Maharashtra News Live update : देश विदेशातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
शूर वीरांची भूमी ही महाराष्ट्राची ओळख, या भूमीला मी वंदन करतो : योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ
शूर वीरांची भूमी ही महाराष्ट्राची ओळख, या भूमीला मी वंदन करतो
महाराष्ट्रातील अनेक महापुरुषांच्या कार्याचा योगी आदित्यनाथ यांनी भाषणात दिला उजाळा
सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत
2014 च्या आधी भारताचा देशभरामध्ये सन्मान होत नव्हता
ना शेतकरी, ना व्यापारी,ना मुली देशात सुरक्षित होत्या
2014 नंतर परिस्थिती बदलली देशाची सीमा सुरक्षित झालेय
दहशतवाद पूर्णपणे नष्ट झालाय
भारतात कुठे बॉम्बस्फोट झाला तर पाकिस्तान पहिल्यांदा स्पष्टीकरण देते की आम्ही हे केलं नाही
मुंबईतील सहाही जागा महायुती जिकणार मुख्यमंत्र्यांचा विश्वास ...
मुंबईतील सहाही जागा महायुती जिकणार मुख्यमंत्री यांचा विश्वास ...
बैठकीत मुख्यमंत्री यांनी सांगितले ,जे नाराज आहेत त्यांची समजूत काढली जाणार ...
प्रत्येकाने महायुतीचा धर्म पळाला पाहिजे ...कामाला लागा ,पुढील भविषयसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची ....
समोरचे टीका करत राहणार आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही विकासाचा मुद्दा सगळ्यांसमोर मांडा, आपला अजेंडा हा "विकास" हाच असला पाहिजे
महाराष्ट्रातल्या इतर भागातील निवडणुका आता पूर्ण झाले आहेत, त्यामुळे तिथल्या आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची व्यवस्था मुंबईमध्ये करा, त्यांची मुंबईसाठी मदत घ्या,
मविआचे जास्तीत जास्त खासदार संसदेत गेले पाहीजेत : शरद पवार
शरद पवार
घटना बदलायची आहे असे मोदीचेच खासदार सांगतात
उत्तर प्रदेश मधील खासदार म्हंटले की 400 पेशा जागा द्या, म्हणजे घटना बदलता येईल
मोदी घटना बदलायची नाही म्हणतात आणि खासदार असे वेगळे कसे काय बोलतात
आता पुन्हा सत्ता आल्यावर हे देखील करू शकतात
त्यामुळे सर्वांनी मविआ ला मदत करण्याची गरज, मविआचे खासदार संसदेत जास्तीत जास्त गेले पाहीजेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात मुंबईतील तिन्ही लोकसभा जागांचा आढावा घेणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात मुंबईतील तिन्ही लोकसभा जागांचा आढावा घेणार
बाळासाहेब भवनमध्ये मुख्यमंत्री, मुंबईतील सेनेचे तिन्ही उमेदवार आणि पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे
पुढचा प्रचार कसा करायचा या विषयी रणनीती आखली जाणार आहे
बालिश लोकांची सभा बाल उद्यानमध्येच होऊ शकते, राम सातपुतेंचा उद्धव ठाकरेंना टोला
राम सातपुते
उद्धव ठाकरेंची सभा चिल्ड्रेन पार्क मध्ये झाली : राम सातपुते
बालिश लोकांची सभा बाल उद्यानमध्येच होऊ शकते
ही निवडणूक प्रणिती विरुद्ध राम सातपुते अशी नाही ही धर्म वाचवण्यासाठी आहे
सोलापुरात लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींना बळी पडले जातं आहेत
साखर पेठचे नाव काही लोकांनी शक्कर पेठ केलं
15 मिनटं द्या म्हणणाऱ्या ओवीसी यांचा सोबत हात मिळवून
प्रणिती आणि त्यांच्या पप्पानी हिंदूंना संपवण्याची सुपारी घेतली