एक्स्प्लोर
Advertisement
Gram Panchayat Elections 2021 : ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी जाहीर केलेला निधी देण्याचे आमदारांपुढे आव्हान
ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी लाखोंच्या ऑफर्स जाहीर केल्या होत्या. मात्र, आता बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना जाहीर केलेला निधी देण्याचे आव्हान आमदारांपुढे आहे.
मुंबई : कोरोना महामारी काळात लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुका अनेक अर्थांनी वेगळ्या ठरत आहे. लोकप्रतिनिधींच्या आवाहनानंतर अनेक गावांमध्ये वाद-विवाद विसरून गावाच्या विकासासाठी विरोधक एकत्र आलेत. मात्र, निवडणुका बिनविरोध करण्यासाठी आमदारांकडून लाखोंच्या ऑफर्स देण्यात आल्या. मात्र, आता बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना एव्हढा निधी द्यायचा कुठून असा प्रश्न आमदारांपुढे उपस्थित झाला आहे.
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि गावच्या विकासासाठी 25 लाख रुपये घेऊन जा' असे आवाहन पहिल्यांदा पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी केली. त्यानंतर अनेक लोकप्रतिनिधींनी अशाच लाखोंच्या ऑफर्स देऊ केल्या आहेत.
परभणीत 55 ग्रामपंचायतींना प्रत्येकी 25 लाखांचा निधी कसा द्यायचा?
यंदाची ग्रामपंचायत निवडणूक विशेष ठरली कारण जी ग्राम पंचायत बिनविरोध निघेल त्या ग्रामपंचायतीला तब्बल 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदारांनी केली. परभणी जिल्ह्यात तर अक्षरशः चढाओढ लागली होती. 4 विधानसभापैकी 3 विधानसभा मतदार संघातील आमदारांनी प्रत्येकी 25 लाखांचा निधी देण्याचं जाहीर केलं. या अनुषंगाने परभणीत 9, जिंतुर 21 आणि गंगाखेडमध्ये 25 ग्रामपंचायत बिनविरोध आल्या आहेत. आता या एकुण 55 ग्रामपंचायतींना प्रत्येकी 25 लाखांचा निधी कसा द्यायचा आणि आपल्या मतदार संघात किती निधी वापरायचा हे आव्हान परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील, जिंतुरच्या आमदार मेघना बोर्डीकर आणि गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या समोर असणार आहे.
पारनेरमधील जवळपास 30 ग्रामपंचायती बिनविरोध
अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी केलेल्या एका भन्नाट आवाहनाला मोठे यश मिळताना दिसत आहे. कारण पारनेर तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींनी बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात गावागावात वाद-विवाद, भांडण होऊ नये यासाठी आमदार निलेश लंके यांनी नामी शक्कल लढवली. "ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि गावच्या विकासासाठी 25 लाख रुपये घेऊन जा" असे लंके यांनी आवाहन केले. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पारनेर तालुक्यातील जवळपास 30 गावातील ग्रामपंचायतने बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु, कोविड-19 ची परिस्थिती उद्भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
संबंधित बातमी :
Gram Panchayat Elections 2021 | ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा! राज्यात अनेक गावांचा इतिहास मोडीत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement