(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Election : कोल्हापूरच्या निवडणुकीत करुणा शर्मा यांना मिळाली 'इतकी' मतं; आता बीडची निवडणूक लढवणार का?
Karuna Sharma : शिवशक्ती पक्षाच्या संस्थापिका करुणा शर्मा यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणुक लढवली होती. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे.
कोल्हापूर: राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा (Karuna Sharma) यांना कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अवघी 132 मतं मिळाली आहेत. करुणा शर्मा यांनी शिवशक्ती या नवीन पक्षाची घोषणा केल्यानंतर थेट या पोटनिवडणुकीत उडी घेतली होती. त्यांचा पराभव झाल्यानंतर 2024 सालच्या बीड निवडणूक त्या लढवणार का असाही सवाल विचारला जात आहे.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजित कदमांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत आपल्या विजयाचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा यांना अवघी 132 मतं मिळाली आहेत. कोल्हापूर उत्तरमधील (Kolhapur Election) पोटनिवडणुकीत करूणा शर्मा अपक्ष उमेदवार होत्या.
आचारसंहितेचे उल्लंघन
दरम्यान, या निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे, जर निवडणुक रद्द झाली नाही तर आपण न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात जाणार असंही त्या म्हणाल्या. निवडणूक आयोगाकडे तक्रार करताना आपण संबंधित वृत्तपत्रांची कात्रणं दिली आहे. निवडणूक आयोगाचे तसेच कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. यावर गांभीर्याने विचार व्हावा अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे.
धनंजय मुंडेंच्या विरोधात निवडणूक लढवणार
येत्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा अशी लढत शंभर टक्के होणार असल्याचं शिवशक्ती पक्षाच्या करुणा शर्मा यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे बीडकरांना 2024 साली नवरा विरुद्ध बायको अशी लढत पहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Maharashtra Kolhapur North Election : कॉंग्रेस, भाजपाकडून आचारसंहिता उल्लंघन केल्याचा आरोप, निवडणुक रद्द करण्याची करुणा शर्मांची मागणी
- Karuna Sharma : आमच्या प्रेमकहाणीवरचे पुस्तक अंतिम टप्प्यात; अनेक पुरावे समोर आणणार : करुणा शर्मा
- Beed : 2024 ला नवरा विरुद्ध बायको निवडणूक गाजणार; करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडेंना आव्हान