(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Headlines 10th May : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर, वाचा दुपारच्या बातम्या
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे संकेत
सत्तासंघर्षाच्या निकालाचा काऊंटडाऊन सुरू झाला झालाय. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. हा निकाल उद्या येणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान ही टिपण्णी केली आहे. घटनापीठाकडून उद्या दोन महत्वाच्या निकाल लागण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांनी दिली आहे. त्यामुळे सत्ता संघर्षावरही उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. वाचा सविस्तर
आमदार अपात्र ठरणार का? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाचा काऊंटडाऊन सुरु झाला असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुन्हा एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. "आमदार अपात्रतेचा निर्णय केवळ आणि केवळ विधानसभा अध्यक्ष घेऊ शकतात. विधानसभा अध्यक्षाने घटनाबाह्य निर्णय घेतला तरच सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करता येतो," असं नार्वेकर म्हणाले. दरम्यान, संजय राऊत यांनाही नार्वेकर यांनी परखड शब्दात उत्तर दिलं. राऊतांच्या टीकेला कुणीही महत्त्व देत नाही, त्यांचा कायद्याचा अभ्यास कच्चा आहे, असं नार्वेकर म्हणाले. याबाबत राहुल नार्वेकर यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. वाचा सविस्तर
जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महापालिका म्हणून घोषित; राज्य सरकारची घोषणा
जालना नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत होणार असून तशी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे जालना आता राज्यातील 29 वी महापालिका घोषित करण्यात आली असून, सरकारने तसे आदेश काढले आहेत. याबाबत नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी अधिसूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जालना नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत करण्यासंदर्भात राजकीय हालचाली सुरू होत्या. यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात आला होता. त्यामुळे हा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता. यासाठी सूचना आणि हरकती देखील मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखेर सरकारने जालना नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत करण्याचे आदेश काढले आहे. वाचा सविस्तर
सांगलीत नीट परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार, विद्यार्थ्यांचे उतरवले कपडे अन्....
सांगलीत नीट परीक्षेदरम्यान एका परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार घडला आहे. कॉपी टाळण्यासाठी परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देण्यास आलेल्या उमेदवारांना त्यांच्या अंगावरील कपडे आणि अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावून परीक्षा देण्यास लावले. अशी तक्रार उमेदवारांनी पालकांककडे केली. त्यानंतर पालकांनी या संतापजनक प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार केली आहे. वाचा सविस्तर
कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्ह ते वांद्रे-वरळी सी लिंक मार्ग जून 2024 पर्यत वाहतुकीसाठी खुला होणार?
मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वांद्रे-वरळी सी लिंक हा कोस्टल रोडचा दक्षिण भाग जून 2024 पर्यत वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न आहे. मरिन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानच्या दक्षिण कोस्टल रोडचं काम नोव्हेंबर 2023 पर्यत पूर्ण होणार आहे. वरळी ते वांद्रे-वरळी सी लिंक इंटर कनेक्टसाठी पाच ते सहा महिने अधिकचा वेळ लागणार आहे. शिवाय वरळी समुद्रातील एक खांब कमी केल्याने 611 कोटीचा अधिकचा खर्च वाढणार आहे, कोस्टल रोड प्रकल्पाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर चंद्रकांत कदम यांनी ही माहिती दिली. वाचा सविस्तर