एक्स्प्लोर

ग्रामपंचायत निवडणुकीत कुणाची सरशी, काय आहेत पक्षनिहाय दावे? पहा जिल्हानिहाय आकडेवारी

राज्यात आज 12 हजारहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकांत सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा करण्यात येत आहे.

मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा करण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर पत्रकार परीषद घेऊन आम्हीच सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा केला आहे. तर शिवसेनेकडूनही असाच दावा करण्यात येत आहे. हीच आकडेवारी आपण जिल्हानिहाय पाहणार आहोत.

सोलापूर जिल्हा निकाल पक्षीय बलाबल भाजप - 193 काँग्रेस - 50 राष्ट्रवादी - 166 शिवसेना - 86 शेकाप - 34 रासप - 1 आरपीआय - 2 राष्ट्रवादी-भाजप आघाडी - 2 त्रिशंकू - 1 महाविकास आघाडी - 25 अवताडे गट - 12 स्थानिक आघडी - 82

उस्मानाबाद भाजपा 140 राष्ट्रवादी 53 काँग्रेस- 64 सेना- 107 स्थानिक आघाडी 100

नागपूर काँग्रेस - 61 भाजप - 38 महाविकास आघाडी - 07 राष्ट्रवादी -17 शिव सेना - 04 वंचित - 1 लोकल पॅनल - 1 पेंडिंग - 1

औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यात 617 ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी झाली. या 617 ग्रामपंचायतींपैकी शिवसेनेने 432 ग्रामपंचायतीवर विजयाचा दावा केला आहे, यामध्ये स्वबळावर 360 तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून 72 ठिकाणी विजय मिळवल्याचा दावा शिवसेना जिल्हाध्यक्ष आणि आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे, तर 208 जागांवर विजय मिळाल्याचा दावा भाजपने केलाय. जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी ही माहिती दिलीये. आयआयएमने सुद्धा 65 सदस्य निवडून आल्याचा दावा करीत 3 ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवलं असल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलंय, तर 190 जागांवर विजय मिळवल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कैलास पाटील चिकटगावकर यांनी केलाय, तर काँग्रेसने स्वबळावर 325 ग्रामपंचायतीवर निशाण फडकवल्याचा दावा केलाय, जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांनी ही माहिती दिली आहे. 35 ग्रामपंचायती या आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत...

नांदेड : जिल्ह्यातील 1309 पैकी एकूण 1013 ग्रामपंचायतचे निकाल

काँग्रेस: 310 राष्ट्रवादी : 62 शिवसेना:195 भाजप:220 स्थानिक आघाडी: 226, यातही काँग्रेसचा वरचष्मा असेल, पण सरपंच निवडताना चित्र स्पष्ट होईल. तर नांदेड जिल्ह्यातील दोन गावातील निवडणुका रद्द झालेल्या आहेत.

धुळे : राष्ट्रवादी : 3 काँग्रेस: 61 स्थानिक आघाडी : 30 शिवसेना 9 भाजप :106 स्थानिक विकास आघाडी 9

सिंधुदुर्ग फायनल आकडेवारी एकूण ग्रामपंचायत - 70 बिनविरोध - 04 निवडणूक झाली - 66 काँग्रेस - 00 राष्ट्रवादी  -  01 शिवसेना  -  21 भाजप - 45 मनसे - 00 गाव पॅनल - 03

अहमदनगर भाजप 185 शिवसेना 125 राष्ट्रवादी 277 स्थानिक आघाडी 33 काँग्रेस 147 एकूण 767

नगर उत्तर राहाता - भाजप नेते राधाकृष्ण विखे यांचा मतदारसंघ. एकुण जागा 25 भाजप 24, स्थानिक आघाडी 01 संगमनेर - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ. एकुण 94 कॉग्रेस - 84, भाजप - 10 अकोले ‌- राष्ट्रवादी आमदार किरण लहामटे यांचा मतदारसंघ तर भाजप नेते मधूकर पिचड यांचा तालुका. एकुण 52, भाजप 32, राष्ट्रवादी 12, शिवसेना - 08 राहुरी ‌- राष्ट्रवादी नेते व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा मतदारसंघ एकुण 44 राष्ट्रवादी - 35, भाजप 09 नेवासा - शिवसेना नेते जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा मतदारसंघ एकुण 59, शिवसेना - 52, भाजप - 4, राष्ट्रवादी - 3

कोपरगाव - राष्ट्रवादी आमदार आशुतोष काळे यांचा मतदारसंघ तर भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा तालुका. एकुण 29 भाजप 19, काँग्रेस - 1, राष्ट्रवादी 09 श्रीरामपूर तालुक्यात संमिश्र जागा निवडुन आल्या असून त्याची निश्चित पक्ष निहाय आकडेवारी अद्याप उपलब्ध नाही.

रायगड रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीतील निकाल महाविकास आघाडी 10 भाजप 11 स्थानिक ग्रामविकास आघाडी 1

गोंदिया जिल्हयात 189 पैकी 181 ग्रामपंचायतसाठी मतमोजणी झाली आहे. 7 ठिकाणी बिनविरोध निवडून आले तर 1 ठिकाणी निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात आला आहे. (भारणोली ग्रामपंचायत) भाजपा :- 68 राष्ट्रवादी कॉग्रेस :- 56 भारतीय कॉग्रेस :- 29 महाविकास आघाडी :- 11 अपक्ष जागा 10 गोंदिया अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचा चाबी प्यानल :- 14 जागा एकूण 188 ग्रामपंचायत. जिल्ह्यातील स्थिती पाहता महाविकास आघाडीला 96 जागा मिळाल्या असे म्हटले तरी चालेल. गोरेगाव तालुका 25 पैकी भाजप 12, राष्ट्रवादी काँग्रेस 8, भारतीय काँग्रेस 5, सालेकसा तालुका 9 पैकी भाजप 5 जागा तर महाविकास आघाडीला 4 जागा आमगाव तालुका 22 जागा पैकी भारतीय काँग्रेस 6, राष्ट्रवादी काँग्रेस 9, भाजप 7 जागा. तिरोडा तालुका 19 पैकी भारतीय काँग्रेस 4, राष्ट्रवादी काँग्रेस 7, भाजप 6 जागा, अपक्ष 4 जागा सडक अर्जुनी तालुका 19 पैकी भाजप 7, राष्ट्रवादी काँग्रेस 6, भारतीय काँग्रेस 1 जागा, महाविकास आघाडी 5 जागा अर्जुनी मोरगाव तालुका 29 पैकी भाजप 8, राष्ट्रवादी काँग्रेस 13, काँग्रेस 4, अपक्ष 3 जागा 1 जागी बहिष्कार. देवरी तालुका तालुका 29 पैकी भाजप 10, राष्ट्रवादी काँग्रेस 9, भारतीय काँग्रेस 8, महाविकास आघाडी 2 जागा. गोंदिया तालुका 37 पैकी भाजप 14, राष्ट्रवादी काँग्रेस 5, भारतीय काँग्रेस 1, अपक्ष 3 आणि अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचा स्वतंत्र चाबी प्यानलला 14 जागा मिळाल्या.

हिंगोली जिल्हा एकुण 495 ग्रामपंचायत यातील 73 बिनविरोध झाल्या होत्या काँग्रेस - 17 राष्ट्रवादी 136 शिवसेना 150 भाजप 67 वंचित 1 स्थानिक आघडया 51 बिनविरोध- 73

बीड जिल्ह्यात सोमवारी 111 ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास 63 हुन अधिक ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. उर्वरित 48 ग्रामपंचायतीमध्ये भाजप - शिवसेना तसेच अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. भाजपला बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मात्र चांगले यश मिळाले आहे. यामध्ये आष्टी तालुक्यातील अकरापैकी 10 ग्रामपंचायतीवर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दावा केला आहे. या उलट बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात दोन ग्रामपंचायतींची मतमोजणी होती. या दोन्ही ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला दावा केला असून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या वडवणीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी 21 तर राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर गटाकडून 15 ग्रामपंचायतीवर दावा करण्यात आला आहे. बीड तालुक्यात सोमवारी 24 ग्रामपंचायतींची मतदान मोजणी झाली.

परळीत राष्ट्रवादी काँग्रेसची चलती मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत एकूण 7 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी झाली. यामध्ये 6 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच धनंजय मुंडे गटाने दावा केला आहे तर केवळ एका ग्रामपंचायतीवर भाजपला यश मिळाले आहे.

गेवराई तालुक्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर गेवराई तालुक्यातील एकूण 21 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी झाली. यापैकी 13 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. तर भाजपने पाच ग्रामपंचायतीवर दावा केला असून गेवराई तालुक्यात शिवसेनेने देखील चार जागांवर दावा केला आहे.

बुलडाणा जिल्हा एकूण ग्रामपंचायत 498 पैकी 28 बिनविरोध आणि 1 अर्ज न भरलेली असे एकूण 527 ग्रामपंचायत निकाल जाहीर. काँग्रेस 147 राष्ट्रवादी 77 शिवसेना 129 भाजप 146 मनसे 2 स्थानिक आघाडी 25 निवडणूक झाली नाही 1 एकूण 527 ग्रामपंचायत निकाल.

जालना जिल्हा एकूण जागा 446 निकाल जाहीर 446 शिवसेना 114 भाजप 90 राष्ट्रवादी 165 काँग्रेस 31 स्थानिक आघाडी 46

तालुका - पोंभुर्णा - सुधीर मुनगंटीवार यांचा मतदारसंघ एकूण 26 भाजप - 12, काँग्रेस - 8, गोंडवाना गणतंत्र पार्टी - 2, सेना - 2, राष्ट्रवादी - 0, स्थानिक आघाडी - 2

तालुका - बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार यांचा मतदारसंघ एकूण 9 भाजप - 6, बहुजन वंचित आघाडी - 1, अपक्ष - 2

तालुका - मूल - सुधीर मुनगंटीवार यांचा मतदारसंघ एकूण 35 भाजप - 13, काँग्रेस - 14, बहुजन वंचित आघाडी - 1, सेना - 2, आप - 1, स्थानिक आघाडी - 4

तालुका - वरोरा, काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांचा मतदारसंघ एकूण 73 भाजप - 5, काँग्रेस - 38, सेना - 13, राष्ट्रवादी - 3, इतर - 14

तालुका - भद्रावती, काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांचा मतदारसंघ एकूण 53 भाजप - 20, काँग्रेस - 20, सेना - 4, राष्ट्रवादी - 1 , स्थानिक आघाडी - 8

तालुका - गोंडपिंपरी, काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांचा मतदारसंघ एकूण 42 भाजप - 21, काँग्रेस - 18, सेना - 0, राष्ट्रवादी - 2, शेतकरी संघटना - 1 स्थानिक आघाडी - 00

तालुका - कोरपना, काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांचा मतदारसंघ एकूण 16 भाजप - 3, काँग्रेस - 7, शेतकरी संघटना - 6, सेना - 0, राष्ट्रवादी - 0, अपक्ष - 0

तालुका - जिवती, काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांचा मतदारसंघ एकूण 1 भाजप - 1, काँग्रेस - 0, शेतकरी संघटना - 0, सेना - 0, राष्ट्रवादी - 0, अपक्ष - 0

तालुका - राजुरा, काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांचा मतदारसंघ एकूण 27 भाजप - 11, काँग्रेस - 13, शेतकरी संघटना - 3, सेना - 0, राष्ट्रवादी - 0, अपक्ष - 0

तालुका - सावली, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ एकूण 50 भाजप - 23, काँग्रेस - 20, सेना - 0, राष्ट्रवादी - 0, इतर - 7

तालुका - सिंदेवाही, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ एकूण 45 भाजप - 11, काँग्रेस - 29, सेना -0, राष्ट्रवादी - 0, अपक्ष - 5

तालुका - ब्रम्हपुरी, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ एकूण 68 भाजप - 35, काँग्रेस - 31, सेना - 0, राष्ट्रवादी - 0, इतर - 2

तालुका - चिमूर - भाजप आमदार बंटी भांगडिया यांचा मतदारसंघ एकूण 80 भाजप - 22, काँग्रेस - 30, मनसे - 1, राष्ट्रवादी - 5, स्थानिक आघाडी - 22 तालुका - नागभीड - भाजप आमदार बंटी भांगडिया यांचा मतदारसंघ एकूण 41 भाजप - 21, काँग्रेस - 18, सेना - 0, राष्ट्रवादी - 0, स्थानिक आघाडी - 2

तालुका - चंद्रपूर, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा मतदारसंघ एकूण 38 भाजप - 22, काँग्रेस - 13, सेना - 0, राष्ट्रवादी - 0, स्थानिक आघाडी - 3

भाजप 226

काँग्रेस 259

शेतकरी संघटना 9

राष्ट्रवादी काँग्रेस 11 सेने - 21

मनसे 1 आप 1 बहुजन वंचित आघाडी 2 अपक्ष 74

विदर्भातील ग्रामपंचायत निकाल चंद्रपूर : एकूण 604/भाजपा : 344 गोंदिया : एकूण 181/भाजपा : 106 भंडारा जिल्हा : एकूण : 145/भाजपा: 91 वर्धा जिल्हा : एकूण : 50/भाजपा : 29 नागपूर जिल्हा : एकूण 127/ भाजपा : 73 वाशीम जिल्हा : एकूण 152/भाजपा : 83 अकोला जिल्हा : एकूण 214/भाजपा : 123 बुलढाणा जिल्हा : एकूण 498/भाजपा : 249 अमरावती जिल्हा : एकूण 537/भाजपा : 113 यवतमाळ जिल्हा : एकूण 925/भाजपा 419

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर, अपवाद वगळता शांततेत मतमोजणी, गावगाड्यात गुलालाची उधळण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget