(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 25 नोव्हेंबर 2021 | गुरुवार | एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो
1. पगारवाढीच्या निर्णयानंतरही एसटी कर्मचारी संपावर ठाम, कर्मचाऱ्यांशी चर्चेनंतर सदाभाऊ आणि पडळकर आज भूमिका जाहीर करणार, एसटी ठप्प असल्यानं प्रवाशांचे हाल सुरुच
Maharashtra ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा म्हणून राज्य सरकारने त्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेंडू आता संपकऱ्यांच्या कोर्टात असून त्यावर चर्चा करण्यात येत आहे. अशातच काल (बुधवारी) एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत झालेल्या कालच्या बैठकीबाबत आम्ही सकारात्मक आहोत. सरकारने दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करणार आणि आज (गुरुवारी) यावर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी असलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे. सकाळी 11 वाजता माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सांगितलं. त्यामुळे सरकारनं केलेल्या घोषणेनंतर तरी आता एसटी कर्मचारी संपाला (ST Workers Strike) ब्रेक लावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
2. परमबीर सिंह यांनी अजमल कसाबचा फोन लपवला होता, निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांचा गंभीर आरोप
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना फरार घोषित केलं आहे. पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला होता. यावर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना फरार घोषित केलं आहे. अनेक आरोप असलेल्या परमबीर सिंहांवर आता आणखी एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. हा आरोप केलाय मुंबईच्या एका निवृत्त एसीपीनं. निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी परमबीर सिंह यांच्यावर आरोप केला आहे की, सिंह यांनी दहशतवाद्यांना मदत केली होती.
3. अनेक महिन्यांपासून बेपत्ता असलेले परमबीर सिंह सध्या चंदीगढमध्ये, सिंह यांची फोनवरुन एबीपी माझाला माहिती
4. शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण; मुंबई उच्च न्यायालय आज सुनावणार फैसला
5. पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा आणि हिवाळी अधिवेशनाबाबत आज निर्णय अपेक्षित, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष, मुख्यमंत्री ऑनलाईन उपस्थिती लावणार
6.हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी; सोनिया गांधींची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक
7. ममता बॅनर्जींचा काँग्रेसला मोठा धक्का, मेघालयमध्ये माजी मुख्यमंत्र्यांसह 12 आमदार तृणमूलच्या गळाला
8. राज्यात काल कोरोना मृतांच्या संख्येत वाढ, 960 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 1043 रुग्ण कोरोनामुक्त
9. भारतात लसीकरणाला मिळणार गती, डिसेंबरमध्ये स्पुटनिक लाईट वॅक्सीन होणार उपलब्ध
10. न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत टीम इंडिया अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणार, शार्दूल आणि श्रेयसकडून मोठ्या अपेक्षा