एक्स्प्लोर

Jalgaon News : जळगावात पोलिसांची मोठी कारवाई, तुरीच्या पिकांत चक्क गांजाची शेती! 61 लाखांची झाडे जप्त

Jalgaon Crime News : शेतामध्ये गांजा या मादक पदार्थाची लागवड होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती.

Jalgaon Crime News : जळगावात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एरंडोल तालुक्यातील खडकीसिम शेतशिवारातील गांजाची शेती स्थानिक पोलिसांनी उधळून लावली आहे. यावेळी पोलिसांनी तब्बल 61 लाख 25 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime News)

पोलिसांना मिळाली होती गोपनीय माहिती

या प्रकरणी एरंडोल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील खडकीसिम येथील दिगंबर पंडित पाटील यांच्या शेतात आणि नितीन डिगंबर पाटील यांच्या तूर पिकाच्या शेतामध्ये गांजा या मादक पदार्थाची लागवड केली जात असल्याची गोपनीय माहिती एरंडोल पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, विलास पाटील, राजेंद्र पाटील, अकिल मुजावर, मिलिंद कुमावत, संदीप पाटील, जुबेर खाटीक, पोलीस हवालदार पंकज पाटील, चालक हेमंत घोंगडे, होमगार्ड दिनेश पाटील यांच्यासह आदींनी शुक्रवार 4 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये 11 एकर क्षेत्रात 875 किलो गांजा आढळून आला. याचा शेतमालक हे गुजरात मध्ये राहत असून त्यांनी सदरचे शेत हे मेरसिंह खरटे यास कसण्यासाठी दिल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी दिली. संशयित मेरसिंह खरटे यास पोलिसांची कुणकुण लागतात तो पसार झाला. शेतात गांज्याची लागवड केल्याची माहिती पोलिसांना गुरुवारी सायंकाळी मिळाली होती. मात्र अंधार पडल्यामुळे शेतात काही दिसत नसल्यामुळे रात्रभर शेतात पोलिसांचा बंदोबस्त ठेवून आज सकाळी पंचनामा करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या शेताला चारही बाजूने तारेचे कुंपण करण्यात आलेले आहे. सदरच्या शेतात तीन ते चार वर्षांपासून  गांजासारख्या अमली पदार्थाची लागवड करण्यात येत असल्याची चर्चा परिसरातील शेतकऱ्यांमधील सुरू होती. 

दोन संशयित आरोपी शेतातून पसार  
दोन्ही शेतातून 61 लाख 25 हजार रुपये किंमतीचा 875 किलो गांजा तसेच 70 हजार रुपये किंमतीची दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली असल्याचे समजते. दरम्यान, दोन संशयित आरोपी हे शेतातून पसार झाले असल्याचे कळते. तर याबाबत पोलीस हवालदार विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

पुण्यात परप्रांतीय प्रेयसी बेपत्ता, पत्रकार प्रियकर चौकशीसाठी ताब्यात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर शिवसेना ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
Nashik TCS Case Nida Khan: मोठी बातमी: निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टात आज नेमकं काय घडलं?
निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टात आज नेमकं काय घडलं?
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
Maharashtra Live Blog Updates:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची आज बैठक 
Maharashtra Live Blog Updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची आज बैठक 

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर शिवसेना ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
Nandurbar Fire News: नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
Mumbai Crime News: पत्नीच्या नावाचे आधार कार्ड घेऊन दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम; तपासानंतर सगळे हादरले, मुंबईतील खळबळजनक घटना
पत्नीच्या नावाचे आधार कार्ड घेऊन दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम; तपासानंतर सगळे हादरले, मुंबईतील खळबळजनक घटना
सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी
सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
Embed widget