एक्स्प्लोर

Gram Panchayat Election 2022 : गावकारभारी होण्यासाठी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला, अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती, प्रचार शिगेला  

राज्यातील एकूण  7 हजार 682 ग्रामपंचायतींमध्ये (Gram Panchayat) निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. 18 डिसेंबरला ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे.

Maharashtra Gram Panchayat Election 2022 : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची (Gram Panchayat Election 2022) रणधुमाळी सुरु आहे. अवघ्या दोन दिवसांवरच ही निवडणूक येऊन ठेपली आहे. ठिकठिकाणी उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत. दरम्यान, राज्यातील एकूण  7 हजार 682 ग्रामपंचायतींमध्ये (Gram Panchayat) निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. 18 डिसेंबरला ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून, 20 डिसेंबरला गावचा कारभारी कोण हे ठरणार आहे.

उस्मानाबद जिल्ह्यात 257 ग्रामपंचायतींचा धुरळा उडणार

उस्मानाबद  जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींची निवडणूक अवघ्या काही तासांवर आली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सध्या मेड इन चायना ईव्हीएम मशीन दाखल झाल्या आहेत. होतकरू उमेदवार ईव्हीएम मशीन  विकत घेऊन गावात जाऊन सरपंच पदासाठी कोणाला निवडून द्यायचं, वॉर्डातल्या कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं हे दाखवत आहेत. यासोबतच या वेळेस सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून असल्यामुळं कमालीची चुरस वाढली आहे. तसेच व्हाट्सअप स्टेटस ठेवून उमेदवार आपला प्रचार करत आहेत. वेगवेगळे साहित्यसुद्धा बाजारात आले आहे. 

बीडच्या राजुरीमध्ये क्षीरसागर काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला

बीडच्या क्षीरसागर कुटुंबाचे मूळ गाव असलेल्या नवगण राजुरीमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. राजुरी ग्रामपंचायतसाठी 18 तारखेला मतदान होणार आहे. एकूण 13 सदस्य आणि एक सरपंच अशा 14 जागेसाठी ही थेट लढत होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गटाच्या समोर माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचे आव्हान असणार आहे. या ग्रामपंचायतीवर सध्या आमदार संदीप क्षीरसागर गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळं या निवडणुकीमध्ये राजुरी ग्रामपंचायत संदीप क्षीरसागर गटाच्या ताब्यात राहते की जयदत्त क्षीरसागर गट आपल्या ताब्यात घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

परदेशातील उच्च शिक्षण सोडून तरुणी उतरली सरपंचपदाच्या निवडणुकीत

गावच्या विकासासाठी परदेशातील उच्च शिक्षण सोडून एक तरुणी थेट ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखड्यात उतरली आहे. यशोधरा राजे शिंदे असे या अवघ्या 21 वर्षीय तरुणीचे नाव आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या वड्डी इथे सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये सध्या ती आपले नशीब आजमावत आहे. सरपंच पदाची निवडणूक लढवणारी यशोधरा राजे शिंदे ही सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 21 वय असणारी यशोधरा ही एक उच्चशिक्षित तरुणी असून गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये उतरण्यासाठी ती थेट परदेशातून आपल्या शिक्षण अर्ध्यावर सोडून परतली आहे. यशोधरा राजे शिंदे ही जॉर्जिया या ठिकाणी न्यू विजन युनिव्हर्सिटी मध्ये एमबीबीएस चौथ्या वर्षाचे शिक्षण सुरू आहे. मात्र यशोधरा ही शिक्षण सोडून थेट गावाच्या विकासासाठी राजकारणात उतरली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या निमित्ताने सरपंच पदासाठी यशोधरा राजे हिने उमेदवारी दाखल करत प्रचार सुरू केला आहे. 

माळशिरसमधील वेळापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तृतीयपंथी

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वेळापूर ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. इथे राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांची सत्ता आहे. याच ग्रामपंचायतीमधून सरपंचपदासाठी जनतेचा उमेदवार म्हणून तृतियपंथीय माया उर्फ सदाशिव रामचंद्र अडसूळ या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने रंगतदार प्रचार सुरु आहे. माया यांनी आपला जाहीरनामा 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करुन जनतेत मते मागत आहेत. तर या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी काट्याची टक्कर सुरु असताना मायाच्या उमेदवारीने वेळापूर सरपंचपदासाठी चुरस वाढल्याचे चित्र आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 293 ग्रामपंचायतीत मतदान होणार

सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची मतदान यंत्रांची प्राथमिक स्तरावरील तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. मतदानासाठी यंत्रे सीलबंद झाली आहेत. जिल्ह्यात 325 ग्रामपंचायतीपैकी 293 ग्रामपंचायतीसाठी 933 केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यासाठीच्या मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण झाली आहे. प्रत्येक तहसिलदार कार्यालयात ही तपासणी करण्यात आली आहे.

मंत्री शंभूराज देसाईंची सीमाभागातील शेनोळी गावात सभा

उत्पादन शुल्क मंत्री शभूराज देसाई आज सीमाभागातील शेनोळी गावचा दौरा करणार आहेत. कोल्हापुरातून गडहिंग्लज आणि त्यानंतर ते शेनोळी गावात जाणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने शंभूराज देसाई दुपारी तीन वाजता शेनोळी गावात सभा घेणार आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक वादाच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाईंच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. 

अमरावती जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींची निवडणूक

अमरावती जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींची निवडणूक 18 डिसेंबरला होणार असून सरपंचपदासाठी 1 हजार 279 तर सदस्य पदासाठी 4 हजार 796 उमेदवार रिंगणात आहेत. जाहीर प्रचार करताना वैयक्तिक भेटींवर उमेदवार भर देताना दिसत आहेत. निवडणूक (Election) असलेल्या गावांमध्ये रोजच्या जेवणावळी उठत आहेत. सोबतच उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून आकडेमोड केली जात आहे. तळीरामांसाठी देखील रोजच्या रोज 'व्यवस्था' केली जात आहे. त्यासाठी सायंकाळी कामावरून आलेले लोक थेट 'बैठकीकडे' धाव घेताना दिसतात. 

नागपूर जिल्ह्यात 236 सरपंच पदांसाठी 761 उमेदवार

राज्यात सात हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका (Gram Panchayat Election)पार पडत आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 236 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक होत असून त्यासाठी 761 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात आहे. तर याच 236 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 2054 सदस्य पदासाठी एकूण 4891 उमेदवार रिंगणात आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Nashik Gram panchayat : दोन दिवसांवर ग्रामपंचायत निवडणूक, नाशिकमध्ये अशा आहेत चुरशीच्या लढती 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनातNashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग  रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्जBachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहितीVinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget