Kolhapur : चांगभलंच्या गजरात यंदा होणार दख्खनचा राजा ज्योतिबाची यात्रा
Maharashtra Kolhapur News : ज्योतिबा चैत्र यात्रेचा 16 एप्रिल हा मुख्य दिवस आहे. दोन वर्षानंतर होणार्या यात्रेला दरवर्षीपेक्षा अधिक गर्दी होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.
कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची (Jyotiba Yatra) यात्रा या वर्षी पूर्ण क्षमतेने होणार आहे. या वर्षी यात्रेसाठी भाविकांना कोणतेही निर्बंध नसणार आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी माहिती दिली आहे.
श्री ज्योतिबाची यात्रा कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे सलग दोन वर्षे झालेली नाही. या वर्षी राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून पूर्ण क्षमतेने यात्रा भरवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 16 एप्रिल ला ज्योतिबा चैत्र यात्रेचा मुख्य दिवस आहे. दोन वर्षानंतर होणार्या यात्रेला दरवर्षीपेक्षा अधिक गर्दी होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.
चैत्र महिन्यात दरवर्षी ज्योतिबाच्या डोंगरावर यात्रा भरते. या यात्रेत सुमारे पाच ते सहा लाख भाविक उपस्थित असतात. मात्र कोरोनामुळे सलग दोन वर्षे ही यात्रा भरली गेली नाही. त्यामुळे यंदाच्या यात्रेला दरवर्षीपेक्षा जास्त भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यासाठी मंदिर आणि प्रशासन सज्ज आहे. महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशातून आलेल्या तब्बल पाच लाखाच्यावर भाविक या यात्रेला उपस्थित राहतात. गुलाल, खोबऱ्याची उधळण करत आणि जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात ही यात्रा उत्साहात पार पडली.
30 जूनपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा
अमरनाथ यात्रा यंदा 30 जूनपासून सुरू होणार आहे. यावेळी अमरनाथ यात्रा 43 दिवस चालणार असून परंपरेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी ती संपणार असल्याची माहिती जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. प्रवासादरम्यान भाविकांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. कोरोना निर्बंधांमुळे गेले दोन वर्षे यात्रा रद्द करण्यात आली होती. आता दोन वर्षानंतर भक्तांना अमरनाथ यात्रेची पर्वणी मिळणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha