एक्स्प्लोर

Gram Panchayat Elections 2021 | ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा! राज्यात अनेक गावांचा इतिहास मोडीत

सध्या गावागावांत ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडत आहे. यंदाची निवडणूक अनेक दृष्टीने वेगळी ठरणार आहे.

मुंबई : कोरोना महामारीमुळे लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या अन् गावागावात निवडणुकांचा धुरळा उडू लागला आहे. लॉकडाऊनमुळे निपचित पडलेल्या खेड्यापाड्यात आता जल्लोष दिसत आहे. यंदाची निवडणूक अनेक दृष्टीने महत्वाची आहे. कारण, लोकप्रतिनिधींच्या आवाहनानंतर अनेक गावांमध्ये वाद-विवाद विसरून गावाच्या विकासासाठी विरोधक एकत्र आले. तर अनेक वर्षांपासून बिनविरोध होणाऱ्या गावांमध्ये निवडणूक लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यातील अशाच काही ग्रामपंचायतींचा आढावा.

मळेगावचा 45 वर्षांचा इतिहास मोडीत

तब्बल 45 वर्षे बिनविरोध असलेल्या बार्शी तालुक्यातील मळेगाव येथे यंदा मात्र निवडणुका लागल्या आहेत. शेवटच्या दिवशी देखील अर्ज माघारी न घेतल्याने सर्व तिन्ही प्रभागासाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. तिन्ही प्रभागातून 9 उमेदवार ग्रामस्थांना निवडून द्यायचे आहेत. ज्यासाठी 22 उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. बार्शी तालुक्यातील मळेगावमध्ये तब्बल 9 निवडणुका बिनविरोध करून सलग 50 वर्षे बिनविरोध राहण्याचा प्रयत्न यंदाच्या निवडणुकात होता. मात्र, अर्ज कायम राहिल्याने बिनविरोध अर्धशतक होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.

उमरगा तालुक्यात सर्वाधिक 10 ग्रामपंचायत बिनविरोध उस्मानाबाद जिल्ह्यातील 428 पैकी 40 ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली असून यात सर्वाधिक 10 ग्रामपंचायत उमरगा तालुक्यातील आहेत तर कळंब, परंडा, लोहारा या तालुक्यात प्रत्येकी 5, उस्मानाबाद तालुका 3, तुळजापूर 4, भूम तालुका 7 व वाशी तालुक्यातील 1 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सचिन गिरी यांनी दिली.

उमरगा तालुक्यात सर्वाधिक 10 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून त्यात भिकार सांगवी, मुळज, जकेकुर, जकेकुरवाडी, चिंचकोटा, बाबळसुर, कोळसुर गु, एकोंडी, पळसगाव व मातोळा या गावांचा समावेश आहे. लोहारा तालुक्यात 5 बिनविरोध ग्रामपंचायत असून त्यात आरणी, मार्डी, राजेगाव, तावशिगड व धानुरी हे आहेत. भूम तालुक्यातील 7 बिनविरोध ग्रामपंचायत असून त्यात उमाचीवाडी, बेदरवाडी, नान्नजवाडी, सोन्नेवाडी, वरुड, बागलवाडी व गोलेगाव यांचा समावेश आहे. वाकडी, परंडा तालुक्यातील देवगाव, खंडेश्वरवाडी, कपिलापुरी, उंडेगाव व भोंजा या 5 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत तर कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा, आडसुळवाडी, लासरा व दुधाळवाडी या 5 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.

वाशी तालुक्यात एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध

उस्मानाबाद तालुक्यातील धुत्ता, डकवाडी व पोहनेर या 3 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत तर तुळजापूर तालुक्यातील बारुळ, वानेगाव, अमृतवाडी व पिंपळा खुर्द ही गावे बिनविरोध झाली आहेत. वाशी तालुक्यातील एकमेव सारोळा ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 428 ग्रामपंचायतसाठी निवडणूक होत असून त्यापैकी 40 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे 388 ग्रामपंचायतमध्ये निवडणूक प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीत 3 लाख 13 हजार 326 स्त्री, 3 लाख 60 हजार 659 पुरुष व 5 इतर असे 6 लाख 73 हजार 990 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. नांदेड जिल्ह्यात 1309 ग्रामपंचायतीसाठी अनेक गावात गटातटामुळे चूरस निर्माण झाली आहे. मात्र, काही ठिकाणी प्रशासन आणि गावकऱ्यांनी घेतलेल्या पुढाकाराने 103 ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. तर उर्वरित 910 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासन निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहेत.

नांदेड जिल्ह्यात 103 ग्रामपंचायत बिनविरोध नांदेड जिल्ह्यात एकूण 1309 ग्रामपंचायती पैकी- 103 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. 1)भोकर-63-बिनविरोध 12 2)मुदखेड-45-बिनविरोध 5 3)लोहा-84-बिनविरोध 5 4)कंधार-98-बिनविरोध 15 5)मुखेड-108 बिनविरोध 6 6)देगलूर-90 बिनविरोध 5 7)माहूर-34 बिनविरोध 1 8)किनवट-134 9)नायगाव-68-बिनविरोध 3 10)अर्धापुर -43 बिनविरोध-6 11)उमरी-58 -बिनविरोध 9 12)धर्माबाद -45 बिनविरोध 3 13)बिलोली -64 बिनविरोध 4 14)हदगाव -108 बिनविरोध 13 15)नांदेड-85-बिनविरोध 5 16)हिमायतनगर-52 बिनविरोध 2

अंबरनाथ तालुक्यात 27 ग्रामपंचायतींपैकी गोरेगाव ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध. विविध ग्रामपंचायतीतील 68 उमेदवार बिनविरोध अंबरनाथ तालुक्यातील मधील 26 ग्रामपंचायतीतील 173 जागांवर निवडणूका होणार आहे. कल्याण तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीपैकी वरप ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध. विविध ग्रामपंचायती मधील 44 उमेदवार बिनविरोध. तर 20 ग्रामपंचायतीमधील 167 जागांवर निवडणुका होणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यात 980 ग्रामपंचायतमध्ये निवडणूक होत आहे. यात छाननी नंतर 20535 उमेदवार यांचे नामनिर्देशन वैध ठरले तर 388 नाम निर्देशन अवैध ठरले आहेत. एकूण 3073 प्रभागमध्ये निवडणूक होत आहे. 8141 सदस्य निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जाणार आहेत. अजूनही किती लोकांनी माघार घेतली आणि किती ठिकाणी बिनविरोध निवडणूक होत आहे हा आकडा अद्याप निवडणूक विभागाला मिळाला नाही. अद्यावत माहिती सायंकाळी होईल असे निवडणूक विभागाच्या वतीने सांगितले.

जालना जिल्ह्यात एकूण 475 ग्रामपंचायती पैकी, एकूण 42 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

वर्धा जिल्ह्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध नाही वर्धा जिल्ह्यात 50 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. 173 प्रभाग असून 472 सदस्यांकरीता निवडणुक होत आहे. तर 22 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. 1279 उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोणतीही ग्रामपंचायत बिनविरोध नाही. फक्त एका जागेवर एक नामांकन असलेले सदस्य बिनविरोध निवडून आले आहे.

वाशिम जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायत निवडणुकीपैकी एकूण 10 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. त्यापैकी वाशिम तालुक्यात सर्वाधिक 5 ग्रामपंचायत तर मालेगावच्या 2 कारंजा मधील 1 रिसोड 1 मानोरा मधील 1 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहे तर मंगरूळपीर मधून एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही.

  • चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 629 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून यापैकी 20 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवड झाली आहे. तर एकूण 5159 ग्रामपंचायत सदस्यांपैकी 877 हे बिनविरोध निवडून आले आहेत.

नाशिक जिल्ह्यात 621 ग्रामपंचायत

1) मालेगाव तालुक्यातील 99 ग्रामपंचायत पैकी 3 ग्रामपंचायत बिनविरोध. तर 96 ग्रामपंचायतसाठी 1,684 उमेदवार रिंगणात. 2) बागलाण (सटाणा) 40 ग्रामपंचायत पैकी 9 ग्रामपंचायत बिनविरोध 31 ग्रामपंचायतसाठी 540 उमेदवार रिंगणात. 3)देवळा : 11 ग्रामपंचायत पैकी 119 जागांसाठी 61 जागा बिनविरोध, 58 जागांसाठी 128 उमेदवार रिंगणात. 2 कोटींची बोली लागलेल्या उमराने ग्रामपंचायतीच्या 17 पैकी 15 जागा बिनविरोध, 2 जागासाठी निवडणूक होणार. 4)नांदगाव - 59 ग्रामपंचायत पैकी 3 ग्रामपंचायत बिनविरोध, 54 ग्रामपंचायती साठी 967 उमेदवार रिंगणात. 5)येवला - 69 ग्रामपंचायत पैकी 8 ग्रामपंचायत बिनविरोध, 61 ग्रामपंचायती साठी उमेदवार रिंगणात 6)कळवण - 29 ग्रामपंचायत पैकी 2 बिनविरोध, 27 ग्रामपंचायती साठी 159 उमेदवार रिंगणात

अहमदनगर जिल्ह्यात एकूण 767 ग्रामपंचायत आहेत. त्यापैकी 28 ग्रामपंचायत या पूर्णतः बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक जामखेड तालुक्यात 10 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यात. पारनेर - 9 राहता - 6 कर्जत - 2 श्रीरामपूर - 1 संगमनेर 4 अकोले 11 कोपरगाव 0 नेवासा 6 बिनविरोध ग्रामपंचायत.

  • सांगली जिल्ह्यात एकूण 152 ग्रामपंचायतीची निवडणूक लागली असून त्यातील 10 ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.

अकोला जिल्ह्यात पाच ग्रामपंचायती बिनविरोध अकोला जिल्ह्यात एकूण 224 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यापैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये बार्शी टाकळी तालुक्यातील परंडा, तेल्हारा तालुक्यातील खेल सटवाजी, चांगलवाडी आणि मुर्तिजापूर तालूक्यातील मोहखेड आणि सोनोरी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन ग्रामपंचायती बिनविरोध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. कणकवली तालुक्यातील गांधीनगर तर वैभववाडी तालुक्यातील मांगवली या दोन ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. जिल्ह्यात 70 ग्रामपंचायतीत एकूण 600 सदस्य संख्येसाठी 1550 नामनिर्देशन प्राप्त झाले असून 1094 उमेदवार ग्रामपंचायत निवडणूक लढवत आहेत.

  • धुळे जिल्ह्यातील 218 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून यासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर 4 जानेवारीला माघारीचा दिवस होता. माघारीनंतर जिल्ह्यातील 35 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून जिल्ह्यातून आता 183 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होणार आहे.

धुळे तालुक्यात 5 ग्रामपंचायत बिनविरोध धुळे तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीपैकी आमदड, चिंचवार, दापुरा,बोरविहीर,सांजोरी या 5 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून 67 ग्रामपंचायतीच्या निवडणूक होणार आहेत. साक्री तालुक्यातील 49 ग्रामपंचायत पैकी सबगव्हाण, मालणगांव, उमराडी, जामदे, सतमाने, छावडी, वर्धाणे, वाजदरे, दारखेल या 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 40 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.

शिंदखेडा तालुक्यात 15 ग्रामपंचायती बिनविरोध तर शिंदखेडा तालुक्यातील 63 ग्रामपंचायती पैकी अलाणे, हिसपुर, झोतवाडे, कुंभारे, धांदरणे, सोनसैलू, निशाणे, दिवी, चौगांव बु, दसवेल, टेमलाय, महाळपुर, कामपुर, हुंबर्डे-वडली या 15 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 48 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून शिरपूर तालुक्यातील 34 ग्रामपंचायतपैकी घोडसगाव, वाठोडे, असली तांडे, पिंपळे तांडा, भावेर, हिंगोणी पाडा या 6 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने 28 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे. अशा जिल्ह्यातील 35 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने 218 पैकी 183 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत.

  • नंदुरबार जिल्ह्यात 87 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. त्यापैकी 22 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 65 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे.

भिवंडीतील केवळ 3 ग्रामपंतायती बिनविरोध भिवंडीतील 56 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने तब्बल 107 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून तालुक्यातील वळ, निवळी व आलिंगर या तीन ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे तालुक्यात आता 53 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून या 53 ग्रामपंचायतींमधील 12 ग्रामपंचायतींमधील 19 सदस्यांच्या बिनविरोध निवड झाली आहे.

  • बुलढाणा जिल्ह्यात 527 ग्रामपंचायती च्या निवडणुका होऊ घातल्या आहे, त्यापैकी सध्या 8 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात तर तीन तालुक्याची माहिती अद्याप बाकी आहे.
  • हिंगोली जिल्ह्यात एकुण 495 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे. ज्यात 74 ग्राम पंचायत बिनविरोध झाल्या आहेत. 421 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे.
  • परभणी जिल्ह्यात एकुण 566 ग्राम पंचायतीसाठी निवडणूक होत आहे. त्यातील परभणी, सेलू आणि जिंतूर तालुक्यातील 41 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 6 तालुक्यांची आकडेवारी यायची आहे.

संबंधित बातमी : 

Grampanchayat Election | राळेगणसिद्धी, हिवरेबाजारमध्ये बऱ्याच वर्षांनंतर निवडणुका, बिनविरोध करण्यात अपयश

Maharashtra Gram Panchayat | हिवरे बाजार गावातील बिनविरोधी निवडणुकीचा परंपरा खंडीत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget