Maharashtra Govt Recruitment : नोकरभरतीची जाहिरात जानेवारी महिन्यात प्रसिद्ध न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करु, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा इशारा
Maharashtra Mega Recruitment : जानेवारी महिन्यात जर 75 हजार पदांची नोकरभरती प्रक्रिया सुरु झाली नाही, जाहिरात प्रसिद्ध झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करु, असा इशारा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दिला आहे.
Maharashtra Mega Recruitment : राज्यात 75 हजार पदांच्या नोकर भरतीची (Maharashtra Govt Recruitment) घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात कुठल्याच भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे 75 हजार पदांची भरती म्हणजे नुसते गाजर असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षांची (Competitive Exam) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे. जानेवारी महिन्यात जर भरती प्रक्रिया सुरु झाली नाही, जाहिरात प्रसिद्ध झाली नाही, संबंधित प्रक्रिया वेगाने सुरु झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन (Statewide Agitation) करु, असा इशारा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दिला आहे.
स्पर्धा परीक्षार्थींनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पोलीस शिपाई भरती सोडल्यास वर्ग तीन आणि वर्ग चार पदांच्या भरतीच्या कोणत्याच मोठ्या जाहिराती आलेल्या नाहीत. महाराष्ट्रात एकूण रिक्त पदांची संख्या लाखांच्या जवळपास आहे. 75 हजार पदभरतीची घोषणा करुन तीन ते चार महिने उलटून गेले. मात्र प्रत्यक्षात जाहिरात प्रसिद्ध होत नाही. या विरोधात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ट्विटरवर सुद्धा आपल्या मागण्यांसाठी मोहीम सुरु केली आहे.
हक्कासाठी, भविष्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार : स्पर्धा परीक्षा समन्वय समिती
चार वर्षांपासून महाराष्ट्रात सरळ सेवा भरती होत नाही. गेल्या वेळी फडणवीस सरकार होतं तेव्हा देखील आम्हाला 72 हजार जागांचं गाजर दाखवलं. आता 75 हजार जागांचं गाजर आम्हाला दाखवत आहेत. महाराष्ट्रात एकतर सरळसेवा भरती होत नाही आणि थोड्या प्रमाणात झाली तर ती पारदर्शक होत नाही नुसते घोटाळे होत आहे. हे सरकार विद्यार्थ्यांच्या संयमाशी खेळत आहेत. काल आम्ही ट्विटर वॉर केलं. आता आम्ही सरकारला इशारा देत आहोत की, लवकरात लवकर जर तुम्ही भरती सुरु केली नाही तर आम्ही राज्यभर आंदोलन करु. त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय दिसत नाही. अभ्यास न करता आता आम्हाला आमच्या हक्कासाठी, भविष्यासाठी रस्त्यावर उतरावं लागणार आहे. आमची सरकारला कळकळीची विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर सरळ सेवा भरती सुरु करा. तुम्ही दिलेलं 75 हजार पदांच्या नोकरभरतीचं आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करा, असं स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर म्हणाले.
सरकारकडून 75 हजार नोकर भरतीची घोषणा
देशाच्या स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार नोकर भरती केली जाणार असल्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात केली होती. राज्यात पहिल्यांदाच सर्वात मोठ्या 75 हजार जागांसाठी ही नोकर भरती होणार आहे. 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले. त्यानंतर राज्यातील 75 हजार पदांची नोकरभरती प्रक्रिया 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. ज्या जिल्ह्यात टीसीएस आणि आयबीपीएस कंपनींचे सेंटर नाहीत त्याठिकाणी पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअर कॉलेजची मदत घेतली जाणार आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली लवकरच समिती गठित केली जाणार आहे
संबंधित बातमी
Maharashtra News: राज्यातील 75 हजार पदांची नोकरभरती 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण होणार, परीक्षा सुरळीत होण्यासाठी समिती स्थापन होणार
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI