(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Headlines 5th June : राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर, वाचा दुपारच्या बातम्या
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने राज्यभरात नुकसान
राज्याच्या (Maharashtra) विविध भागात शनिवारी रात्री आणि रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने (Pre-Monsoon Rain)हजेरी लावली. या दरम्यान झाडं कोसळण्याचा तसंच विजेते खांब उन्मळून पडल्याच्या अनेक घटना घडल्या. झाडं आणि विजेचे खांब पडल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित (Power Supply) झाला होता. (वाचा सविस्तर)
शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Maharashtra Cabinet Expansion) तारखावर तारखा समोर येत आहेत. मात्र आता शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (4 जून) दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. (वाचा सविस्तर)
...तर कानाखाली आवाज काढेन, पुण्याच्या बैठकीत अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी
पुण्यात आज राष्ट्रवादीची (NCP) आठ लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं तसेच अंतर्गत वादावर देखील अजित पवारांनी भाष्य केले. मुळशीतील लोकांनी कामं करायची आहेत, तुम्हाला पद दिली आहेत. कामं केली नाहीत कानखाली देईन किंवा पद काढून घेईल असे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावले आहे. (वाचा सविस्तर)
Shiv Sena BJP Alliance : आगामी सर्व निवडणुका शिवसेना-भाजप एकत्रित लढवणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
राज्यातील आगामी सर्व निवडणुका शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) एकत्र लढवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची काल (4 जून) एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी या भेटीचं फलित झाल्याचं ट्वीट केलं आहे. (वाचा सविस्तर)
Sulochana Latkar : "सुलोचनादीदींच्या जाण्याने अवघी चित्रपटसृष्टी पोरकी"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं पार्थिवाचे अंत्यदर्शन
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज (5 जून) सायंकाळी 5.30 वाजता शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आता त्यांचे पार्थिव प्रभादेवी येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. (वाचा सविस्तर)