एक्स्प्लोर

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : सागर, आशिष, वेताळ, जोतिबा सुवर्णपदकाचे मानकरी

महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार आता चांगलाच रंगात आला असून राज्य विजेतेपदाच्या कुस्तीत पुण्याच्या सागर मारकडला माती विभागाचं तर मॅट विभागात आशिष वावरेला सुवर्णपदक मिळालं आहे.

जालना : महाराष्ट्राच्या मातीतली प्रसिद्ध महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला जालन्याच्या आझाद मैदानावर कालपासून सुरुवात झाली आहे. कालच्या दिवशी राज्य कुस्ती विजेतेपदासाठीच्या 57 आणि 79 किलो वजनी गटाच्या कुस्त्या खेळवण्यात आल्या. महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार आता चांगलाच रंगात आला असून राज्य विजेतेपदाच्या कुस्तीत पुण्याच्या सागर मारकडला माती विभागाचं तर मॅट विभागात आशिष वावरेला सुवर्णपदक मिळालं आहे. सागर मारकडला 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार सध्या जालन्याच्या आझाद मैदानावर सुरु आहे. या स्पर्धेत राज्य कुस्ती विजेतेपदाच्या लढतीत पुण्याच्या सागर मारकडने 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. सागरनं माती विभागात कोल्हापूरच्या संतोष हिरगुडेला पराभवाची धूळ चारली. सागरनं अंतिम लढतीत कोल्हापूरच्या संतोष हिरगुडेचा 10-0 असा धुव्वा उडवला. सोलापूरच्या वेताळ शेळकेला 79 किलो वजनी गटाचं सुवर्णपदक राज्य विजेतेपद कुस्तीत माती विभागात सोलापूरच्या वेताळ शेळकेनं 79 किलो वजनी गटाचं सुवर्णपदक पटकावलं. तर सोलापूरच्याच जोतिबा अटकळेनं मॅट विभागातल्या 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. वेताळ शेळकेनं अंतिम फेरीच्या लढतीत उस्मानाबादच्या हनुमंत पुरीला चीतपट केलं. तर जोतिबा अटकळेनं आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातला त्याचाच सहकारी साताऱ्याच्या प्रदीप सूळवर 4-1 अशी मात केली. आशिष वावरेचं मॅट विभागात 79 किलो वजनी गटात सुवर्णपदक सोलापूरच्या आशिष वावरेनं मॅट विभागातल्या 79 किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. आशिषनं पुण्याचा पैलवान अक्षय चोरगेचा 10-2 असा धुव्वा उडवला. आशीष वावरेनं गतवर्षी 74 किलो वजनी गटात तिसरं स्थान पटकावलं होतं. आशीष हा सोलापूरच्या माळशेज तालुक्यातील मोरोशी गावचा पैलवान आहे. तिथे तो वस्ताद महादेव ठोरेंच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं काल जालन्याच्या आझाद मैदानावर औपचारिक उद्धाटन करण्यात आलं. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, अभिनेता अरबाज खान गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्पर्धेचे संयोजक आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगेही उपस्थित होते. महाराष्ट्र केसरीसाठीच्या कुस्त्यांना उद्यापासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र केसरी किताबासाठी यंदाही माती आणि मॅटवरच्या अनेक मातब्बर पैलवानांमध्ये चुरस रंगणार आहे. त्यामुळे त्यानिमित्तानं मराठवाड्यातल्या क्रीडारसिकांना तुफानी कुस्त्या पाहण्याची संधी मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mohit Kamboj Mumbai : उद्धव ठाकरेंना पक्ष सांभाळता आलानाही, देवेंद्र फडणवीस पुन्हा आले..Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वरTop 25 | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 04 December 2024 ABP MajhaEknath Shinde on Ajit Pawar : दादा को अनुभव हैं..सुबह-शाम शपथ लेनेकी, शिंदेंनी तुफान हसवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Embed widget