Sanjay Raut : परिस्थिती जैसे थे, सीमाप्रश्नी गृहमंत्री अमित शाहांनी नेमकं काय केलं? संजय राऊतांचा सवाल
Sanjay Raut : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मध्यस्थी केली म्हणजे नेमकं काय केलं? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.
Maharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) जाणूनबुजून आग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. बोम्मई रोज अपमान करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गप्प का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मध्यस्थी केली म्हणजे नेमकं काय केलं? परिस्थिती जैसे थे असल्याचे राऊत म्हणाले. ते आज सकाळी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी सीमावादावरुन राज्य सरकारवर टीका केली.
...तर तुम्ही मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी योग्य नाहीत
सीमावादावरुन जनतेच्या भावना तीव्र असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले. बोम्मई काय म्हणतात यापेक्षा महाराष्ट्र काय म्हणतोय हे महत्त्वाचं आहे. सीमावादाच्या मुद्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का? असा सवाल राऊतांनी उपस्थित कला आहे. सीमावादाचा मुद्दा असला तरी ऐकमेकांचा आदरभाव ठेऊन हा संघर्ष सुरु होता. दोन्ही राज्य एकाच देशाचे घटक असल्याचे राऊत म्हणाले. सीमाप्रश्नी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर भूमिका घेणार नसाल तर तुम्ही मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी योग्य नाहीत असेही राऊत म्हणाले. तुम्ही इतर सगळ्या विषयावर बोलता, मग सीमाप्रश्नावर का बोलत नाहीत असेही राऊत म्हणाले.
इतकं हतबल सरकार आजपर्यंत कधी बघितलं नाही
सीमाप्रश्नी तुम्ही जेव्हा दिल्ली गेले तेव्हा गृहमंत्री अमित शाह यांनी तुम्हीला गुंगीचं औषध दिलं का? असा सवालही राऊतांनी केला. लोकांच्या भावना तीव्र आहेत. ग्रामपंचायती एवढ्या जिंकल्या तेवढ्या जिंकल्या म्हणत आहेत. आधी गाव जात आहेत ते बघा? असा सवालही यावेळी राऊतांनी उपस्थित केला. बोम्मई काय बोलतात त्यावर तुम्ही बोला. इतकं हतबल सरकार आजपर्यंत कधी बघितलं नसल्याचे राऊत यावेळी म्हणाले.
नेमकं काय म्हणाले कर्नाटकचे मुख्यमंत्री
महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात सुरु असलेला सीमावादाचा (Boarder Dispute) मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. अशातच महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादात आणखी एक ठिणगी पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राला इंचभरही जमीन न देण्याचा पुनरूच्चार कर्नाटक विधिमंडळात मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला आहे. याबाबत विधिमंडळात ठराव मांडण्यात येणार असल्याची माहितीही कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी विधानसभेत सीमावादावर झालेल्या चर्चेदरम्यान स्वत: राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं ठराव पास करण्याची सूचना केली. तसेच, सीमावादावरील आपल्या भूमिकेचा यावेळी त्यांनी पुनरुच्चार केला.
महत्त्वाच्या बातम्या: