग मंडळ सचिव, मंत्रालय तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका यांना नोटीस बजावली आहे.
आयोगाने सर्व संबंधितांना लवकरात लवकर लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
तक्रारदारांचा आरोप आहे की, सार्वजनिक गणेशोत्सव असूनही दर्शन व्यवस्थेत व्हीआयपी आणि सामान्य भक्तांमध्ये भेदभाव केला जातो. या पद्धतीमुळे सामान्य नागरिकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागते, तर काहींना विशेष सवलत मिळते. हे भाविकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
मानवाधिकार आयोगाच्या हस्तक्षेपामुळे आता राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांना आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
बाईट - ॲड. आशिष राय (तक्रारदार)
भंडाऱ्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची हजेरी
Anchor : दुपारच्या सुमारास भंडाऱ्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात आलेल्या या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भात पिकाची लागवड केल्यानंतर पावसानं उसंत घेतली होती. त्यामुळं अनेक भागातील भातपीक करपायला लागलं होतं. तर, शेतीला मोठंमोठ्या भेगा पडल्या होत्या. या मुसळधार पावसामुळं आता भातपिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. दुपारी 2 वाजता सुरू झालेला पाऊस तब्बल अडीच तासानंतरही सुरूचं आहे.


















