एक्स्प्लोर

Shakti Act : महिला अत्याचारांविरोधात 'शक्ती', आंध्रच्या 'दिशा' च्या धर्तीवर महाराष्ट्राचा 'शक्ती कायदा'

राज्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमिवर आंध्रप्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात 'शक्ती कायदा' येणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला व बाल अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी शक्ती कायद्याचा मसुदा मंजूर होण्याची शक्यता आहे.

मुंबई : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात 'शक्ती कायदा' येणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला व बाल अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी शक्ती कायद्याचा मसुदा मंजूर होण्याची शक्यता आहे. महिला अत्याचार प्रकरणात 21 दिवसात निकाल लागावा तसेच महिला व बाल अत्याचारांच्या घटनांमधील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा कायदा असणार आहे. आज कॅबिनेटमध्ये शक्ती कायद्याचा मसुदा मंजुरीसाठी येण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सरकार कायदा आणण्याच्या तयारीत आहे.

शक्ती कायद्यातील मुख्य तरतूदी

  • बलात्कार प्रकरणी अजामीनपात्र गुन्हा Rarest of rare प्रकरणात फाशी शिक्षा तरतूद, अथवा जन्मठेप आणि दंड
  • ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची तरतूद
  • अतिशय क्रूर महिला अत्याचार गुन्ह्याप्रकरणी मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद
  • वय वर्ष 16 पेक्षा कमी असलेल्या मुलींवर अत्याचार झाल्यास मरेपर्यंत जन्मठेप
  • सामूहिक बलात्कार - 20 वर्ष कठोर जमठेप शिक्षेची तरतूद किंवा मरेपर्यंत जन्मठेप 10 लाख रुपये दंड किंवा मृत्युदंड
  • 16 वर्षाखालील मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी कठोर जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप दहा लाख रुपये दंड
  • बारा वर्षाखालील मुलीवर अत्याचार मरेपर्यंत कठोर जन्मठेप शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड
  • पुन्हा पुन्हा महिला अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेप शिक्षा
  • सगळे गुन्हे अजामीनपात्र असतील
  • बलात्कार प्रकरणी तपसास सहकार्य न करणाऱ्या सरकारी सेवकाला दोन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड
  • अॅसिड अटॅक केल्यास किमान दहा वर्षांची किंवा मरे पर्यंत जन्मठेप शिक्षा, पीडित व्यक्तीला दंड रक्कम द्यावी लागणार
  • अॅसिड फेकण्याचा प्रयत्न केल्यास 10 ते चौदा वर्षांपर्यंत तुरुंगवास
  • अॅसिड हल्ला हा गुन्हा अजामीनपात्र
  • महिलेचा कोणत्या पद्धतीचे छळ केल्यास किमान दोन वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड ,
  • सोशल मीडिया, मेल, मेसेज, इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातून महिलांवर कमेंट करणे, धमकी देणे, चुकीची माहिती पसरवणे यासाठी पण शिक्षेची तरतूद

आधीच्या प्रकरणांना कायदा लागू होणार का? आंध्रप्रदेशात दिशा कायदा लागू केल्यापासूनच महाराष्ट्रात देखील असा कायदा आणण्याबाबत हालचाली सुरु झाल्या होत्या. ‘दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आंध्र प्रदेशला गेले होते. तसेच कायद्यासाठी एक समिती देखील गठित केली होती. महाराष्ट्रात देखील महिला अत्याचारांच्या घटनांचे प्रमाण कमी नाही. वर्धा हिंगणघाट जळीतकांड, नाशिक लासलगाव जळीतकांड, बीडमधील अॅसिड अटॅक प्रकरणासह अनेक घटनांनी महाराष्ट्र हादरुन गेला होता. या जुन्या घटनांना हा कायदा लागू होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संबंधित बातम्या

Disha Act | अधिवेशन संपण्यापूर्वी राज्यात 'दिशा' कायद्याच्या धर्तीवर कायदा होणार, गृहमंत्र्यांची ग्वाही 

Disha Act | दिशा कायद्याच्या अनुषंगाने नवा कायदा आणणार, 10 दिवसात कायद्याचा मसुदा होणार सादर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Lok Sabha : नाशिक लोकसभेचा तिढा कधी सुटणार? सुनील तटकरेंनी थेट मुहूर्तच सांगितला!
नाशिक लोकसभेचा तिढा कधी सुटणार? सुनील तटकरेंनी थेट मुहूर्तच सांगितला!
IPL 2024: ऑरेंज कॅप स्पर्धेत कोहलीच किंग, पर्पल कॅपची लढत रोमांचक 
IPL 2024: ऑरेंज कॅप स्पर्धेत कोहलीच किंग, पर्पल कॅपची लढत रोमांचक 
तुम्ही गुंतवलेल्या पैशांचं LIC नेमकं करते तरी काय? उत्तर वाचून विश्वास बसणार नाही!
तुम्ही गुंतवलेल्या पैशांचं LIC नेमकं करते तरी काय? उत्तर वाचून विश्वास बसणार नाही!
BJP Plan : लीड द्या आणि पुन्हा आमदारकी मिळवा, जो लीड देणार नाही त्याचं तिकीट धोक्यात; भाजपचे नवे धोरण
लीड द्या आणि पुन्हा आमदारकी मिळवा, जो लीड देणार नाही त्याचं तिकीट धोक्यात; भाजपचे नवे धोरण
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Damayanti Raje Bhosale : उदयनराजेंनी कधीच स्वार्थ पाहिला नाही - दमयंतीराजे भोसलेMahayuti Thane Nashik : नाशिकसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आग्रही तर ठाण्यासाठी भाजप हट्टीEd Action Shilpa Shetty : राज कुंद्रांची 97 कोटींची संपत्ती जप्त, शिल्पाच्या बंगल्याचाही समावेशSushma Andhare Full Speech :बारामतीची लढाई बाई विरुद्ध बाई अशी पाहू नका - सुषमा अंधारे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Lok Sabha : नाशिक लोकसभेचा तिढा कधी सुटणार? सुनील तटकरेंनी थेट मुहूर्तच सांगितला!
नाशिक लोकसभेचा तिढा कधी सुटणार? सुनील तटकरेंनी थेट मुहूर्तच सांगितला!
IPL 2024: ऑरेंज कॅप स्पर्धेत कोहलीच किंग, पर्पल कॅपची लढत रोमांचक 
IPL 2024: ऑरेंज कॅप स्पर्धेत कोहलीच किंग, पर्पल कॅपची लढत रोमांचक 
तुम्ही गुंतवलेल्या पैशांचं LIC नेमकं करते तरी काय? उत्तर वाचून विश्वास बसणार नाही!
तुम्ही गुंतवलेल्या पैशांचं LIC नेमकं करते तरी काय? उत्तर वाचून विश्वास बसणार नाही!
BJP Plan : लीड द्या आणि पुन्हा आमदारकी मिळवा, जो लीड देणार नाही त्याचं तिकीट धोक्यात; भाजपचे नवे धोरण
लीड द्या आणि पुन्हा आमदारकी मिळवा, जो लीड देणार नाही त्याचं तिकीट धोक्यात; भाजपचे नवे धोरण
MI vs PBKS : MI vs PBKS : धवन कमबॅक करणार का? मुंबईच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोण? 
MI vs PBKS : MI vs PBKS : धवन कमबॅक करणार का? मुंबईच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोण? 
... म्हणून केजरीवाल तुरुंगात आंबे अन् मिठाई खातात; कोर्टात ED चा गंभीर आरोप
... म्हणून केजरीवाल तुरुंगात आंबे अन् मिठाई खातात; कोर्टात ED चा गंभीर आरोप
मुकेश अंबानी मला विचारतात, कैसे हो पंकजा?; मुंडेंचं भाषण, परळीकरांना आश्वासन
मुकेश अंबानी मला विचारतात, कैसे हो पंकजा?; मुंडेंचं भाषण, परळीकरांना आश्वासन
OTT Release This Week :  आर्टिकल 370 , सायलेन्स 2; ओटीटीवर 'या' आठवड्यात काय पाहाल?
आर्टिकल 370 , सायलेन्स 2; ओटीटीवर 'या' आठवड्यात काय पाहाल?
Embed widget